साने गुरुजीं विषयी माहिती- Sane Guruji Mahiti - Information About Sane Guruji In Marathi.
![]() |
साने गुरुजीं विषयी माहिती- Sane Guruji Mahiti - Information About Sane Guruji In Marathi. |
साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक समाज सुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने व त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. त्यांचे वडील हे कोर्टात काम करीत असत.
साने गुरुजी यांच्यावर त्यांच्या आईने बालपणीचे विविध संस्कार केले त्यातूनच साने गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता ते स्वतः खादीचाच वापर करत असत. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची ही स्थापना केली होती.
साने गुरुजींनी अनेक सुंदर व स्फूर्तीदायक देशभक्तीपर कविता लिहिल्या होत्या त्यातील 'पत्री' या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून या सर्व देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो ही एक प्रसिद्ध कविता आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साने गुरुजी समाजवादी पक्षात सामील झाले. ते इंग्रजी भाषेसह तामिळ व बंगाली या भाषाही चांगले शिकले होते. 1948 साली त्यांनी साधना हे साप्ताहिक सुरू करून त्यातून त्यांच्या कथा कादंबऱ्या लेख निबंध चरित्रे कविता प्रसिद्ध केल्या.
साने गुरुजींनी लिहिलेलं 'श्यामची आई' ही कादंबरी फारच सुप्रसिद्ध झाली आहे वही कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असताना लिहिली होती. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर फार प्रेम होते व त्यामुळेच त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तकही फार प्रसिद्ध आहे.
साने गुरुजींचे त्यांच्या आईवर फारच प्रेम होते व आपल्या आई-वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची त्यांनी एक अप्रतिम कादंबरी लिहिली त्यावर पुढे जाऊन एक मराठी चित्रपट निघाला.
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव नदीच्या वडगर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. त्याचप्रमाणे पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडी चा आणि गुरुजींचे स्मारक आहे व हे स्मारक पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी हे एक मानले जाते.
साने गुरुजी यांचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे जवळ आपल्या मूळ गावी पालगड येथे काढली.
तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे. त्यांच्या या पालघर गावी पर्यटक आवर्जून भेट देतात. पर्यटक साने गुरुजींचे हे घर पाहायला जातात कारण या घराची देखभाल आता वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आहे.
साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्यातील काही नावे पुढील प्रकारे आहे.
• अमोल गोष्टी
• आपण सारे भाऊ
• आस्तिक
• कलिंगडाच्या साली
• करुणादेवी
• कर्तव्याची हाक
• कला आणि इतर निबंध
• कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
• कावळे
• क्रांती
• बापूजींच्या गोड गोष्टी
• महात्मा गांधींचे दर्शन
• गीता हृदय
• गुरुजींच्या गोष्टी
• गोड गोष्टी कथा माला भाग 1ते 10
• गोड निबंध भाग 1, 2 ,3
• गोप्या
• तीन मुले
• रामाचा
• शबरी
• सती
• सुंदर
• सुंदर
• सतीच्या
• स्वदेशी
• स्वर्गातील माळ
त्याचप्रमाणे सारे साने गुरुजीं वर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिले आहेत त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत.
• आपले साने गुरुजी लेखक डॉक्टर विश्वास पाटील.
• जीवन योगी साने गुरुजी लेखक डॉक्टर रामचंद्र देखणे.
• निवडक साने गुरुजी लेखक रा. ग. जाधव.
• सेनानी साने गुरुजी लेखक राजा मंगळवेढेकर
• साने गुरुजी पुन्हा मूल्यांकन लेखक रामचंद्र नेमाडे
• साने गुरुजी जीवन परिचय लेखक यदुनाथ थत्ते
• साने गुरुजी एक विचार लेखक संजय साबळे
• महाराष्ट्राची आई साने गुरुजी लेखक वि. दा. पिंपळे
• साने गुरुजी यांची सुविचार संपदा लेखक वि.गो. दुर्गे
साने गुरुजींनी अनेक सुप्रसिद्ध कविता लिहिल्या आहेत त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत.
||खरा तो एकची धर्म||
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..
जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित |
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे|
|| बलसागर भारत होवो||
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो..
हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले |
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया होवो...
विश्वात शोभुनी राहो....
आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.