मी झाड बोलतोय | Mi Zad Boltoy| Autobiography Of The Tree Essay In Marathi.
![]() |
मी झाड बोलतोय. |
मित्रांनो, आपण घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला रस्त्यालगत अनेक झाडें दिसतात परंतु कधी आपण याचा विचार केला आहे का की जर हे झाड बोलू लागले तर...... ते आपल्याशी काय काय बोलेल? चला तर आज आपण याच विषयावर बोलू.
होय, तुम्ही बरोबर ओळखलत मी झाड बोलतोय. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगू इच्छितो ऐकून घ्याल ना? आज मी तुम्हाला एका झाडाचे मनोगत किंवा आत्मवृत्त सांगणार आहे.
मी आहे तुमच्या शाळेच्या रस्त्यालगत असलेलं एक चिंचेचं झाड ज्याला तुम्ही शाळेत जाता येता बघितलं असेल पण कधी बारकाईने माझ्याकडे बघितलं नसेल. कारण मी तुम्ही जन्माला येण्याआधीपासून इथेच उभा आहे. तुमच्या सारख्याच आधीच्या जणू कित्येक पिढ्यानपिढ्या मी येथून शाळेत येता जाता बघितल्या आहेत.
शाळा सुटली की मुलं मस्ती करत दंगा करत धावत माझ्याजवळ सावलीसाठी येऊन उभे राहतात. गप्पा, मज्जा मस्करी करतात. मी ही शांतपणे उभा राहून त्या सर्वांच्या मज्जा मस्तीचा आनंद घेतो. आज कित्येक वर्षे झाली आहेत. वेगवेगळे मुले त्याचे सुख दुःख आपल्या मित्रसोबत माझ्यासमोर एकमेकांना सांगताना मी पाहिलंय. तुमच्या हा मैत्रीचा मला खूप हेवा वाटतो. आणि मी ही स्वतःला तुमचा एक मित्रच समजतो. पण तुम्ही मला तुमचा मित्र समजता का ? मला याचे उत्तरं अजूनही नाही मिळाले आहे.
एक छोटंसं रोपटं असताना मी इथे आणला गेलो होतो. हळू हळू मी जसा मोठा होत गेलो तस इथे रुळला गेलो. सकाळ झाली की शाळेबाहेर उभा असताना तुम्हा सर्वांची मी वाट पाहू लागलो. तुम्ही सगळे मला आपलेच वाटता आणि तुमच्यातील काही जणांनाही मी त्यांचा आपलासा वाटत असेन पण काही जण मात्र मला निर्जीव समजतात.
दुपारच्या सुट्टीत आणि शाळा सुटली की काही मुले मला दगड मारतात आणि चिंच पडायचा प्रयत्न करतात. मला ते दगड खूप जोरात लागतात. इतके जोरात की प्रसंगी माझ्या फांदीवरून पानेही खाली पडतात. मला खूप दुःख होत. तुम्ही दगड मारून माझ्या फ़ांद्या तोडू नये म्हणून कधी कधी मी स्वतः च तुमच्यासाठी चिंच खाली टाकतो. काही जण तर उगाचच मला खेळ खेळ म्हणून दगड मारतात. तर काही जण माझ्या खोडावर स्वतःची नावे कोरतात. त्यावेळी मला खूप वेदना होतात.
पावसाळा आला की लोक माझ्या फ़ांद्या छाटून टाकायला येतात. मला समजते की ते ही सुरक्षितेच्या दृष्टीने गरजेचे आहे परंतु याच माझ्या फ़ांद्या माझी शोभा वाढवतात. याच माझ्या फांद्यावर ना जाणो मी कितीतरी पक्षांना घरटी बांधायला दिलेली आहेत. त्यावर ते पक्षी आनंदाने आपल्या पिल्लांबरोबर राहतात. ज्यावेळी या फ़ांद्या छाटल्या जातात त्यावेळी ऐन पावसाळ्यात हे पक्षीही बेघर होतात.
कोणी फेरीवाला माझ्या सावलीखाली आपले दुकान लावतो तर कोणी मोठया पाऊसात बचावासाठी माझ्या फांद्याखाली उभे राहतो. आज वर्षोनुवषे मी या एका जागेवर उभा आहे आणि खूप चांगल्या वाईट घटनांचा साक्षीदार झालो आहे.
पण आता मी वयस्कर झालो आहे. माझ्या मुळामध्ये पहिल्यासारखी ताकत आता राहिली नाही. कदाचित येत्या एक दोन पावसाळ्यात मी उन्मळून पडून जाईन. परंतु त्या आधी मला तुम्हासर्वांना एक विनंती करायची आहे की कृपया आम्हा झाडांना मुद्दामहून त्रास देऊ नका.
आम्ही तुम्हाला प्राणवायू देतो, सावली देतो, फुले -फळे देतो. तेव्हा आमचा जास्तीत जास्त चांगला सांभाळ करा आणि आमच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीचा फायदा करून घ्या. परंतु कृपा करून आम्हाला जगू दया. आम्हाला तोडू नका. या सिमेंटच्या जंगलात आता खूपच कमी झाडें बाकी राहिली आहेत त्याचे जतन करा.
आम्ही तुम्हाला नेहमी आपलेच मानतो तसेच तुम्ही ही आम्हाला आपलेच माना. आपण स्वतः आणि आपापल्या जवळच्या लोकांना झाडांचे महत्व समजावून सांगा आणि प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावण्याचे निश्चय करा.
निर्सगाचे महत्व जास्तीत जास्त लोकांना पटवून दया. "झाडें लावा झाडें जगवा " हीच माझी तुम्हा सर्वाना मनापासून विनंती आहे.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.