Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी शाल बोलतेय- शालची आत्मकथा - Mi Shawl Boltey - Shawlchi Aatmakatha- मराठी निबंध - Autobiography Of Shawl Essay In Marathi- आत्मवृत्त.

मी शाल बोलतेय- शालची आत्मकथा | Mi Shawl Boltey | Shawlchi Aatmakatha| Autobiography Of Shawl Essay In Marathi.




        
मी शाल बोलतेय- शालची आत्मकथा - Mi Shawl Boltey - Shawlchi Aatmakatha
मी शाल बोलतेय- शालची आत्मकथा.


मित्रमैत्रिणींनो, आज आपण शालचे (Shawl) मनोगत किंवा शालचे आत्मवृत्त बघणार आहोत.

नमस्कार मित्रांनो, ओळखत का मला? मी शाल बोलतेय! होय बरोबर. थंडीमध्ये जी शाल तुमचे संरक्षण करते तिच मी शाल आहे. आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे. ऐकाल ना?

मी शाल बोलतेय. तुम्ही मला नक्कीच कधी ना कधी पाहिले असणारच. विशेषत : मी स्त्रियांची पसंती आहे. विवाहित स्त्रिया असो की वयस्कर स्त्रिया किंवा मग अगदी अविवाहित मुली ही असो पण शाली कडे बघून प्रत्येकीचे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही.

हिवाळ्यात पहाटे विशेषतः महिला अंगाभोवती शाल गुंढाळून घरगुती कामे करतात.

माझा वापर मुख्यतः काश्मीर मध्ये जास्त होतो. तेथील वातावरण नेहमीच थंड असते त्यामुळे तिथे शालिचा वापर रोजच्या जीवनात थंडीपासून बचाव करण्यासाठी केला जातो. कारण मला म्हणजेच शालीला लोकरीपासून बनवितात व मी जरी हाताला पातळ कपडाची लागत असली तरी पण थंडीपासून बचाव करण्यात तुम्हाला मदत करते.

माझा आकार हा आयताकृती किंवा चौकोनी असतो व मला खांद्यावर घेताना त्रिकोणी आकार करून घेतले जाते. मी वेगवेगळ्या रंगामध्ये आणि नक्षिकाम केलेल्या प्रकारात मिळते. मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे मला मराठी भाषेत "शाल" असे म्हणतात तर हिंदी मध्ये मला "दुशाला" असे म्हणतात तसेच संस्कृत मध्ये मला "शाटी" असे संबोधिले जाते.

पूर्वी माझा फक्त थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपयोग केला जात असे परंतु आजकल मला फॅशन म्हणूनही वापरण्यात येते. मी अनेक प्रकारामध्ये मिळते जसे पश्मिना शाल हा माझा सर्वात जास्त लोकप्रिय प्रकार आहे. त्याचप्रमाणे माझे अजूनही अनेक प्रकार आहेत जसे  दो-शाला, नमदा आणि गब्बा, ट्रांगुलर नीट लेस शाल, शाली व स्टोल अश्या अनेक प्रकारच्या शाली मिळतात. जशी ग्राहकांची पसंती तश्या प्रकरच्या शाली ते घेऊन जातात. आमचे शालिंचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी आमचे प्रत्येकीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

आमचे शालिंचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच शाल हे सन्मानाचे प्रतिक आहे. शाल हे आदराचे प्रतीक आहे. मोठमोठ्या समारंभात एखाद्या विशेष व्यक्तीचा आदरसत्कार करण्यासाठी अथवा त्यांना मानसन्मान देण्यासाठी त्यांचा शाल आणि नारळ देऊन त्याचा सत्कार केला जातो.

आपल्याकडे संस्कृतीमध्ये मला म्हणजे शालिला धार्मिकदृष्ट्या ही खूप महत्व आहे दिलेले आहे. त्यामुळे मी नेहमी स्वतः ला नशीबवान समजते.

पारंपरिक प्रथेप्रमाणे ज्या वेळी आपण एखाद्या महत्वाच्या पूजेसाठी बसतो तेव्हा आवर्जून स्त्रिया शालिचा वापर करतात त्याचप्रमाणे लग्न समारंभात ही नववधू लग्नाचा विधी होत असताना ही माझा म्हणजेच शालिचाच वापर करते. खरंच तेव्हा मनापासून खूप आनंद होतो.

मी शाल थंडीच्या ऋतूमध्ये खूप पसंती असलेले वस्त्र आहे कारण कुठेही प्रवासात नेण्यासाठी स्वेटर किंवा थंडीच्या जेकेट्सपेक्षा मी वजनाने हलकी असते. उत्तर भारतात बहुतेक लग्न समारंभ हे रात्रीच्या वेळी होतात अशा ठिकाणी तेथील स्त्रिया आणि मुली स्वेटरला पसंती न देता विविध साड्यांवर विविध रंगाच्या व त्यांच्या साडयांना मॅचिंग अश्या शाली निवडता व थंडीच्या वेळी आम्हा शालिचा वापर त्या साड्यांवर करून त्यांची शोभा अजून वाढवितात. आकर्षक रंगसंगती आणि साड्या व शालींची चांगची जुळवाजुळव यामुळे स्त्रियाही शालींमध्ये आनंदी असतात.

मी शाल सर्वत्र उपयोगाला येणारी आणि लोकप्रिय असे वस्त्र असल्यामुळे मी कोणाला ही गिफ्ट म्हणूनही देण्यात ही कामाला येते आणि गिफ्ट दिलेल्या व्यक्तीला ही शाल नेहमीच पसंत येते.

मी शाल तशी दिसायला अगदी पातळ कपडा दिसत असली आणि जरी मला गोधडी आणि चादरी सारखी भरपूर उब जरी नसली तरी वेळेला थंडीपासून मी तुमचे नक्कीच संरक्षण करण्यात उपयोगी पडते. मी त्यांच्यापेक्षा आकाराने लहान जरी दिसत असली तरी मी त्यांच्याच एवढी उपयोगी आहे.

तेव्हा मित्रांनो, मी शाल वर्षानुवर्षे अत्यंत उपयोगी आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचे वस्त्र आहे आणि तुम्ही सर्वांनी मला असेच उपयोगात आणून माझे महत्व कायम ठेवावे हीच माझी तुम्ही सर्वाकडून अपेक्षा आहे.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close