Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाळेची सहल- Shalechi Sahal- मराठी निबंध -School Picnic Essay In Marathi - वर्णनात्मक

 शाळेची सहल | Shalechi Sahal | School Picnic Essay In Maathi |


           
शाळेची सहल
शाळेची सहल.


मित्रमैत्रिणींनो, शाळेची सहल म्हणजेच आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. वर्षभर आपण याच एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आज मी तुम्हाला शाळेची सहल याच विषयावर माझा अनुभव सांगणार आहे.

मी पाचवीला असतानाची गोष्ट आहे. डिसेंबर महिना उजाडला होता. गुलाबी थंडी सुरु झाली होती. शाळेत आता विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. एके दिवशी मराठीच्या तासाला शिपाई काका सूचना घेऊन आले की पुढील शनिवारी आपल्या शाळेची सहल जाणार आहे. बाईंनी जशी ही सूचना वाचली तसे वर्गात एकच कल्लोळ सुरु झाला. सगळी मुले आनंदाने ओरडू लागली. आम्हा सगळ्यांना खूपच आनंद झाला होता. याच दिवसाची वाट आम्ही नेहमी बघत असायचो.

सुचना वहीत लिहिले होते की शाळेची सहल ही वॉटर किंगडम मध्ये जाणार आहे. मला तर हे पुढील आठ दिवस कधी संपतात असे झाले होते. गेल्या वर्षी माझ्या ताईच्या वर्गाची सहल तिथेच गेली होती. तिने काय काय मज्जा केली ते घरी येऊन सांगितले होते. त्यामुळे मला पण एकदा वॉटर किंगडमला जाण्याचे कुतूहल होते. आणि आता मला ती संधी मिळाली होती. त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. एक एक दिवस जसजसा पूढे जात होता तस तसें मला अजूनच हुरूप येत होता. आम्ही सगळे मित्र रोज मधल्या सुट्टीमध्ये बसून सहलीला काय काय मज्जा करायची त्याचे बेत आखत राहायचो.

अखेर तो सहलीचा दिवस उजाडला. बाईंनी आम्हाला सकाळी सात वाजता शाळेमध्ये जमायला सांगितले होते. आईने मला सकाळी सहा वाजता उठवले आणि मी सगळी तयारी करून वेळेत शाळेत पोहचलो. माझे इतर मित्र ही तिकडे जमा झाले होते. हळू हळू मुले जमा होत होती. सगळे खूपच आनंदित होते. सहलीसाठी शाळेतून तीन बसेस निघणार होत्या. 

माझ्या वर्गातील मुलांसाठी लाल रंगाची दोन नंबरची बस सांगितली होती. बाईंनी एकेकाला बसमध्ये पाठवायला सुरुवात केली. मी आणि माझा आवडता मित्र विजय आम्ही बाजूबाजूला बसलो होतो. सगळी मुले आता बसमध्ये जमा झाली होती आणि त्याचबरोबर दोन शिक्षिका आणि एक शिपाई काका ही आमच्या बस मध्ये होते. ड्राइव्हर काकांनी बस समोर नारळ फोडला आणि आता बस सुरु झाली आणि जशी बस सुरु झाली तसें सगळी मुले "गणपती बाप्पा मोरया" असा जोराने ओरडू लागली.

जसं जशी बस वॉटर किंगडमच्या दिशेने जाऊ लागली तस तसें हिवाळ्याच्या थंडीची जाणीवही आम्हाला होऊ लागली. आईने मला ऊबदार स्वेटर घालूनच पाठविले होते. आम्ही सर्व मुले मुली आता बसमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळू लागलो होतो. खूप गोंधळ सुरु झाला होता. काही मुले गप्पा मारत होते तर काही जागेवरच गाणी गोष्टी करत होते. काही जण तर फक्त बसच्या खिडकीतून येणारी थंड हवेची झूलूक अनुभवत होते. एक दोन जणांना मळमळत ही होते.

अखेर बस वॉटर किंगडमला पोहोचली आणि खाली उतरताच आम्ही सगळे खूपच खुश झालो होतो. गेल्या गेल्या आम्हाला बाईंनी नाश्ता दिला. नाश्ता खाऊन झाल्यानंतर आम्ही एकेका राइडसवर खेळायला जात होतो. तिथे दोन तिने अश्या उंचच्या घसरगुंड्या होत्या की त्या थेट पाण्यात घेऊन जात होत्या. मला भीती वाटत होती पण एक एक करून आम्ही सगळे त्या घसरगुंडी मधून थेट पाण्यात गेलो. पुढे रेन डान्स पण होता आम्ही सगळे तिकडे जाऊन पण वेगवेगळ्या गाण्यावर ताल देऊन खूप थिरकलो.

आणखी पुढे गेल्यावर हॉरर शोच्या दिशेने आम्ही गेलो. आत गेल्यावर तिथे मिटट अंधार होता. जसं जसे पावले पुढे जात होती तस तशी भीती वाढवणारे प्रसंग होत होते. हाडंचे सापळे मधेच येत होते, मांजरीचा आवाज, मोडका पूल, बारीक मिणमिणारे दिवे, आणि जोडीला भीतीदायक संगीत खूपच भयानक होते सगळे. मी आणि माझा मित्र एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तरीही मध्ये मध्ये कींकाळ्या ऐकल्यावर आम्ही ही घाबरून ओरडत होतो. तो एक न विसरण्यासारखा विलक्षण अनुभव होता.

थोड्या वेळाने आम्हा सर्वाना खूप भूक लागली होती. म्हणून आम्ही आपापल्या घरून आणलेले डब्बे खाल्ले. बाईंनी पण आम्हाला केक आणि चॉकलेट दिले. पाण्यात खेळून आम्ही आता खूपच दमलो होतो. खेळून खेऊन माझे पाय तर खूप दुखू लागले होते.

शेवटी संद्याकाळचे पाच वाजले. आता आम्ही सर्व मुले पुन्हा आपापल्या बस मध्ये जाऊन बसू लागलो. बाईंनी एक एक करून सगळ्या मुलांची उपस्थिती घेतली. सगळे बरोबर बस मध्ये आलेले बघून बस सुरु करण्यात आली. बस शाळेच्या दिशेने निघू लागली.

सगळी मुले इतकी दमली होती की आता परत जाताना कोणीही गाण्याच्या भेंड्या खेळत नव्हते परंतु सहलीला कोणी कोणी काय मज्जा केली, कोणाची पाण्यात कशी काय फजिती झाली यावर सगळे जोरजोरात गप्पा मारत होते. वॉटर किंगडम मधूनपरत घरीच येऊ नये असे मला झाले होते. मी खूपच मज्जा केली होती. कधी एकदा घरी जाऊन आई बाबा आणि ताईला मी आज सहलीला केलेली मज्जा सांगतोय असं मला झालं होते.

शेवटी बस शाळेमध्ये आली. मी खिडकीतून बाहेर पहिले तर आई मला घरी न्यायला आली होती. आम्ही सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि आपल्याला घरी गेलो ते सहलीच्या या गोड आठवणी घेऊनच. अशी ही माझी वॉटर किंगडमची सहल मी कधीच विसरणार नाही.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close