Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझे गाव - Majhe Gaon -मराठी निबंध- My Village Essay In Marathi - वर्णनात्मक

 माझे गाव |Majhe Gaon | My Village Essay In Marathi. 


      
माझे गाव - मराठी निबंध
माझे गाव


  
मित्रमैत्रिणींनो , आज आपण माझे गाव या विषयावर निबंध बघणार आहोत . 

आपण सगळेच उन्हाळ्याची सुट्टी पडली की कुठे ना कुठे तरी फिरायला जातो. पण मी नेहमी उन्ह्याळ्याच्या सुट्टीची वाट बघतो ते माझ्या गावी जाण्यासाठी. माझे गाव मला लहानपणापासून खूपच आवडते. वार्षिक परीक्षा जवळ आली की मला आधीपासूनच गावी जाण्याचे वेध लागतात. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तर माझा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण आता गावी जाण्याची तैय्यारी घरी सुरु होणार असते. 

अखेर तो दिवस उजाडतो. मी सकाळीच लवकर उठून बसतो. कधी एकदा गाडी सुटणार असे मला होते. गावी गेल्यावर मी काय काय मज्जा करणार ते मी मनातल्या मनात सारखा ठरवीत असतो. खुपशे बेत मी आखलेले असतात. 

माझ्या गावी जाण्यासाठी सुमारे सात ते आठ तास लागतात. आज अखेर तो दिवस उजाडला आहे. आज आम्ही गावी जात आहोत. गाडी सुटली आणि मी खिडकीबाहेरील निसर्गाचा आनंद घेत घेत जात होतो. जसं जसं गाव जवळ येत तस तस मला जास्त उत्साह वाढत होता. अखेर गावी आम्ही पोचललो. 

माझ्या गावी माझे आजी आजोबा राहतात. माझे आजी आजोबा खूपच प्रेमळ आहेत. ते माझे खूप लाड करतात. आमच्या गावी एक कुत्रा ही आहे. त्याचे नाव 'मोती 'आहे. जशी आमची गाडी घराजवळ पोहचते मोती खुश होऊन उड्या मारू लागला. आजी आजोबा पण आमची वाटच बघीत होते. मला आजी आजोबाना आणि मोतीला बघून खूप आनंद झाला. 

माझ्या गावी एक छोटीशी नदी पण आहे. मी कधी कधी आजोबा आणि बाबांबरोबर त्या नदीजवळ फिरायला जातो. आमच्या घरासमोर आमच शेत आहे. आजीने तिकडे खूप फळभाज्या लावून ठेवल्या आहेत. आजोबा तिकडे भातशेती पण करतात.

माझ्या घरच्या आवारातच आजोबांनी आंबा, पेरू आणि चिकूची झाडें लावली आहेत. आंबा मला खूप आवडतो. मी गावी गेलो की आजोबा मला खूप आंबे देतात. गावच्या घराबाहेर अंगणात एक छोटंसं तुळशी वृंदावनही आहे. आजी रोज पहाटे तिकडे रांगोळी घालते आणि सकाळ संद्याकाळ तुळशीची पूजा करते. 

गावच्या घरामागे माजघर आहे तिथे माझ्या आजीने सुंदर चूल बनविली आहे. माझी आजी माझे खूप लाड करते आणि मस्त मस्त चविष्ट पदार्थपण बनवून करून खायला देते. माझी आजी चुलीकडे बसून मोठ्या मोठ्या आणि गरमा गरम भाकऱ्या करते. मला आजीच्या हातच्या भाकऱ्या खूप आवडतात. आजी भाकऱ्या करीत असताना मी तिकडे जातो आणि तिच्या शेजारी बसून तिच्याकडे खूप गप्पा मारतो.

गावाच्या वेशीजवळच एक मंदिर आहे. मी जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा आई बरोबर एकदा तरी त्या मंदिरात जातो. गावचे वातावरणच एकदम छान असते. तिकडे मला पहाटे पहाटेच लवकर जाग येते. अंगणात आजोबांनी फुलांचे एक मोठे झाड लावले आहे. सकाळीच सकाळी गावच्या अंगणात भरपूर फुलांचा सडा पडलेला असतो. त्याने सकाळचे वातावरण अगदी सुगंधित झालेले असते. मी सकाळी मोतीला घेऊन फिरवायला नेतो. तो ही सतत माझ्या मागेपुढे फिरत असतो.

गावी गेलो की दिवस कसे भराभर निघून जातात तेच कळत नाही. कारण तिकडे ही माझे दोन मित्र आहेत ज्यांची नावे दिन्या आणि राजू आहेत. ते दोघे ही जेव्हा मी गावी जातो तेव्हा माझ्याबरोबर विटीदांडू, लपाछपी आणि क्रिकेट खेळतात. दिवसभर आम्ही तिघे जण खूप खेळतो.

मी एक महिना गावी राहिलो आहे. आता परत घरी जाण्याचे दिवस जवळ येत आलेत. कारण माझी शाळा आता सुरु होणार आहे. परंतु मला गावावरून घरी जायचे मनच होत नाही. गावी केलेली खूप मज्जा मला सतत आठवत होती. 

माझ्या इथल्या गावच्या मित्रांना सोडून जावेसे मला जरा ही मन होत नव्हते. मी परत निघताना आजी -आजोबा, दिन्या आणि राजू सगळ्याच्या डोळ्यात पाणी आले होते आणि माझे मन पण खूप भरून आले होते. पण मनात एकच आशा ठेऊन आई बाबांबरोबर मी परत घरी निघालो आहे की परत जेव्हा सुट्ट्या मिळतील तेव्हा मी नक्कीच या माझ्या लाडक्या गावी येईन आणि खूप मज्जा करीन. कारण सुट्टीत इतर मुलांना प्रेक्षणीय स्थळी किंवा थंड हवेच्या ठिकाणी जावेसे वाटते परंतु मला मात्र माझ्या गावची ओढच जास्त खेचते.

असे हे माझे सुंदर आणि निसर्गरम्य गाव मला खूप खूप आवडते. 


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close