Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शुभेच्छा पत्र मराठी - आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र - Aaila Matrudinachya Shubhecha Denare Patra - Letter Writing In Marathi.

शुभेच्छा पत्र मराठी - आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र - Aaila Matrudinachya Shubhecha Denare Patra - Letter Writing In Marathi.



            
शुभेच्छा पत्र मराठी - आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र - Aaila Matrudinachya Shubhecha Denare Patra - Letter Writing In Marathi.
शुभेच्छा पत्र मराठी - आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र



तुमच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.



दिनांक -

प्रिय / आदरणीय आईस,
साष्टांग नमस्कार,

कशी आहेस? आज जवळपास आठ दिवस झाले तू गावी गेली आहेस. तेव्हापासून तुझा काही निरोप नाही म्हणून पत्र लिहीत आहे. आई, गावी मामाच्या लग्नासाठी तू गावी गेल्यापासून मला तुझी खूप आठवण येत आहे. परंतु माझी परीक्षा असल्यामुळे मी येऊ शकलो नाही याची मला खूप खंत आहे.

मी तुला पत्र लिहीत आहे कारण, उदया जागतिक मातृदिन आहे व त्याबद्दल माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. आई, माझ्याकडून तुला या दिलेल्या शुभेच्छा म्हणजेच आजपर्यंत तू माझ्यासाठी जे कष्ट सहन केले आहेस, माझ्या चांगल्या भविष्यासाठी तू जी मेहनत माझ्यावर घेतली आहेस त्याचबरोबर तू माझ्या आजारपणात माझी जी काळजी घेतली आहेस व मला चांगली शिस्त लागावी म्हणून वेळोवेळी मनावर दगड ठेवून माझ्या भल्यासाठी तू जे कठोर निर्णय घेतले आहेस त्या सर्वांची एक छोटीशी पोचपावती म्हणून मातृदिनाच्या दिवशी या शुभेच्छा मी तुला देत आहे.

आई तुझी जागा माझ्या आयुष्यात इतर कोणी ही कधीच घेऊ शकणार नाही व तुझा मुलगा असल्याचा मला नेहमी खूप अभिमान राहील.

मी माझा अभ्यास व्यवस्थित करीत आहे तेव्हा तू माझी जरा ही काळजी करु नकोस. तू तिकडे लग्नामध्ये निश्चिंत राहा व मजा कर आणि लवकर परत ये. मला तुझी खूप आठवण येते. आजोबा आजी आणि मामाला माझा नमस्कार सांग.

तुझा मुलगा,
विकास.
ई-मेल - [email protected]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close