Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझा आवडता ऋतू पावसाळा - Majha Aawadta Rutu Pavsala - मराठी निबंध - My Favorite Season Rainy Essay In Marathi- वर्णनात्मक.

माझा आवडता ऋतू पावसाळा - Majha Aawadta Rutu Pavsala.


       
माझा आवडता ऋतू पावसाळा - Majha Aawadta Rutu Pavsala
माझा आवडता ऋतू पावसाळा




मित्रमैत्रिणींनो, लहानपणापासून आपल्या सर्वाना कोणता ना कोणता ऋतू नक्कीच आवडतो. त्याचप्रमाणे मला पावसाळा हा ऋतू आवडतो. त्याबद्दल आज आपण निबंध बघणार आहोत.

पाऊस म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वाना आवडणारा एक ऋतू. पावसाळा दरवर्षी साधारणत: जुन ते सप्टेंबर महिन्यादरम्यात असतो. म्हणजेच मराठी महिन्यात सांगायचे झालेच तर पावसाळा हा जेष्ठ ते भाद्रपद महिन्यादरम्यान असतो. आपल्याकडे मुख्यतः तीन ऋतू मानले जातात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण त्यातील पावसाळा हा एकच ऋतू असा आहे की जो त्याच्या चारही महिन्यात आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या छटा दाखवितो. म्हणजेच जेष्ठ आषाढातील पाऊस हा नेहमी जोरदार असतो तर श्रावणातील पाऊस हा रिमझिम करीत असतो. कधी कधी तर हा पाऊस आपल्याकडे ऊन पावसाचा खेळ खेळतो. कधी आपल्याला सुंदरसा इंद्रधनुष्य दाखवतो. इतर दोन्ही ऋतुच्या तुलनेत पाऊस या आपल्याला वेगवेगळ्या छटा दाखवितो हे त्याचे विशेष वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पावसात निसर्गाला जणू काही स्वर्गाचेच रूप प्राप्त झालेले असते.

पहिला पाऊस आला की सगळे जणच खूप आनंदित होतात. मनुष्यापासून ते अगदी प्राण्यापर्यंत पहिला पाऊस आल्याचा आनंद सगळ्यांचा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पाऊस सुरु झाल्यावर वर्षाराणीचे हे आगमन म्हणजेच जणू काही सुखाची पर्वणीच असते.

पहिल्या पावसात मातीला सुंदर सुगंध येतो. उन्हाळ्याच्या गरमीमुळे हैराण झालेल्या प्रत्येकाला पाऊस सुरु झाल्यानंतर थोडासा थंडावा मिळतो. पावसाळ्यात झाडांची पाने टवटवीत दिसू लागतात. सहलींचे बेत आखले जातात आणि तरुण मंडळी तर धबधब्याखाली मनसोक्त डुंबूनच घेतात.

मला तर पाऊस आला की खूपच मज्जा येते. बाजारात सगळीकडे नवीन रेनकोट, छत्र्या विकण्यास आलेल्या असतात. मला पण माझे बाबा नवीन रेनकोट घेतात. पावसाळी चप्पलही घेतात. मी खूप खुश असतो. सगळे काही नवीन असते. त्याचदरम्यान शाळा पण सुरु झालेली असते. कधी एकदा मी माझ्या मित्रांना भेटतो असे मला झालेले असते.

शाळेचा पहिला दिवस जवळ येत असतो आणि पाऊसही थोडा थोडा सुरु झालेला असतो. कधी कधी शाळेत जाताना पाऊस येतच नाही आणि मी वाट बघत राहतो परंतु एक दिवस अचानक शाळेत जाता जाता पाऊस येतो आणि पाऊस आला की आम्ही रेनकोट घालून शाळेसाठी घराबाहेर निघतो.

