मराठी माहिती | भारतीय क्रांतिकारक माहिती | Bhartiy Krantikarak Mahiti | Indian Revolutionaries Information In Marathi |
![]() |
मराठी माहिती - भारतीय क्रांतिकारक माहिती- Bhartiy Krantikarak Mahiti - Indian Revolutionaries Information In Marathi. |
मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारतीय क्रांतिकारक व त्यांची माहिती बघणार आहोत.
1. भगतसिंग - भगतसिंग हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 साली तत्कालीन पंजाब भारतातील ल्यालपूर जिल्ह्यातील गंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव सरदार किशन सिंग संधू असे होते. त्यांचे टोपण नाव भागनवाला असे होते. त्यांचा धर्म शीख असून ते चंद्रशेखर आजाद यांच्यावर प्रभावित होते. भगतसिंग हे त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखी लाहोरच्या खालचा हायस्कूलमध्ये गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकार प्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. त्यांचे बालपण यांच्या आजोबांच्या आर्य समाज संस्कारात गेले व शालेय जीवनात रोज नित्य नियमाने सकाळ व संध्याकाळ प्रार्थना करणारी व गायत्री मंत्राचा जप करणारे भगतसिंग हे पुढे क्रांती पर्वत पूर्णपणे निरीक्ष्यवादी झाले. भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. त्यांची वाचन पद्धती दांडगी होती. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर', 'अर्जुन', 'प्रताप' इत्यादी दैनिकात काम केले होते. 9 सप्टेंबर 1925 रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन' असे ठेवण्यात आले. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा त्याचे भांडवलांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. त्याचप्रमाणे वय वर्ष 12 असतानाच त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर आपली पहिली जागा मिळवली. चौदाव्या वर्षी गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्ध आंदोलनात ते सामील झाले. व त्यानंतर ते युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. डिसेंबर 1928 मध्ये भगतसिंग व त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी 21 वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सौंडर्स लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना जी फाशीची शिक्षा झाली ते जॉन सौंडर्सच्या हप्त्याच्या आरोपाखाली. भगतसिंग हे नास्तिक होते. भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी सुद्धा ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटररखला येते भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. खूप तेथे हुतात्मा भगतसिंग स्मृतीसंग्रहालय आहे. या संग्रहालयात हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्गगीतेची प्रत ठेवण्यात आलेली आहे. भारत पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता परंतु भारत सरकारने बदली जमीन देऊन तो पुन्हा मिळवला. त्या नंतर 1968 मध्ये तेथे सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. अमर शहीद भगतसिंग, आम्ही कशासाठी लढत आहोत?, भगतसिंग, शहीद भगतसिंग, देश मांगता है कुर्बानिया, सरदार भगतसिंग, मी नास्तिक आहे का? अशी भगतसिंगावर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्याचबरोबर अमर शहीद भगतसिंग, गगन दमामा बाज्यो, रंग दे बसंती, द लेजेंड ऑफ भगतसिंग, शहीद भगतसिंग, शहीदे आजम, शहीदे आजम, भगतसिंग असे अनेक चित्रपट व नाटके त्यांच्यावर बनवली गेलेली आहेत. "इन्कलाब जिंदाबाद" ही भगतसिंग यांनी दिलेली लोकप्रिय घोषणा आहे. 23 मार्च 1931 रोजी लाहोर पंजाब येथे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भगतसिंग हे प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात.
2. मंगल पांडे- मंगल पांडे हे भारतातील1857 च्या युद्धातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नागवा या गावातील एका ब्राह्मण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती नेमबाजी, तलवार युद्ध इत्यादी कलांमध्ये ते अत्यंत पारंगत होते. मंगल पांडे हे आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील व अभिमानी होते. 1849 साली मंगल पांडे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीला सुरुवात केली. पांडे हे बराकपूर सैन्या मधील बंगालच्या चौथीसाव्या बी एन आय तुकडीच्या पाचव्या कंपनीत काम करत होते. त्यावेळी त्यावेळी बंदुकीला असणारी काडतुसे ही गायीच्या व डुकराच्या चरबीची बनलेली होती असे सर्वत्र पसरले होते. वही काढत असे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागेल अशावेळी आवरणाला लावलेली गाईची व डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने पलटण ते शिपायांनी ती काढत असे स्वीकारण्यासाठी नाकारले. व त्याच्या प्रतिकार अर्थ त्यांनी शस्त्र ही उपसले. भारत सरकारने 5 ऑक्टोबर 1984 रोजी मंगल पांडे यांची प्रतिमा असलेले टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला तिकीट व प्रथम दिवसाचे कव्हर दिल्लीचे कलाकार सीआर पाखराशी यांनी तयार केला होता. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला होता व त्यानंतर पांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ज्या जागेवर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्या जागेवर 'शहीद मंगल पांडे महाउद्यान' नावाच्या एका पार्कची उभारणी बराकपूर येथे करण्यात आलेली आहे. अभिनेता अमीर खान यांचा 'मंगल पांडे द रायझिंग' हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचप्रमाणे मंगल पांडे जीवन द रोटी रिबेलियन या सुप्रिया करुणाकरण लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचा विषय होता. हे नाटक स्पर्श या थिएटर ग्रुपने आयोजित केले होते आणि जून 2005 मध्ये हैदराबाद मधील आंध्र सरस्वती परिषदेच्या द मुविंग थेएटर मध्ये सादरही केले होते. मंगल पांडे यांचा मृत्यू 8 एप्रिल 1857 रोजी बराकपूर येथे झाला.
