Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी पाहिलेली दहीहंडी - Mi Pahileli Dahihandi Marathi Nibandh - Dahihandi Essay In Marathi.

मी पाहिलेली दहीहंडी | Mi Pahileli Dahihandi Marathi Nibandh | Dahihandi Essay In Marathi |



      
           
मी पाहिलेली दहीहंडी - Mi Pahileli Dahihandi Marathi Nibandh - Dahihandi Essay In Marathi.
मी पाहिलेली दहीहंडी - Mi Pahileli Dahihandi Marathi Nibandh - Dahihandi Essay In Marathi.




मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी पाहिलेली दहीहंडी हया विषयावर वर्णनात्मक निबंध बघणार आहोत.


कालच गोकुळाष्टमीचा दिवस होऊन गेला. गोकुळाष्टमीच्या दिवसाला दहीहंडी हा सण साजरा करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुरु आहे. शाळेला गोकुळाष्टमीनिम्मित सुट्टी जाहीर झालीच होती मग काय आम्ही सगळे बच्चे मंडळी सकाळी लवकर उठून आमच्या बिल्डिंगच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या दहीहंडीच्या दिशेने रवाना झालो.

आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक मोठी अशी दहीहंडी लावण्यात आलेली होती. जवळपास पाच ते सहा मानवी थर तर नक्कीच ही हंडी फोडण्यासाठी लागणार होते हे तिच्या उंचीकडे पाहूनच सर्वांच्या लक्षात आले होते.

आपल्या संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरे करण्याची प्रथा आहेच परंतु त्यातील काही सण म्हणजेच गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि मुख्यतः दहीहंडी या सणाचा जोश आणि आतुरता अबाल वृद्धापासून सर्वांनाच असते आणि त्या एका दिवसासाठी ती हंडी फोडण्यासाठी केला जाणारा जो सराव असतो त्याची तयारी तर प्रत्येक गोविंदा पथक जवळपास एक एक महिना आधीपासूनच करीत असतात.

प्रत्येक जण दिवसभर आपापला कामधंदा सांभाळून मग संद्याकाळी दहीहंडी फोडण्याच्या थरासाठी लागणाऱ्या सरावाला नियमित हजेरी लावतात जेणेकरून आपापल्या पथकातील गोविंदा हे एकावर एक मानवी थर लावण्यात सराईत होऊ शकतील. या प्रत्येक गोविंदा पथकात विशेष लक्षवेधी बाब असते ती म्हणजेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार लहान गोविंदा.

आमच्या बिल्डिंगची दहीहंडी दुपारपर्यंत बांधून पूर्ण झाली होती आणि मग आतुररता होती की कोणत्या गोविंदा पथकाकडून ही मानाची हंडी फोडण्यात येईल याची. दहीहंडीचा दिवस सुरु झाला आणि सकाळपासून दहीहंडीची गाणी येणाऱ्या गोविंदामध्ये जोश आणण्यासाठी लाउस्पीकरवर लावण्यात आली होती. आम्हा सर्व लहान मुलांना तर हया जल्लोष्याच्या वातावरणात खूपच मज्जा येत होती.

हळू हळू जशी संद्याकाळ होऊ लागली तस तसे एक एक गोविंदा पथक आमच्या दहीहंडीजवळ पोहचू लागले. त्यातील अनेक गोविंदा हे मोठमोठ्या ट्रक मधून, बसेस मधून व काही गोविंदा तर मोटारसायकल वरून ही येताना दिसले आणि सुरु झाली ती एकावर एक मानवी मनोरे रचण्याची कसरत.

जस जसे ते गोविंदा एकावर एक मानवी मनोरे रचत वर वर उंचावर चढत होते तस तसे ही दहीहंडी बघणाऱ्या आलेल्या प्रेक्षकांच्या उत्सहात भर पडीत होती. एक पथक, दुसरे पथक, तिसरे पथक आले आणि त्या मनाच्या दहीहंडीला फक्त सलामी देऊन निघून गेले.

दहीहंडी फारच उंचावर बांधली गेली असल्यामुळे बहुतेक गोविंदा पथक हे फक्त थर लावून हंडीला सलामी देत निघून जात होते. हळू हळू सद्याकाळचे सात - साडेसात वाजत आले. आता मात्र दहीहंडी फोडताना बघण्यासाठी जमलेल्या लोकांची गर्दी ही खूपच वाढू लागली होती. येणा - जाणाऱ्या गोविंदा पथकांचे धैर्य वाढविण्यासाठी व त्याच्यातील ऊर्जा टिकावून ठेवण्यासाठी सतत दहीहंडीची गाणी सुरु होती.