पाऊस पडत असताना रस्त्याने जाताना साचलेल्या पाण्यात हळूच उडी मारायला मला खूप आवडते. शाळेचे कपडे दप्तर थोडे ओले होते पण मी पावसाचा मनसोक्त आनंद घेतो. निसर्ग खूप सुंदर झालेलं असते आणि सगळी झाडें हिरवेगार झालेली असतात. उन्हाच्या लाहीमुळे तापलेली गरम जमीन थंड झालेली असते त्यामुळे वातावरणातही एकप्रकारचा सुखद गारवा जाणवू लागलेला असतो.

मला जास्त मज्जा तर तेव्हा येते जेव्हा मोठा पाऊस पडल्यामुळे माझ्या शाळेला सुट्टी मिळते. पण कधी कधी दोन तीन दिवस सलग पाऊस पडत राहिला तर मग घराबाहेर खेळायला जायला मिळत नाही मग मात्र मला थोडा कंटाळा येतो परंतु मग मी मात्र घरीच राहून माझ्या आजोबांसोबत थोडे घरगुती व्यायाम आणि योगा करतो आणि मग घरीच बैठे खेळ ही खेळतो.

शहरातील पावसात काही लोकांचे हाल होतात. कारण रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचते, नाले तुडुंब भरतात, कधी कधी विजही जाते, तर बहुतेक लोक कामासाठी रेल्वे प्रवास करतात तेव्हा काही वेळेस जास्त पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मधेच गाडी बंद पडते व उरलेला प्रवास त्यांना चालतच करावा लागतो त्यामुळे त्यांचे खुप हाल ही होतात. यांचप्रमाणे कधी कधी बसेस ही रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यामुळे पुढे जाऊ शकत नाहीत. त्या ही एकच जागी अकडून राहतात. रस्त्यावरची किती तरी झाडें मोठ्यां वाऱ्यामुळे उन्मळून पडतात. परंतु अश्या किती ही छोट्या मोठ्यां अडचणी असल्या तरी शहरी लोक ही हया पावसाचे स्वागत आनंदानेच करतात.

पण गावाकडील पावसाची तर मजाच निराळी असते. गावातील पावसाचे वातावरण तर काही वेगळेच अनुभव देणारे असते. ते शब्दांत न सांगण्यासारखे आहे. गावातील पाऊस म्हणजेच सुखद असा, गारा पडणारा आणि चारही बाजूने जणू हिरवीगार शाल ओढलेली झाडें झालेली असतात. शेतकऱ्यांसाठी तर पाऊस म्हणजेच एकप्रकारे वरदानच असतो. या दिवसांत शेतीची सुरवात झालेली असते. पावसाळ्याच्या या चार महिन्यात तर आपले पारंपरिक सण, व्रत वैकल्य सुरु होतात त्यामुळे विशेषत: गावी या पावसाच्या सुखद थंड वातावरणत लोक वेगवेगळे सण मोठ्यां उत्साहाने साजरे करतात.

माझे गाव हे आजूबाजूला संपूर्ण डोंगर असलेले व संपूर्ण हिरवळीच्या आच्छादानात मधेच वसलेले असल्यामुळे पावसात तर ते खूपच सुंदर दिसते. म्हणजेच गावी असो किंवा शहरात असो पण कुठेही असो तरी शेवटी पाऊस हा ऋतूच मन प्रसन्न आणि उल्हासित करून टाकतो एवढे नक्की.

हो पण पावसाळा जरी हवाहवासा वाटणारा असला तरी पावसाळा आला की त्याच्याबरोबर काही आजारपणसुद्धा येतातच. याच काळात साथीचे रोगही खूप पसरतात. कावीळ, डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजारांपासून या पावसाळी दिवसात सावध राहावे लागते. या वेळी मुख्यतः पाणी जास्त उकळून प्यावे. बाहेरून आणलेल्या भाज्या व अन्नपदार्थ व्यवस्थित धुवून घ्यावी व जसे या पावसाचे आपण मनसोक्त आनंद घेतो तसेच या पावसाळी दिवसात आपण आपली स्वतःची काळजीही घेतली पाहिजे तरच आपला आवडता पावसाळा हा ऋतू आपण आनंदाने अनुभवू शकतो आणि तो आपल्याला अजून सुखकारक ठरू शकतो.



आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close