गुढीपाडवा सणावर मराठी निबंध | Gudipadwa Festival Essay in Marathi |
![]() |
गुढीपाडवा सण मराठी निबंध |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती बघणार आहोत.
गुढीपाडवा हा सण हिंदू संस्कृतीमध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी मानला जातो.
महाराष्ट्रातील लोक आपल्या नववर्षाचे स्वागत खूप आनंदाने करतात. घरातील एखादे शुभ कार्य किंवा एखादी नवीन वस्तू विकत घेण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे अवचित्य साधून ते काम आवर्जून या दिवशीच केले जाते.
या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तरी ती शुभच मानली जाते. कोणती ही नवीन वस्तू खरेदी करायची असल्यास या दिवशी मुहूर्त न बघता घेऊ शकतो. कारण गुढीपाडवा हा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो.
गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान रामानी रावणावर विजय प्राप्त करून ते आयोध्येला परत आले होते व त्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय किंवा असत्यावर सत्याची मात म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
दक्षिणेतील काही ठिकाणी या सणाला उगादी असेही म्हणतात. तेथील काही ठिकाणी या दिवशी विशेष म्हणजेच कैरीचे सरबत बनवितात.
महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण खूप धुमडक्यात आणि आनंदात साजरा होतो. या दिवशी प्रत्येक घरा-घरात मुख्य दरवाजाबाहेर उंच गुढी उभारली जाते. दारात उभारलेली ही गुढी समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीला विजय पताका म्हणूनही संबोधिले जाते. ज्या घरासमोर गुढी उभारलेलेली असेल
त्या घरातील लोकांचा नेहमी विजयच होतो असे महाराष्ट्रातील लोक मानतात मग तो विजय कोणत्याही प्रकारे असो. म्हणजेच आपल्यातील राग, लोभ, क्रोध, असुया या सर्वप्रकारच्या दुर्गुणावर आपण विजय प्राप्त करतो. या विजयाचे ही उंच गुढी हे प्रतिक आहे.
हिंदू संस्कृती प्रमाणे महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे करून लोक एकमेकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतात. या दिवशी घरातील सर्व कुटूंबीय नवीन कपडे घालून गुढीला सजवतात. गुढीलाही उंच बांबूच्या काठीपासून तयार केली जाते. त्या काठीला स्वच्छ धुवून नवीन वस्त्र किंवा साडी नेसवून घालून त्यावर हळदी कुंकू लावले जाते. तिची फुलांनी पूजा केली जाते व अगरबत्ती दाखून त्या गुढीची मनोभावे पूजा केली जाते. त्याला साखरेच्या गाठी बांधल्या जातात वा त्यावर तांब्याचे भांडे लावले जाते. अशी ही गुढी प्रत्येकजण आपापल्या दारोदारी उभारतात. या गुढिला मनोभावे स्मरून तिला गोडाचे नैवेद्य दाखवितात. दिवसभर ही उंच गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी असते परंतु सूर्यास्ताच्या वेळी ही गुढी उतरवण्याची पद्धत आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने वाटून त्यात थोडेसे गूळ, ओवा, मीठ, हिंग व मिरी टाकून ते सगळे एकत्र करून खाण्याची पद्धत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या व आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही या दिवशी हे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरातील उष्णताही ही कमी होण्यास मदत होते. कारण गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यात येणारा सण आहे आणि यावेळी आपल्या शरीराला उन्हाळ्याचा त्रास जास्त होत असतो. हा उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी हे पदार्थ सेवन केले जातात जेणेकरुन आपल्याला या उन्हाचा होणारा त्रास कमी होईल. म्हणजेच पूर्वीपासून चालत आलेले आपले हे जे सण उत्सव साजरे करण्यामागेही वैज्ञानिक दृष्टिकोन ही आहेत फक्त आपण ते समजून घेतले पाहिजेत.
महाराष्ट्रात जितके सण उत्सव आहेत तेवढेच ते साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही ही आहेत. म्हणूनच गुढीपाडव्याचे अजून एक वैशिष्ट असे आहे की या दिवशी ठिकठिकाणी हिंदू संस्कृतीची माहिती देणाऱ्या मिरवणूका ही काढल्या जातात ज्यात अनेक स्त्री-पुरुष, मुलं - मुली पारंपरिक पोशाखात सहभागी होतात. ढोल तशे वाजवीत ह्या मिरवणूका काढल्या जातात. मिरवणूकांमध्ये विजय पताकांचाही समावेश आवर्जून केला जातो. लहानमुलांपासून ते थोरानपर्यंत घरातील एकूण एक व्यक्ती या मिरवणूकमध्ये आनंदाने आणि हौशेने सामील होत असतात.
अशा प्रकारे गुढीपाडव्याचा हा सण नववर्षाचा पहिला दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील लोक खूप आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतात.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
हे ही वाचा - माझा आवडता सण होळी.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.