माझा आवडता ऋतू उन्हाळा | Majha Aawadta Rutu Unhala | My Favorite Season Summer Essay In Marathi |
आपल्याकडे मुख्यतः तीन ऋतू मानले जातात. त्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू येतात. त्यात मला उन्हाळा हा ऋतू जास्त आवडतो.
आपल्यापैकी कित्येकांना हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू आवडतात पण उन्हाळा हा ऋतू खूप कमी लोकांना आवडतो त्यापैकी मी एक आहे. कारण उन्हाळा म्हंटल की उष्णतेच्या वाफा, प्रचंड गरमी आणि अंगाची लाही लाही होणे हे प्रकार होतात असे बहुतेकांचे म्हणणे आहे परंतु याच उन्हाळा ऋतूच्या काही चांगल्या बाजुही आहेत त्याबद्द्ल आज आपण बघूया.
उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या महिन्यात असतो. होळी हा सण येऊन गेला की हळू हळू उन्हाळा ऋतू आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या चार महिन्याच्या थंडीनंतर येणारा उन्हाळा हा ऋतू जसं जसा पुढे जात राहतो तसतसे आपल्याला वातावरणात उष्णता जाणवू लागते.
मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण उन्हाळा ऋतू आला की आमच्या शाळेच्या वार्षिक परिक्षा संपून शाळेला मस्त एक ते दीड महिना सुट्टी पडते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या गावी जातो. मला माझे गाव खूप आवडते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी आई आवर्जून मला नवीन कॉटनचे सुती कपडे घेते जेणेकरून मला उन्हाच्या गरमीचा त्रास होणार नाही. उन्हाळा हा ऋतू मला यासाठी ही आवडतो कारण इतर दोन्ही ऋतूमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सतत स्वेटवर किंवा रेनकोट स्वतःजवळ बाळगावे लागते परंतु उन्हाळ्यात असे काहीही करावे लागत नाही. मस्त सुटसुटीत सुती कपडे घालून मी बाहेर मित्रांबरोबर खेळायला जातो.
उन्हाळा ऋतू आला की शाळेला सुट्टी तर पडलेलीच असल्यामुळे बाबा मला नेहमी कुठे ना कुठे फिरायला घेऊन जातात. सकाळी उठलो की अभ्यास नाही की शाळा नाही. मस्त आरामात उठून आईने बनविलेले थंड कलिंगडाचे रस पिऊन आम्ही मित्र एकमेकांच्या घरी जाऊन कॅरम किंवा बुद्धीबळ असे बैठे खेळ खेळतो आणि दुपारी थोडे घरी आराम करायचे मग ऊन थोडे कमी झाले की सद्याकाळी बाहेर क्रिकेट खेळायचे हेच आम्हा मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत काम असते.
कलिंगडाच्या रसमध्ये पाण्याची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे माझी आई उन्हाळ्यात मला कलिंगड किंवा त्याचे रस देत असते त्यामुळे बाहेर खेळायला गेल्यावर उन्हाच्या गर्मीमुळे माझ्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी पडणार नाही. कधी कधी जास्तच गरम झाले तर मी थोडेसे थंडगार आईस्क्रिम पण खातो पण जास्त नाही. बाहेर अंधार पडला की घरी येऊन मी थोडे गणिताचे पाठे आणि शुद्धलेखनाचे सराव ही करतो जेणेकरून शाळा सुरु झाली की माझे अक्षर कायम सुवाच्छच राहील.
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये माझा आवडता फळ आंबा हा मला खूप खायला मिळतो. या मे महिन्याच्या काळात खूप आंबे बाजारात येतात त्याचबरोबर गावी ही माझ्या आजोबांनी आंब्याची खूप झाडें लावली आहेत तेथे जाऊनही मी खूप आंबे खातो. माझी आई खूप छान आमरस बनविते. मला आमरस पुरी खूप आवडते. गावी गेल्यावर माझी आजी तिने स्वतः घरी बनविलेले कैरीचे लोणचे मला आवर्जून देते. माझी आजी कैरीचे लोणचे आणि गुळंबा खूप छान बनविते. मला कैरीचे पन्हेही खूप आवडते.
कधी कधी आम्ही मित्र उन्हाळ्याच्या सुट्टीत खास शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या शिबिरातही सहभागी होतो. मला उन्हाळी शिबीरात सहभागी व्हायला खूप आवडते. कारण या शिबिरामध्ये आमच्यातील वेगवेगळ्या कलागुणांना वाव दिला जातो. मग ते चित्रकला असो, किंवा बागकाम, मातकाम किंवा योगासने असो. अश्या वेगवेगळ्या कलांमधून आम्हाला उन्हाळी शिबिरामध्ये तेथील सर खूप छान मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे आमच्या सुट्टीतील वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही आणि हसत खेळत आम्ही नवीन कला शिकून घेतो.
उन्हाळी शिबिरामध्ये आम्हाला स्वसंरक्षणासाठी कराटेचे काही सरावही शिकवले गेले आहेत. त्याच बरोबर गणितातील सोप्या कृप्त्याही हसत खेळत शिकवितात जेणेकरून गणिते सोडविताना आपण ती गणिते अगदी सोप्या पद्धतीने पटापट सोडवू शकू.
गेल्या वर्षीच्या शिबिरामध्ये आम्हाला सभागृहातील मंचवरील वक्तृत्व कला शिकवली गेली होती त्यामुळे आता मी शाळेतील वक्तृत्व स्पर्धेमध्ये मंचावर न घाबरता आत्मविश्वासाने चांगले भाषण करू शकतो.
उन्हाळा ऋतू सुरु झाला की सर्वाना फक्त वातावरणातील गरमी आणि उष्णतेसाठीच दिसतो परंतु उन्हाळा या ऋतूमध्ये मिळालेल्या सुट्टीचा आपण मुले चांगला सदुपयोगही करू शकतो हा विचारही आपण केला पाहिजे.
म्हणून असा हा माझा आवडता ऋतू उन्हाळा हा मला खूप खूप आवडतो.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.