शेजारीच एक मंच बांधला गेला होता त्यावर मानाची ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी एक मोठी ट्रॉफी आणि मानधन बक्षीस म्हणून ठेवले होते त्याचबरोबर अनेक मोठ्या अतिथीना ही त्या बक्षीसाचे वाटप करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते.

आता प्रतीक्षा होती ती फक्त हंडी फुटण्याची आणि तेवढ्यात मोठा गोंधळ ऐकू येतो व एक मोठी बस भरून एका प्रतिष्टीत गोविंदा पथकाचे अगदी दिमाखात आगमन झाले.

बस दहीहंडीजवळ थांबताच त्यातून अनेक वेगवेगळ्या वयाचे गोविंदा पटापट बाहेर आले. त्यात काही वयस्कर लोक ही होते जे तरुण गोविंदाना मार्गदर्शन करीत होते तर काही लहान लहान मुले ही होती. काही क्षणातच त्या सर्व गोविंदानी एकमेकांना व्यवस्थित सांभाळीत मानवी मानोरा रचण्यास सुरु केली.

एक एक करून सात थर लागले आणि शेवटच्या थरावर एक लहानगा गोविंदा सरसर चढत गेला. त्याने दहीहंडी फोडण्याआधीच तिला सलामी दिली व दहीहंडीला नमस्कार केला त्यावेळी त्याला सावरणारे खालील सहाही थर थोडेसे हलत होते व एकमेकांना सावरत असल्याचे आम्हाला दिसत होते.

जसे त्या शेवटच्या थरावरील गोविंदाने हंडीला हात लावला तेव्हा खाली जमा असलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचा जीव टांगणीला लागला होता. जमालेला प्रत्येक जण आपापल्या मोबाइलमध्ये दहीहंडी फुटत असतानाचा तो विलक्षण क्षण टिपण्यासाठी आतुर झाला होता. अनेक मोबाईल त्या क्षणाचे चित्रीकरण करण्यासाठी सज्ज्ज झाले होते आणि शेवटच्या थरावरील गोविंदाने क्षणार्धात दहीहंडी फोडली आणि
आमचा परिसर टाळ्यांच्या कडकडाने भरून निघाला.

जोरजोरात गाणी वाचू लागली आणि इतक्यातच पाचव्या थरावरील एका गोविंदाचा खाली उतरण्याआधीच चुकून मध्येच तोल गेला व तो खाली पडताना आम्हाला दिसला व आनंदाच्या वातावरणात जमलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.

काही वेळासाठी अगदी भयाण शांतता पसरली होती व आनंदाच्या हया क्षणाला कुठे तरी आता गालबोट तर लागणार नाही ना ह्याची काळजी सर्वाना लागली. लगेचच त्याच्याजवळ सारे जमा झाले होते आणि लांबून आम्हाला मात्र काहीच कळात नव्हते की नक्की काय झाले आहे.

त्याला जास्त लागले तर नसेल ना हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतानाच अचानक पुन्हा सारे जण जोरजोरात नाचू लागले होते आणि मग बातमी आली की त्याला खाली असलेल्या त्याच्या इतर गोविंदा मित्रांनी झेलले होते. हे कळताच आजच्या आनंदात विरजण पडता पडता वाचले होते.

त्यानंतर त्या सर्व गोविंदांवर जल्लोष आणि शुभेच्छाचा वर्षाव सूरु झाला होता. त्या गोविंदा पथकाला मानाने त्यांची विजयाची ट्रॉफी आणि मानधन देऊन गौरविण्यात आलेले होते.

मानाची ही दहीहंडी फोडून व आपले बक्षीस घेऊन ते गोविंदा पथक आपल्या पुढील प्रवासासाठी निघून गेले व तेथे जमलेली अफाट गर्दी ही हळू हळू ओसरू लागली होती पण मला मात्र तेथून निघूच नये असे वाटते होते.

आज मी पाहिलेल्या हया दहीहंडीमुळे मला एक गोष्ट हया सणामुळे शिकण्यास मिळाली ती म्हणजेच एकजूट व एकमेकावरील विश्वासावर आपण कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. आता मला प्रतीक्षा आहे ती म्हणजेच पुढील वर्षीच्या दहीहंडीची.




आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close