मराठी पत्रलेखन | शाळेची लिविंग सर्टिफिकेट मागण्याबाबत पत्र | Marathi Patralekhan | Shalechi Living Certificate Magnyababat Patralekhan | Letter Writing In Marathi |
![]() |
मराठी पत्रलेखन - शाळेची लिविंग सर्टिफिकेट मागण्याबाबत पत्र - Marathi Patralekhan - Shalechi Living Certificate Magnyababat Patralekhan - Letter Writing In Marathi. |
शाळेची लिविंग सर्टिफिकेट ( शाळा सोडल्याचा दाखला ) मागण्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा.
दिनांक -
प्रति,
मुख्याध्यापक,
सरस्वती विद्यालय,
एम. जी. मार्ग,
सातारा.
विषय - लिविंग सर्टिफिकेट मागण्याबाबत. ( शाळेचा दाखला )
माननीय मुख्याध्यापक सावंत सर,
मी आपल्या शाळेत शिकणारा कु. आनंद साने, इयत्ता ८ वी अ मधील विद्यार्थी असून माझ्या वर्गशिक्षकांच्या परवानगीने आपणांस हे पत्र लिहीत आहे.
पत्रास कारण की सर, माझ्या वडिलांची पुढील पाच वर्षांसाठी कामानिमित्त साताऱ्याहून मुंबई येथे बदली झाली आहे. त्यासाठी काही दिवसातच आम्हास सहकुटुंब साताऱ्याहून मुंबईला वास्तव्यास जावयास लागणार आहे. तरी तेथे जाऊन मला नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी हया शाळेतील माझी लिविंग सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असणार आहे.
म्हणून माझी आपणांस ही विनंती आहे की, कृपया मला लवकरात लवकर ही शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा जेणेकरून मला वेळेवर तेथील शाळेत प्रवेश घेता येईल व त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत ही काहीही अडचण येणार नाही त्याचबरोबर माझा जास्त अभ्यास ही मागे राहणार नाही.
मला आशा आहे की आपण माझी विनंती लक्षात घेऊन व माझी ही अडचण समजून घेऊन मला माझा शाळेचा दाखला लवकरात लवकर द्याल. हया शाळेने दिलेले संस्कार व चांगली शिकवण मी सदैव माझ्या आचरणात आणीन व पुढील शाळेत जाऊन ही आपल्या चांगल्या वागणुकीतून माझ्या हया शाळेची मूल्य नेहमी जपून ठेवीन असे मी आपणांस वचन देतो.
आपला विद्यार्थी,
कु.आनंद साने,
सातारा.
ई-मेल - [email protected]
आमचे हे पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.