कथालेखन मराठी | करावे तैसे भरावे | Kathalekhan Marathi | Karave Taise Bharave | Story Writing In Marathi |
![]() |
कथालेखन मराठी - करावे तैसे भरावे - Kathalekhan Marathi - Karave Taise Bharave - Story Writing In Marathi. |
शिर्षक - करावे तैसे भरावे.
शिंप्याचे दुकान - रोज एक हत्ती दुकानासमोरून नदी कडे - नदीपाशी थांबतो- शिंपी खाऊ देतो- शिंपी गंमत करतो- सोंडेत सुई टोचतो- हत्ती नदीवरचे पाणी सोंडेत भरून आणतो- शिंप्यांच्या दुकानात फवारा- सर्व कपडे भिजणे - शिंप्याचे नुकसान - तात्पर्य.
एका गावात एक रामू नावाचा शिंपी राहत होता. रामू शिंप्याचे दुकान हे गावातील फारच जुने आणि नावाजलेले कपडे शिवण्याचे दुकान होते. रामू शिंप्याकडे त्याच्याच गावातील नव्हे तर आसपासच्या गावातील लोकही आपले कपडे शिवण्यासाठी येत.
तो वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व सुंदर नक्षीकामाचे कपडे शिवून लोकांना देत असे. परंतु त्याच्यात ही कला हा त्याचा चांगला गुण असला तरीही त्याच्यात इतरांची खोडी काढण्याचा एक अवगुण ही होता. तो नेहमी आपल्या दुकानात रिकाम्यावेळी बसल्या बसल्या येण्या जाणाऱ्या लोकांच्या उगाच खोड्या काढत असे.
रिकाम्या वेळेत इतरांच्या खोड्या काढण्यात त्याला नेहमी आनंद मिळत असे. त्याच्या या स्वभावामुळे गावातील बहुतेक लोक त्याला वैतागले होते. असेच एके दिवशी सकाळी सकाळी रामू शिंप्याच्या दुकाना बाहेरून एक हत्ती समोरील नदीवर जात होता.
आपल्या दुकानात बाहेरून जाणाऱ्या हत्तीला पाहून रामू शिंप्याच्या मनात त्याची खोडी काढण्याची युक्ती आली. हत्ती निमुटपणे आपल्या रस्त्याने नदीच्या दिशेने जात असतानाच रामू शिंप्याने त्याला खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या जवळ बोलावले.
समोरील व्यक्ती आपल्याला काहीतरी खायला देत आहे हे पाहून हत्ती मनातून खुश झाला व तो त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. रामूने आपले हात हत्ती समोर पुढे केले व हत्तीला वाटले की तो त्याला काही खायला देत आहे म्हणून हत्तीने आपली सोंडही रामूच्या हातात देताच रामू शिंप्याने चटकन हत्तीच्या सोंडेला गंमत करावी म्हणून आपल्या हातातील सुई टोचली.
रामूने आपल्याला खायला न देताच आपल्याला सुई टोचली आहे याची जाणीव होताच हत्तीला फारच वेदना झाल्या. व आता या शिंप्याची चांगलीच खोड मोडावी असा प्राणी करून हत्ती नदीच्या दिशेने जातो.
इकडे मात्र रामू मनातल्या मनात फारच खुश होतो की कशी हत्तीची गंमत केली? हत्ती नदीच्या दिशेने गेलाय हे काही वेळाने विसरून रामू आपल्या कपडे शिवण्याच्या कामांमध्ये व्यस्त होऊन जातो.
रामूला खूप महागातले आणि उत्कृष्ट उंची पद्धतीचे कपडे शिवण्याचे काम मिळाले असल्यामुळे तो ते करण्यामध्ये व्यस्त असतानाच क्षणार्धात त्याला काही कळण्यापूर्वीच हत्ती नदीवरून आपल्या सोंडेत पाणी घेऊन येतो व रामू शिंप्याच्या दुकानात आपल्या सोंडेने ते पाणी सर्वत्र फवारतो.
काही वेळासाठी रामूला काहीच कळेनासे होते. परंतु हत्तीने फवारलेले पाणी संपूर्ण कपड्यांना ओले करून रामूचे संपूर्ण दुकानाचे व दुकानातील कापडाचे नुकसान झालेले पाहताच रामूला आपली चूक लक्षात येते.
रामूचे हत्तीच्या या वागण्यामुळे खूपच मोठे नुकसान झालेले असते. परंतु आपल्या रोजच्या अशा या नाहक खोड्या काढण्याच्या सवयीमुळे आपले आज खूप मोठे नुकसान झाले हे रामूच्या लक्षात आलेले होते. तो हत्तीची माफी मागतो व पुन्हा आपण कोणाबरोबरही असे करणार नाही असे त्याला वचन देतो.
तात्पर्य -
( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )
आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.