जर मी माझ्या वर्गाचा मॉनिटर झालो तर | Jar Mi Majhya Vargacha Monitor Zalo Tar |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी वर्गाचा मॉनिटर झालो तर या विषयावर कल्पनात्मक निबंध बघणार आहोत.
मे महिन्यातील उन्हाळ्याची शाळेची सुट्टी संपली आणि जुन महिना उजाडला. नेहमीप्रमाणे शाळा सुरु झाली. शाळेचा पहिला दिवस सुरु झाला. नव्या इयत्तेमध्ये गेल्यावर काही जुने मित्र तर काही नवीन मुले वर्गात बसली होती. सगळे गडबड गोधळ आणि दंगा करीत होते.
तेवढ्यात वर्गशिक्षिका वर्गात आल्या आणि म्हणाल्या, "उदया मी तुम्हा सर्वामधून एक वर्ग मॉनिटर निवडणार आहे जो माझ्या गैरहजेरीत वर्गावर लक्ष ठेवेल म्हणजेच तुमचा हा गोधळ जरा कमी होईल!" आमच्या शिक्षिका असे बोलल्यावर माझ्या मनात सारखे हे विचार फिरू लागले की जर मी वर्गाचा मॉनिटर झालो तर......खरंच! जर मी वर्गाचा मॉनिटर झालो तर किती मज्जा येईल ना? आणि मी कल्पनेच्या विश्वात गुंतून गेलो.
वर्गमॉनिटर होणे म्हणजेच वर्गप्रतिनिधी होणे ही खरंच खूप सन्मानाची व गर्वाची गोष्ट आहे परंतु याच बरोबर वर्गमॉनिटर होणे ही खूप जबाबदारीची ही गोष्ट आहे आणि मॉनिटर हे शब्द आपल्या नावापुढे लागल्याबरोबर जसा सन्मान आपल्याला मिळतो त्याचबरोबर खुपश्या जबाबदाऱ्या ही आपल्याला पार पाडाव्या लागतात.
सर्वप्रथम जर मी वर्ग मॉनिटर झालो तर सर्व प्रथम मी शाळेत इतर विद्यार्थ्यांपेक्षा थोडे पहिला शाळेत पोहचण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर मी माझ्या वर्गातील सर्व मुलांना ही वेळेवर वर्गात येण्यास सांगेन जेणेकरून शाळा भरण्याच्या वेळेतच सर्व विदयार्थी वर्गात उपस्थित राहतील याची मी दक्षता घेईन.
जर मी वर्गाचा मॉनिटर झालो तर मी दररोज वर्गातील सर्व मुलांनी वह्या- पुस्तके व्यवस्थित आणली आहेत की नाही ते तपासीत जाईन व सर्वांनी रोज गृहपाठ पूर्ण करून शाळेत यावे यासाठी ही प्रयत्न करेन.
आपल्याच वयाच्या मुलांना शिस्त शिकविणे किंवा त्यांच्याकडून शाळेच्या नियमाचे व्यवस्थित पालन करून घेणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी आपल्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि सहनशक्ती त्याचबरोबर नेतृत्व गुणांची ही आवश्यकता असते या सर्व गोष्टी मी वेळोवेळी स्वतःच्या अंगी अवलंबिण्याचा मी प्रयत्न करीत राहीन.
मी जर वर्ग मॉनिटर झालो तर मी वर्गातील इतर मुलांच्या काही अडी -अडचणी असल्यास त्या शक्य तितक्या मी नीट समजून घेईन आणि त्याअडीअडचणी मी त्यांच्याबरोबर शिक्षकांसमोर मांडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन.
मी जर वर्गाचा मॉनिटर झालो तर मी स्वतः रोज साफ स्वच्छ गणवेश घालून नीटनीटका बनवून शाळेत येत जाईन आणि माझ्या इतर मित्रांनाही स्वच्छतेचे महत्व समजून सांगेन. मी जर वर्ग मॉनिटर झालो तर मी कधीही इतर मुलांवर हुशारकी गजविण्याचा प्रयत्न करणार नाही उलट सर्वाना एकत्र घेऊन आमच्या वर्गाला आदर्श वर्गाचे पारितोषिक मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करेन.
