Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची मराठी माहिती | Information About National Parks In Maharashtra In Marathi |

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची मराठी माहिती | Information About National Parks In Maharashtra In Marathi |






            
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची मराठी माहिती | Information About National Parks in Maharashtra In Marathi |
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची मराठी माहिती | Information About National Parks in Maharashtra In Marathi |




मित्र-मैत्रिणींनो आज आपण महाराष्ट्रातील पाच राष्ट्रीय उद्याने व त्यांची माहिती बघणार आहोत.




•  ताडोबा राष्ट्रीय उद्यान- ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हणजे ताडोबा अंधारी वाघ व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आहे. येथे महाराष्ट्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे बफर झोन निर्माण केलेली आहेत. येथे एकूण चार बफर झोन आहेत व त्यामध्ये 79 गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्य प्राण्यांचा संघर्ष टाळावा असा त्यामागील हेतू आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे व या उद्यानात मगरी व सुसरी मोठ्या प्रमाणात आढळतात त्याचप्रमाणे गवा हा प्राणी येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 साली झाली आहे. येथील व्याघ्र प्रकल्पामुळे येथे असणाऱ्या वाघांचेही आकर्षण वाढलेले आहे. ताडोबा या राष्ट्रीय उद्यानात जवळपास 181 जातीचे पक्षी पाहता येतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील जंगल सफारी ही आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक सह खुल्या टॉप जीप व बसेस पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी मुक्कामही येथे उपलब्ध आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे आहे तर येथे रेल्वेने येण्यासाठी चंद्रपूर रेल्वे स्टेशन जवळचे रेल्वे स्टेशन म्हणून समजण्यात येते. त्याचप्रमाणे येथे सर्वात जवळचे बस स्थान म्हणजे चंद्रपूर आणि चिमूर हे आहेत. या राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या संख्येबरोबरच इतरही अनेक प्राणी आढळतात त्यामध्ये बिबट्या अस्वल जंगली कुत्री तरस उदमांजर व विविध प्रकारच्या रान मांजरी हरणांच्या जाती नीलगाय सांबर भेकर कोल्हे ससे इत्यादीअनेक प्रकारचे प्राणी आढळतात. या राष्ट्रीय उद्यानात सर्वेक्षणासाठी 'वाइल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून घेण्यात आलेले आहेत.                                   



•  नवेगाव राष्ट्रीय उद्यान - नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे व त्याची स्थापना 22 नोव्हेंबर 1975 रोजी झालेली आहे. या उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे व या डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाचा तळा आहे. दवेगाव उद्यान हे मुख्यतः विविध प्रकारच्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे नवेगावच्या तळ्यात हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्षी येतात यात विविध प्रकारची बदके हंस करकोचे बगळे पाणकोंबड्या पान कावळे इत्यादी विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात. या उद्यानात सारस क्रोचाची एक जोडी नेहमी बघायला मिळते. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या साकवलीहून नावेगाव ला जाण्यासाठी एसटी बसेस मिळतात.                   



•  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान- मुंबईच्या पंचक्रोशीत  असलेले राष्ट्रीय उद्यान म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे होय. येथील कान्हेरी लेण्यामुळे याला कृष्णगिरी म्हणजेच काळा पहाड असेही म्हणतात. त्याचप्रमाणे 1981 मध्ये कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नाव ठेवण्यात आलेले आहे. या उद्यानात 40 प्रकारचे सस्तन प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे विविध रंग आकाराचे 250 प्रकारचे पक्षी व अनेक सरपटणारे तसेच उभयचर प्राणी आहेत. या उद्यानात बिबट्या हा या वनसम्राज्यातील सर्वात मोठा भक्षक म्हणून येथे वावरतो त्याचप्रमाणे मुंगूस असे प्रकारचे प्राणीही येथे दिसण्यात येतात. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत त्यात मुख्यतः करंज साख बाभूळ बोर निवडुंग असून बांबूची बेटे ही आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत असते. येथे सिंह विहार व वनराणी, मिनी टॉय ट्रेन सफारींचे वेगवेगळे शुल्क आकारण्यात येतात. या उद्यानात वननिवासाची सोय असून त्याकरिता विश्रामगृह व कुटीर पद्धतीची निवास व्यवस्था ही आहे.                    



•  चांदोली राष्ट्रीय उद्यान- महाराष्ट्राची सांगली जिल्ह्यातील चांदोरी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते. चांदोली अभयारण्यास मार्च 2007 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आलेले आहे. या उद्यानात राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षीयांचेही अस्तित्व आढळून आलेले आहे.त्याचप्रमाणे सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान सतत पर्यटकांना आकर्षित करीत असते. ते साधारण 25 बिबट्यांचा वावर असल्याचे सांगण्यात आलेले असून 350 ते 400 च्या दरम्यान गवे व 250  100 अस्वले व अनेक भेकर व रानडुक्कर तळले गेलेले आहेत. या उद्यानात अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येते. कर्नाळा अभयारण्यात जसा कर्नाळा आहे तसाच प्रचित गड हा चांदोली अभयारण्यातील ऐतिहासिक किल्ला आहे. येथील जंगलात ऐन, बेहडा, जांभूळ, हिरडा, पांगारा, फणस, माड, उंबर, आवळा, आंबा, आपटा असे अनेक वृक्ष आणि अडुळसा कडुलिंब शिकेकाई तमालपत्र अशा वनौषधी ही आहेत. या राष्ट्रीय उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख प्रजाती बघायला मिळतात ज्या जगात इतरत्र नामशेष झालेल्या आहेत. येथे सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी खडकाळ घळी आहे व तेथे अनेक अस्वल पाहायला मिळतात. माहितीगार माणूस किंवा वनरक्षक बरोबर घेतल्याशिवाय या अभयारण्यात फिरण्यास मनाई आहे. कारण येथील जंगले दाट असल्यामुळे प्रवासी येथे रस्ता चुकण्याची भीती असते.                                                          



•  पेंच राष्ट्रीय उद्यान - भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमा भागात वसलेले पेज हे राष्ट्रीय उद्यान हणून ओळखले जाते. 257 किलोमीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो. हे उद्यान बघायला फारच सुंदर आहे व या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे हे उद्यान नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. 18 फेब्रुवारी 1999 रोजी या उद्यानाला भारतातील पंचविसावा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केलेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानातील सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य प्राणी म्हणजे बंगालचा वाघ हा समजला जातो त्याचप्रमाणे इथे अनेक इतरही प्राण्यांचा वापर दिसण्यात आलेला आहे जसे लांडगा कोल्हा तरस हरीण गवा नीलगाय जंगली मांजर व काळवीट. पेंच राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे नोव्हेंबर ते मे हा आहे.




आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close