Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी माहिती - मासा विषयी माहिती - Masa Marathi Mahiti - Information About Fish In Marathi.

मराठी माहिती | मासा विषयी माहिती | Masa Marathi Mahiti | Information About Fish In Marathi |





            

मराठी माहिती - मासा विषयी माहिती - Masa Marathi Mahiti - Information About Fish In Marathi.
मराठी माहिती - मासा विषयी माहिती - Masa Marathi Mahiti - Information About Fish In Marathi.





मित्र-मैत्रिणींनो आज आपण मासा या जलचर प्राण्याविषयी मराठीमध्ये माहिती बघणार आहोत.

मासा हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. मांसाहारी लोकांमध्ये मासा हे एक आवडतं खाद्य आहे. माशांमध्ये गोड्या पाण्याचे मासे व खाऱ्या पाण्याचे मासे असे दोन प्रकारच्या माशांचे प्रकार असतात.

गोड्या पाण्यातील मासे हे सहज प्रयोजन होऊ शकणारे, विविध रंगांचे व आकारमानाने तसे लहान व सुंदर दिसणारे असे असतात. अशा प्रकारचे मासे काचेच्या जलपात्रात ठेवून घराची शोभा वाढवण्यासाठी लोक वापरात आणतात. त्याचप्रमाणे काही लोक अशा माशांच्या विक्रीचा व्यवसायही करतात.

तर खाऱ्या पाण्यातील मासे हे काही लोक उपजीविका म्हणून त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय म्हणून पकडतात व त्यांना विक्रीस आणतात. मत्स्य उद्योगात जगातील कोट्यावधी लोक गुंतलेले आहेत. खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशास समुद्रापगामी मासे व गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशास समुद्रगामी मासे असे म्हणतात.

बहुतेक लोक मत्स्य शेतीही करतात. मत्स्य शेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरीत्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेल्या माशांची पैदास होय. मासे अनेक लोकांच्या जीवनातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करून त्यापासून व्यवसाय करून उत्पन्न मिळवणे हा त्यातील एक उद्देश आहे.

मत्स्य शेतीत गोड्या पाण्यातील मत्स्य शेती व खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती असे दोन प्रकार आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीमध्ये समुद्राच्या व नदीच्या किनाऱ्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात यातून झालेल्या उत्पन्नाची मागणी आहे. तर शहराचे प्रमाण अधिक असलेल्या पाण्यात समुद्री कोळंबीचे उत्पन्न घेता येते याला खाऱ्या पाण्याच्या मत्स्य शेतीमध्ये आपण गणू शकतो. मत्स्य शेतीमध्ये कॅल्शियम व नत्र अधिक प्रमाणात असलेले सेंद्रिय पदार्थ माशांना खाद्य म्हणून वापरतात. यासाठी पानशेवाळ्याचाही उपयोग होतो कोणी भाताचा कोंडा शेंगदाण्याचे पेंड ही यासाठी वापरतात.

माशांचा उपयोग इतरही अनेक गोष्टींसाठी करण्यात येतो. जसे डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे म्हणजेच मलेरियाचे निर्मूलन करण्यासाठी गप्पी माशांचा फार उपयोग होतो तर काही मासे नारू सारख्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी पडतात.

पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हा प्रकार जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. बहुतेक लोकांचा तर पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हा छंद असतो. मुंबईसारख्या प्रसिद्ध ठिकाणी तारापूरवाला मत्स्यालय हेही एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

माशांची शरीर रचना पाहता त्यांच्या शरीराचे मस्तक म्हणजेच डोके,धड व शेपटी असे भाग पडतात. माशांना बाह्य जननेंद्रिय नसतात. माशांचे आयुष्य एक ते दोन वर्षापासून ते जास्तीत जास्त वीस ते तीस वर्षापर्यंत ही असू शकते. कार नावाचा मासा पन्नास वर्षेही जगतो असे म्हटले जाते.

माशांच्या प्रकारांबद्दल बोलायचे झालेच पापलेट, बांगडा, सुरमई, रावस, मोरी, हलवा, बोंबील, मांदेली, कोळंबी या प्रकारच्या माशांची खाण्यासाठी विशेष पसंती आणि आवड दाखवली जाते. रावस हलवा सुरमई हे मासे इतर माशांच्या तुलनेत तसे पचायला जड असतात.

मासे खाल्ल्यामुळे शरीराला पोषक असे प्रथिने व कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह मिळते. माशांमध्ये काही महत्त्वाची जीवनसत्वे ही असतात. जसे की माशांपासून आपल्याला कॉर्डलीवर ओईल ही प्राप्त होते.

मुशी या माशाच्या यकृतरापासून 'अ' व 'ड' जीवनसत्वयुक्त औषधी तेल निघते तर त्यांच्या आतड्यापासून ब जीवनसत्व मिळते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी विविध जीवनसत्वे व प्रथिने फारच उपयुक्त असतात. त्यामुळे माशांच्या सेवनाने आपल्याला त्यांचा उपयोगच होतो. म्हणूनच मासे आहारात असणे चांगले आहे असेही म्हटले जाते.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close