ज्या प्रमाणे मी जर वर्ग मॉनिटर झालो तर मी माझ्या बाजूने एक आदर्श वर्ग मॉनिटर बनण्याचा प्रयत्न करीत राहीनच व माझ्याकडून इतर वर्गमित्रांना सदैव माझी मदच होईल व वर्गशिक्षक व विदयार्थी याच्यातील सामजस्य टिकवणारा मी एक महत्वपूर्ण दुवा बनण्याचा मी सतत प्रयत्न करीन.
कधी कधी जो पर्यंत वर्गशिक्षक वर्गावर येत नाहीत किंवा काही कारणास्तव वर्गबाहेर गेल्या तर संपूर्ण वर्गातील मुलांवर लक्ष ठेवण्याची विशेष जबाबदारी माझ्यावरच येईल. कधी कोणती स्पर्धा असो किंवा काही खेळ किंवा सहल असो या सर्वातही नेतृत्व करण्याची जबाबदारी शिक्षक माझ्याकडेच देतील आणि मी ती प्रामाणिकपणे पर पाडीन.
मग काय! शिक्षक रूम मधून निबंध किंवा चित्रकलेच्या वह्या आणणे असो किंवा खडू किंवा डस्टर आणणे असो मलाच जायला मिळेल त्यामुळे माझी इतर शिक्षकांशी ही चांगली ओळख वाढेल आणि दोन तासिकांच्या मधल्या वेळेत जे विदयार्थी एकमेकांकडे गप्पा मारीत असतील त्यांची नावे मी फळ्यावर लिहीत जाईन. जेणेकरून वर्ग शांत राहण्यास मदत होईल.
पण हो खरंच मला वर्ग मॉनिटरची जबाबदारी पूर्ण करता येईल का? की ही माझी फक्त कल्पनाच आहे? कारण जर मी वर्गमॉनिटर झालो तर जसे त्याचे मला फायदे होतील तसेच त्याचे मला काही प्रमाणात तोटेही होतील. जसे मीच वर्गमॉनिटर असल्यामुळे मला एकही दिवस रजा घेऊन घरी राहता येणार नाही कारण वर्गशिक्षक येईपर्यंत वर्गाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच अवलंबून असल्यामुळे माझ्या गैहजेरीमुळे बाकीचे विदयार्थी वर्गात दंगा करतील परिणामी आमच्या वर्गाला मुख्याधिपिकांकडून शिक्षा ही होऊ शकेल. त्याची जबाबदारी ही मला वर्गप्रतिनिधी म्हणून घ्यावी लागेल.
त्याचप्रमाणे जर मी वर्गमॉनिटर झालो आणि जर वर्गात इतर दोन - तीन मुलांची मारामारी अथवा भांडणे झाली आणि जर त्यावेळी जर मी त्यांना शांत बसवू शकलो नाही तर शिक्षक माझ्यावर रागावू शकतील. कारण मी माझी जबादारी नीट पार पडली नसल्यामुळे कदाचित मी एक आदर्श वर्ग मॉनिटर किंवा वर्गप्रतिनिधी बनू शकणार नाही.
मग खरंच का या वेळी माझ्यामध्ये हे वर्गमॉनिटर बनण्याचे गुण आहेत की मला अजून काही गुण आत्मसात करावे लागतील जेणेकरून मी एक आदर्श वर्गमॉनिटर बनू शकेल? असा विचार माझ्या मनात येत आहे.
म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट तर मला नक्कीच कळली आहे की, जर का एखादे पद आपल्याला मिळाले तर जसे त्या पदाबरोबर आपल्याला फायदे होतात तसेच त्याच्याबरोबर आपल्याला काही जबाबदाऱ्या ही पार पाडाव्या लागतात आणि ती क्षमता व कौशल्य आपण आपल्यात आत्मसात करणे ही महत्वाची गोष्ट असते अन्यथा आपल्याला त्याचे नुकसान होते.
म्हणूनच म्हणतो, जर मी वर्ग मॉनिटर झालो तर... ही कल्पनाच फक्त बरी आहे. पण खरंच वर्गातील जो विदयार्थी वर्ग मॉनिटर हे पद चांगल्या प्रकारे निभावू शकतो व ज्या विद्यार्थ्याकडे आपल्या वर्गातील सर्व मुलांना एकत्र घेऊन शाळेची शिस्त टिकवून ठेवण्याचे नेतृत्व गुण चांगल्या प्रकारे आहेत अशा योग्य त्या विद्यार्थ्यांची वर्गशिक्षिकानी वर्गमॉनिटर म्हणून निवड करावी असे मला मनापासून वाटते.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.