Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझा आवडता ऋतू -हिवाळा - Maza Aawadta Rutu Hivala -मराठी निबंध- My Favorite Season Winter-(वर्णनात्मक )

 माझा आवडता ऋतू हिवाळा -Maza Aawadta Rutu Hivala

       
      
              
माझा आवडता ऋतू : हिवाळा
माझा आवडता ऋतू : हिवाळा.




आपल्याकडे मुख्यतः तीन महत्वाचे ऋतू मानतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. व्यक्ती तितक्या प्रकृती त्याचप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या ऋतूचा आनंद घ्यायला आवडतो. त्यामध्ये मला आवडणारा ऋतू म्हणजे हिवाळा


हिवाळा हा ऋतू साधारपणे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांदरम्यान येतो. हिवाळा जसजसा चालू होतो तसतसे वातावरणामध्ये थंड हवेची झुळूक आपल्याला जाणवू लागते. या ऋतुदरम्यान आपले काही महत्वाचे सणसमारंभही असतात त्यात सर्वात मोठा सण दिवाळी असतो आणि त्याच दरम्यान आपल्याला ह्या थंडाव्याचीही जास्त जाणीव होऊ लागते.

मला हिवाळा 
हा ऋतू जास्त आवडतो कारण ह्या ऋतुदरम्यान दिवसभर वातावरण थंड आणि प्रसन्न करणारे वाटते. ऊन आले तरी तितका जास्त उकाडा जाणवत नाही. पहाटेच्या वेळी रस्त्यात सगळीकडे धुक्याची जी चादर पसरलेली असते ती अनुभवायला मला खूप आनंद वाटतो. या दिवसांमध्ये सकाळी जसे थोडे उशिरा उजाडते तसेच रात्री अंधारही लवकर पडतो. माझी शाळा सकाळची असल्यामुळे मला नेहमी या सगळ्या निसर्गाचा सुखद अनुभव मिळतो. सकाळी लवकर उठून थंडी मध्ये शाळेची तयारी करताना थोडीशी तारांबळ उडते खरी परंतु मज्जाही खुप येते. पण कधी कधी मला या थंडीच्या दिवसात शाळेत जायला कंटाळा येतो कारण असं वाटते की मस्त ऊबदार रजाई अंगावर घेऊन खूप उशिरापर्यंत झोपूनच राहावे. 

या हिवाळा ऋतुमध्ये बाजारात माझी आवडती फळेही येतात जसे द्राक्षे, सफरचंद इत्यादी. बाबा ती फळे माझ्यासाठी आवर्जून घरी आणतात. आई हिवाळ्यात आमच्यासाठी निरनिराळ्या भाज्यांचे स्वादिष्ट असे सूप बनवते. ऊबदार कपडे घालून मस्त असे आईच्या हातचे भाज्यांचे सूप पिण्याची मज्जा काय वेगळीच आहे.

या दिवसात गोष्ट म्हणजे याच हिवाळ्यात बहुतेक लोक आपल्या कुटूंबासोबत, मित्रमंडळी सोबत सहलीला जाण्याचे बेत आखतात. त्याचप्रमाणे आमच्या शाळेची सहलही प्रत्येकवर्षी याच वेळी असते. आणि त्यावेळी आम्ही सगळे मित्रमैत्रिणी खूप मज्जा करतो.

हा हिवाळा ऋतू तसा खरंच आनंददायी असतो परंतु शाळेत जाताना मी या ऋतूमुळे होणारे काही दुष्परिणामही पहिले आहेत. जसे की सकाळच्या वेळी खूप धुके असल्यामुळे कधी कधी गाडयांना समोरासमोर येणारी गाडी दिसत नाही त्यामुळे कधी कधी आकस्मित अपघातही होतात. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील राहणाऱ्या गरीब लोकांना पुरेसा आसरा नसल्यामुळे त्यांना थंडीमध्ये कुडकुडत राहावे लागते. ते बघून मला खूप वाईट वाटते. कधी कधी मी बाबांबरोबर जाऊन त्या गरीब मुलांना मला न होणारे माझे थंडीचे कपडे पण देतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला ही खूप आनंद होतो.

असा हा हिवाळा ऋतू कधी येतो याची मी नेहमी वाट बघत असतो. आणि मला हिवाळा खूप खूप आवडतो.


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close