Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी छत्री बोलतेय - छत्रीची आत्मकथा - Mi Chatri Boltey - मराठी निबंध - Autobiography Of Umbrella In Marathi - आत्मवृत्त

मी छत्री बोलतेय | छत्रीची आत्मकथा | Mi Chatri Boltey.




       
मी छत्री बोलतेय - छत्रीची आत्मकथा - Mi Chatri Boltey
मी छत्री बोलतेय- Mi Chatri Boltey


मित्रमैत्रिणींनों, आज आपण छत्रीचे आत्मवृत्त किंवा छत्रीचे मनोगत या विषयावर निबंध बघणार आहोत.

जूनचा पहिला आठवडा उगवला की पावसाळा सुरु होण्याची लक्षणें वातावरणात दिसू लागतात. दरवर्षी जून महिना उजाडला की माझी आई आमच्या सर्वांच्या छत्र्या, रेनकोट इ. सर्व शोधून ठेवते त्याचप्रमाणे आजही आईने सर्वांच्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढले आणि मी कुतूहलाने एक एक छत्री बघत असताना मधेच आवाज आला, "अरे मित्रा ओळखलंस कां मला? मी छत्री बोलतेय! "
मी दचकून इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यातच ती म्हणाली अरे खरंच मी छत्री बोलतेय. आज मी तुला माझ्याबद्दल काही सांगणार आहे ऐकशील ना? 

दोन वर्षांपूर्वी तुझ्या आईने मला बाजारातून विकत घेतली. बाजारात मला एका दुकानात माझ्या इतर मित्र मैत्रिणीबरोबर ठेवलेले होते. आम्ही सगळे एका छत्री बनविणाऱ्या कंपनीतून एका मोठ्यां ट्रक मधून एकत्र त्या दुकानात आलो होतो. मला लोक छत्री , छाता किंवा अम्ब्रेला (Umbrella) अशा निरनिराळ्या नावांनी ओळखतात. 

मला एका सुंदर रंगाबिरंगीं अश्या कलिंगड फळाच्या चित्र असलेल्या कपड्यामध्ये तारेने तयार केले होते. इतर छत्र्या साध्या प्लेन कापडाच्या किंवा काळ्या कपडाच्या बनविलेल्या होत्या. पण मला मात्र माझं ते सुंदर फळाच्या कपड्याचे रंगबिरंगी रूप खूपच आवडतं असे. माझ्याकडे बघून इतर छत्र्यांना तर माझा हेवाच वाटते असे!

आम्ही सर्व छत्र्या अशा वेगवेगळ्या रंगामध्ये आणि आकारांमध्ये बाजारात उपलब्ध असतो. जसे संपूर्ण काळी आणि मोठी छत्री ही साधारणत : घरातील मोठी पुरुष मंडळी जसे बाबा, आजोबा, काका असे लोक वापरतात. अनेक रंगाची फुलांची किंवा एका विशिष्ट रंगाची जसे गुलाबी, निळी, जांभळी अश्या छत्र्या आई, काकी, आजी, मावशी अशा स्त्रियाना आवडतात. 

काही स्त्रिया या नोकरीनिम्मित बाहेर जातात किंवा कॉलेजला जाताना मुलींना सतत प्रवासात मोठी छत्री ही कधी कधी त्रासदायक बनते म्हणून जी सहज त्यांच्या बॅगमध्ये राहिली म्हणून  फोल्डेबल अशा छत्र्याही बाजारात उपलब्ध असतात आणि माझ्यासारख्या रंगबिरंगी व वेगवेगळी चित्रे, आणि कार्टूनस असणाऱ्या छत्र्या मुख्यतः तुम्हा सर्व लहान मुलांना आकर्षित करतात. तुम्ही लहान मुले तसे तर रेनकोटच जास्त वापरता परंतु आपल्या आईबाबांसारखी आपल्याकडेही एक छानशी छत्री असावी हा मोह तुम्हा सर्व मुलांना नेहमीच असतो आणि म्हणून तुमच्यासाठी माझ्यासारख्या छोट्या छोट्या आकर्षित करणाऱ्या छत्र्या बनविण्यात येतात. 

मलाही तुझ्या आईने तुझ्यासाठी विकत घेतली होती. ज्यावेळी मला दुकानातून तुझी आई घरी घेऊन आली त्यावेळी मी खूपच घाबरली होती कारण मला आता माझ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावे लागणार होते. परंतु जेव्हा मी तुझ्या घरी आले तु मला बघुन खुपच खुश झालास. तु मला खूप जपून वापरायचास. मला अजूनही आठवते जेव्हा रिमझिम पाऊस पडत असे तेव्हा तु नेहमी घराच्या अंगणात मला घेऊन पावसात जात असशी. शाळेचा पहिला दिवस होता त्या दिवशी तू मला स्वतः बरोबर खूप हौशेने शाळेत नेले होतेस आणि  कुठेही हरवू नये म्हणून तू सतत माझ्यावर लक्ष ठेऊन  होतास हे मला अजूनही आठवते. 

माझ्याबरोबर तु पावसाचा खूप आनंद घेत असशी. मला ज्या सुंदर कपड्याने बनविले होते त्याला गोलाकार वाकवून लावलेल्या तारांमुळे मी छान वाकबदार बनली आहे त्यामुळे मला तु पावसात गोल गोल फिरवून त्याच्या रिमझिम थेंबांची तु मजा घेत असताना एकदा अचानक माझ्या दोन तारा कपड्यांतून बाहेर येऊन माझे रंगबिरंगी कापड फाटले गेले . त्यावेळी तु खूप रडला होतास. होय! तुझी ही आवडती छत्री त्या दिवशी त्या दिवशी मोडून पडली होती. ज्या वेळी तु तुझ्या हया छत्रीचे बटन सारखे बंद चालू करून खेळत असायचास त्या वेळी तुझ्यासाठी ते मनोरंजन होते परंतु त्यामुळे ते बटणही निकामी झाले.

तुझ्या बाबांनी मला दुसऱ्या दिवशी दुकानातून दुरुस्त ही करून आणली होती. पण ती तात्पुरत्या स्वरूपात काहींसे मला दुरुस्त करण्यात आले आणि नंतर मी जणू निकामीच झाले. माझे ते पाहिल्यासारखे सुंदर रंगबिरंगी रूप आता मध्ये मध्ये शिलाई आल्यामुळे ओबडधोबड झाले होते. मग तु मला बघेनसा झालास माझ्याबरोबर खेळणे ही बंद करू लागलास.

मग काय? माझी रवानगी अडगळीच्या ठिकाणी झाली. कालांतराने पावसाळा संपला आणि तु मला विसरून गेलास. आईने मात्र मला जपून ठेवली कारण तु माझ्याबरोबर खूप खेळायचास. आज इतर छत्र्यांबरोबर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला तुझ्याबरोबर बोलावेसे वाटले.

एक छत्री म्हणून माझी तुम्हा सर्वाकडे काहीच तक्रार नाही परंतु एक काकूळतीची विनंती नक्की आहे की जी छत्री तुमचे पावसाळ्यात तर संपूर्ण संरक्षण करतेच परंतु उन्हातही उन्हापासून बचवासाठी खूप लोक माझा उपयोग करतात अशा हया तुमच्या छत्रीला नीट सांभाळा. जर का ती कुठे तुटली किंवा फाटली असेल तर वेळेतच दुरुस्ती करुन आणा म्हणजे ती कायम तुम्हाला साथ देत राहील.


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close