माझे आवडते फळ आंबा- Majhe Aawadte Fal Aamba.
मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझे आवडते फळ आंबा या विषयावर निबंध बघणार आहोत.
दरवर्षी उन्हाळा आला की शाळेला सुट्ट्या सुरू होतात आणि मग मला वेध लागतात ते गावी जाण्याचे. मे महिन्याच्या सुट्टीत मी नेहमी गावी जातो कारण मला माझे गाव खूप आवडते आणि त्यावेळी मला विशेष करून एका गोष्टीचा आनंद पुरेपूर घेता येतो तो म्हणजेच माझा आवडता फळ आंबा खाण्याचा.
हो! माझा आवडता फळ आंबा आहे. आंबा म्हंटल की माझ्या तोंडाला पाणी सुटते. माझ्या गावी आजोबांनी आंब्याची खूप झाडें लावलेली आहेत. मग काय गावी गेलो की मला आंबेच आंबे खायला मिळतात. मला पिवळसर रसदार आंबा खायला खूप आवडतो.
आंब्याच्या खूप वेगवेगळ्या जाती आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती याच प्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या जातींचे आंबे खायला आवडतात. आंब्याच्या जरी अनेक जाती असल्या तरी आम्हा मुलांना सर्वच प्रकारचे आंबे खायला आवडतात कारण आंबा हे फळ असे आहे की ते कोणत्याही जातीचे असले तरी ते चविष्टच आणि हवेहवेसेच वाटते. आंब्याच्या प्रकारमध्ये मुख्यत: सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजेच "हापूस आंबा." गाव असो की मुंबई हापूस आंब्याची आवड आणि मागणी सर्वत्र जास्तच असते.
लहानांपासून थोरांपर्यंत हापूस आंबा सर्वांच्या पसंतीला पहिला उतरतो. आंब्यांच्या अजूनही निरनिराळ्या जातींमध्ये पायरी आंबा, तोतापुरी आंबा, केसरी आंबा, सिंधुरी आंबा, रायवळ आंबा, बदामी आंबा, गोवा माणकुर, रत्ना आंबा, गुलाब आंबा असे प्रकार मिळतात. त्यामध्ये मला हापूस आंबा व तोतापुरी आंबा खायला खूप आवडतात.
आंबा हे फळ जास्त प्रसिद्ध आहे ते त्याच्या मधुर अशा गोडसर चवीमुळे परंतु त्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच आंबा हे फळ संपूर्ण पिकण्यापूर्वी कच्च्या अवस्थेत असते त्याला कैरी असे म्हणतात ती कैरी ही सर्वांच्या खूप पसंतीची असते.
कैरी म्हणजेच आंबट गोड चवीचे असलेले आंब्याचे कच्चे स्वरूप. कैरीचे पन्हे, गुळंबा आणि महत्वाचे म्हणजेच कैरीचे लोणचे बनवितात. माझी आजी कैरीचे लोणचे खूप छान बनविते. मला तिच्या हातचे कैरीचे लोणचे आणि गुळंबा खूप आवडतो.
उन्हातून खेळू आल्यावर माझी आई जेव्हा मला थंडगार कैरीचे पन्हे देते तेव्हा मला आलेला थकवा लगेच निघून जातो. कैरीची एक विशेष गोष्ट म्हणजेच कैरीचे छोटे छोटे काप करून फक्त त्याला मीठ लावून खाल्ले तरी ही मस्त चव लागते. कैरी पूर्ण पिकली की तिचे आंब्यात रूपांतर होते.
आंबा फक्त खायला जितका चविष्ट लागतो तितकाच त्याचे आमरसही खूप चविष्ट लागते. मला जेवणात आमरस पुरी खायला खूप आवडते. आंब्यापासून आंब्याचे साट ही तयार करतात. आंब्याचे आंम्रखंड ही बनवितात.
आंबा जसा नुसता खाण्यासाठी ही चांगला लागतो तसेंच त्याच्यापासून बनलेले असे वेगवेगळे प्रकारही खूप चांगले लागतात आणि त्यामुळे तो आपल्याला निरनिराळ्या स्वरूपात निरनिराळी चव देतो. म्हणूनच त्याला फळांचा राजा असे म्हणतात.
त्यामुळे माझा हा आवडता फळ आंबा सर्वच फळांमध्ये नेहमीच माझी पहिली पसंती राहिलेला आहे आणि तसाच कायम राहील.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.