Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझा आवडता मित्र -Majha Aawadta Mitra - मराठी निबंध- My Best Friend Essay In Marathi -वर्णनात्मक

 माझा आवडता मित्र |Majha Aawadta Mitra|My Best Friend Essay In Marathi.

      

माझा आवडता मित्र
माझा आवडता मित्र.


मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहानपणापासून खूप मित्र येतात. त्यातील काही जण विशिष्ट काळासाठी आपल्याबरोबर साथ देतात तर काही जण आयुष्यभरासाठी आपल्या जीवनात महत्वाची जागा घेतात. पण त्यातही एखादा मित्र आपला खूप जवळचा आणि आवडता होतो जो आपल्यासाठी खास असतो. असाच माझाही एक आवडता मित्र आहे ज्याच्याबद्दल आज मी सांगणार आहे.

माझ्या आवडत्या मित्राचे नाव अभय. अभय आणि माझी मैत्री आम्ही इयत्ता ५ ला असल्यापासून आहे. मला अजून आठवतो तो दिवस. अभय माझ्या वर्गात नवीन आला होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरु होऊन जवळ जवळ एक महिना उलटून गेला होता आणि त्यानंतर अभय माझ्या वर्गात आला होता.

मुख्याध्यापिकानी अभयची ओळख आम्हा सर्वांशी करून दिली होती. सर्वांनी त्याला अभ्यासात पाहिजे ती मदत करा असेही ते सांगून गेले होते. एक महिना उशिरा शाळेत आल्यामुळे त्याचा थोडा अभ्यास मागे राहिला होता. योगायोगाने बाईंनी त्याला माझ्या शेजारी बसविले.

पहिल्या दिवशी आमचे काहीच जास्त बोलणे झाले नाही परंतु हळू हळू जसे दिवस पुढे गेले तसतसे आम्ही दोघे एकमेकांबरोबर खेळू लागलो व एकत्र अभ्यासाही करू लागलो. आता आमची चांगलीच गट्टी जमली आहे. अभय तसा अभ्यासात खूप हुशार आहे. त्याला गणित हा विषय खूप आवडतो आणि तो गणिताच्या तासाला पटापट गणिते सोडवितो. आंतरशालेय गणिताच्या परीक्षेत त्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसा तो जास्त बोलका नसला तरी एकदा त्याची मैत्री कोणाकडे झाली की तो सर्वांचा चांगला मित्र होतो.

आम्ही दोघे मधल्या सुट्टी मध्ये खूप एकत्र डब्बा खातो. जर माझ्या घरी आई जेव्हा पुरणपोळी बनविते त्यावेळी मी अभयसाठी न विसरता घेऊन येतो कारण त्याला पुरणपोळी खूप आवडते आणि ज्या वेळी अभयची आई जेव्हा गजारचा हलवा बनविते त्या वेळी तो ही माझ्यासाठी न विसरता आणतो.

शाळेच्या दिवसात आम्ही खूप खेळतो, मस्ती करतो परंतु उन्हाळी सुट्टी मध्ये मात्र आम्हाला एकमेकांची खूप आठवण येते. कधी एकदाची शाळा सुरु होते असे आम्हाला दोघांना ही होते. आमची कधी कधी एकमेकांकडे कट्टी बट्टीही होते. पण नंतर लगेच आम्ही बोलू लागतो.

एकदा तो दिवाळी च्या सुट्टीत तो फिरायला बाहेरगावी गेला होता त्यावेळी त्याने माझ्यासाठी एक सुंदर अस पेन्सिल बॉक्स आणला होता. आम्ही दोघे एकमेकांच्या वाढदिवसाला सुंदर सुंदर शुभेच्छा कार्ड बनवितो. त्यावर चांगली चांगली वाक्य लिहितो. मित्राचे आयुष्यातील स्थान खूप जास्त महत्वाचे आहे कारण मित्रच एक अशी व्यक्ती असते ज्याच्यापुढे आपण सुखदुःख व्यक्त करतो.
मागील महिन्यात जेव्हा मी आजारी पडलो होतो तेव्हा अभय मला बघायला घरी आला होता. दोन दिवस शाळेत न गेल्यामुळे त्याला माझी चिंता वाटत होती. आमची घरे जास्त लांब नाही आहेत. त्यामुळे माझा शाळेत जो अभ्यास बुडला होता तो अभय मला घरी आल्यावर सांगून गेला. त्यांच्या येण्याने मला खूप धीर आला होता. 

अभय आणि मी ठरवल आहे की या उन्हाळी सुट्टीत आम्ही खूप खेळणार आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत. असा हा माझा मित्र अभय मला खूप खूप आवडतो. आणि आम्ही आमची ही गोड मैत्री अशीच जपून ठेवणार.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close