3. राजगुरू- राजगुरू यांचे संपूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे असून त्यांचा जन्म पुण्याजवळील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 सारी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. राजगुरू यांना 'रघुनाथ' या नावानेही ओळखले जात असे. राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी दिली गेलेले एक महत्त्वाचे क्रांतिकारक होते. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात ते सहभागी झाले होते. चंद्रशेखर आजाद भगतसिंग आणि सुखदेव अशा महान क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाटी हल्ला केला व त्यात जखमी होऊन ते मरण पावले त्याच्या बदला घेण्यासाठी 17 फेब्रुवारी 1928 रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे सौडर्सवर जेम्स स्कॉट समजून गोळ्या घालून त्यांना ठार केले. ज्यावेळी ते शिक्षणासाठी काशीला होते तेव्हा त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालय महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने, वादविवाद ऐकण्यात व भारत सेवा मंडळाच्या व्यायाम शाळेत लाठीकाठी, दांडपट्टा याच्या शिक्षणात जात होता.आझाद आणि राजगुरू काशीद एकत्र आले होते. इंग्रज सरकारची नेहमीच त्यांचा 36 चा आकडा असे व यादे यासाठी व होतात त्यासाठी राजगुरू हे कायमच उतावळे असायचे. त्यांची ही भावना इतकी पराकोटीची होती की आपल्या आधी भगतसिंग किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती. राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती सोंडर्सच्या वधाच्या वेळी. 23 मार्च 1931 च्या सायंकाळी राजगुरू हे हसत हसत फाशीला सामोरे गेले. राजगुरू भगतसिंग व सुखदेव या तिघांच्याही बलिदानाचा 23 मार्च हा दिवस भारतात 'शहीद दिन' म्हणून आजही पाळण्यात येतो. राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक भारताच्या पंजाब मधील फिरोजपुर जिल्ह्यातील हुसेनी वाला येथे आहे लाहोर तुरुंगात फाशी दिल्यानंतर शिवराम राजगुरू, भगतसिंग व सुखदेव थापर यांचे मृतदेह गुप्तपणे येथे आणण्यात आले होते. त्यानंतर शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्म गावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असेही करण्यात आले.
4. तात्या टोपे- तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव रामचंद्र उर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर असे होते. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्यात18 एप्रिल 1859 मध्ये झाला. तात्या टोपे हे 1857 च्या उठावातील एक प्रमुख. सेनानी म्हणून ओळखले जातात. 1857 मधील दिल्ली लखनऊ जमशेदपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावाचे सूत्रधार तात्या टोपे होते त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा, आणि स्वामीनिष्ठ यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास कॉलेजच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता ते म्हणजे तात्या टोपे. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. परंतु मानसिंगाची फितुरी त्यांना नडली व तात्या इंग्रजांचे कैदी झाले. 7 एप्रिल 1859 रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती अपराधीपणा नव्हता दुःख तर नव्हतेच देशाभिमान आणि हुतात्म्याचे समाधान मात्र होते. 18 एप्रिल 1859 रोजी त्यांना मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आली व या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. भोपाळला तात्या टोपे नगर टी.टी. नगर नावाची पेठ आहे. 'तात्या टोपे स्टेडियम' आहे शेजारी तात्या टोपेंचा यांचा भव्य पुतळा ही आहे.
5. सेनापती बापट - सेनापती यांचे संपूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे होते हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 साली पारनेर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव बापट तसेच आईचे नाव गंगाबाई बापट असे होते. त्यांचे बीएपर्यंतचे संपूर्ण शिक्षण पुणे येथेच झाले व बी ए ची मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट यांना ते तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठवले. इसवी सन 1921 ते इसवी सन 1924 या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा या धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवण्याकरता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. सेनापती बापट यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात दैनिक मराठातही नोकरी केली आहे. त्यांनी झाडू कामगार मित्र मंडळ नावाची संस्था ही स्थापन केली होती. सप्टेंबर 1929 मध्ये झाडू वाल्यांची मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापट आणि गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला होता शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली. इसवी सन 1944 साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील 15 ऑगस्ट 1947 इ.स. ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले पुण्यातील एका सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नावही देण्यात आले आहे. सेनापती बापट यांच्या कार्यावर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान एनसीईआरटी (NCERT) यांनी एक लघु माहितीपटाची निर्मिती केलेली आहे.
आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.