मी गोधडी बोलतेय | Mi Godhadi Boltey| Autobiography Of A Quilt Essay In Marathi |
 |
मी गोधडी बोलतेय |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण गोधडीचे आत्मवृत्त किंवा गोधडीची आत्मकथा - मी गोधडी बोलतेय हा निबंध समजून घेणार आहोत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही आम्ही दिवाळीच्या सुट्टीत गावी आलो आहोत. दिवाळीच्या वेळी थंडीला बऱ्यापैकीं सुरुवात झालेली असते आणि शहरात थंडी तितकीशी जाणवत नसते परंतु गावी मात्र या दिवसात खूपच थंडी जाणवते. गावी गेल्यावर जस जशी संद्याकाळ होऊ लागली तस तशी मला थंडी जास्तच जाणवायला लागली होती. जेवण उरकल्यावर सगळ्यांनी झोपायची तयारी सुरु केली आणि तेवढ्यात माझी आजी आली आणि तिने कपाटातून खास माझ्यासाठी एक सुंदर रंगबिरंगी रंगाची एक गोधडी आणून दिली. 'ही गोधडी अंगावर घे आणि बघ तुझी थंडी कशी पळून जाईल' असे म्हणत आजी हसत हसत निघून गेली.
मला ती गोधडी नको होती आणि शहरात जी चादर मी वापरत असे मी तशीच एक चादर मी घेऊन त्या गोधडीला बाजूला सरली. तेवढयात तिचा आवाज आला, "अरे बाळा! मी गोधडी बोलतेय. होय! मीच ही सुंदर रंगबिरंगी रंगाची गोधडी." तुझ्या आजीने मला खूप प्रेमाने बनविली आहे ते ही फक्त तुझ्यासाठी. माझे कापड जेव्हा तुझ्या आजीला आवडले तेव्हा तिने लगेच ठरविले कीं तू गावी येण्याआधी तुझ्यासाठी खास मला सुंदर असे नक्षीदार टाके मारून शिवून ठेवावे.
रोज संद्याकाळी आजी थोडा वेळ काढून मला सुंदर नक्षी वाले टाके घालीत असे. तुला कदाचित कल्पनाही नसेल कीं सुईच्या त्या टाक्यानी मला किती वेदना होत होत्या परंतु त्यामुळेच मला एक सुंदर रुपही मिळणार होते. माझ्या निळ्याभोर अंगावर सुंदर नक्षीकाम झाले आहे आणि माझ्या चारही चौकोनातील कडावर सुंदर अशी पट्टीची बॉर्डर बनविली आहे. आजी जशी तुला मी गोधडी म्हणून बक्षीस देण्यासाठी लगबग करीत होती त्याचप्रमाणे मला ही तुला भेटण्याची खूप इच्छा होती.
मला पारंपरिकरित्या हातानेच शिवली जाते परंतु आजकाल काही लोक मला शिलाई मशीनवरही शिवतात. मला गोधडी हे नाव तर आहेच परंतु काही ठिकाणी माझी वाकळ आणि लेपटी अशीही नावे आहेत.
थंडीच्या दिवसात लोक मला आवर्जून बाहेर काढतात आणि आवडीने वापरतात. मी चादरीपेक्षा जास्त ऊबदार असते त्यामुळे लोकांचा माझ्यामुळे थंडीपासून चांगला बचाव होतो आणि त्यांना रात्रभर थंडी न वाजता चांगली झोप लागते. तू मला बाजूला सारलस त्यावेळी मला वाईट वाटले परंतु मला हे ही समजते कीं मी वजनाने इतर पांघरूणापेक्षा थोडीशी जाडच असते म्हणून तुम्हा मुलांना मी नकोशी वाटते पण माझा हाच जडपणा तुम्हाला थंडीपासून बचाव करतो.
थंडीमध्ये गावकरी गोधडीचा खूप वापर करतात आणि उन्हाळा आला कीं गोधडीला स्वच्छ धुवून उन्हात कडक वाळवून पुन्हा कपाटात ठेऊन देतात. थंडीच्या दिवसातच गोधडीला खूप महत्व दिले जाते बाकीच्या दिवसात आम्ही कपाटाच्या अंधाऱ्या जागी बसून असतो. तुम्हा शहरी मुलांना कदाचित गोधडी आवडतं नसेल किंवा जाड वाटत असेल परंतु एका सामान्य कपडापासून ते गोधडी बनण्यापर्यंतचा माझा हा प्रवास खूप कठीण होता.
खूप वेदना होतात कपडापासून गोधडी बनण्यापर्यंत परंतु एकच सकारात्मक गोष्ट मी मनात ठेऊन या वेदना सहन करते कीं ज्या वेळी माझे रूपांतर एका सुंदर गोधडी मध्ये होईल त्यावेळी मी कोणाच्यातरी कामी येईन, मी कोणाचा तरी थंडीपासून बचाव करीन आणि आपण एखाद्याच्या कामी येणे यापेक्षा ते दुसरे भाग्य काय मित्रा तूच सांग...." असे बोलून ती गप्प बसली. आणि मी एकदम सुन्न झालो.
मला आता आजीने प्रेमाने शिवलेल्या या गोधडीचे खरे मोल कळले आहे. त्यात त्या गोधडीच्या वेदनांमागचा आनंद आणि आजीच्या मेहनती मागचे खरे प्रेम माझ्या लक्षात आले आहे. म्हणून मी लगेच ती दूर सारलेली गोधडी माझ्या अंगावर घेतली आणि झोपी गेलो. मला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा थंडीची जाणीवही झाली नाही कारण माझ्या या लाडक्या गोधडीने रात्रभर माझे थंडी पासून संरक्षण केले आणि मला उब दिली होती.
मी आता ठरविले आहे कीं गावावरून पुन्हा घरी जाताना मी माझी ही गोधडी माझ्याच बरोबर माझ्या घरी नेणार कारण माझी आणि माझ्या आजीने दिलेल्या या गोधडीची आता चांगलीच गट्टी जमली आहे.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.