मी क्रिडांगण बोलतोय | Mi Kridangan Boltoy|
मित्रमैत्रिणींनो, आज आपण क्रिडांगणाची आत्मकथा किंवा क्रिडांगणाचे मनोगत बघणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, ओळखलत का मला? मी क्रिडांगण बोलतोय! होय बरोबर ऐकलत तुम्ही. मी क्रिडांगण बोलतोय! आज मला तुमच्या सर्व मित्रांकडे काही बोलायचे आहे.
मी क्रिडांगण. तुमचा बालपणीचा मित्र. जिथे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्ही संपूर्ण दिवसभर खेळत असायचात तो मी. रविवार असो किंवा एखादया सणाची सुट्टी तुम्हा मुलांची पहिली पसंती मीच असायचो.
मी क्रिडांगण तुम्हा सर्वाना गेल्या कित्येक पिढ्यापासून बघत आलेलो आहे. ऋतू कोणताही असो उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा चक्क पावसाळा असो मी कधीच एकटा नसायचो. नेहमी मुलांनी गजबजून भरलेला मी आज अगदी एकता पडलोय रे!
पूर्वी दिवसभर या क्रिडांगणावर पहाट झाली की लोकांची हळू हळू गर्दी व्हायला सूरू व्हायची. मॉर्निंग वॉक करणारी मंडळी, योगा करणारी मंडळी आणि सकाळीच सकाळी क्रिकेटचा सराव करणारी मुले हे सगळे इथे येत असत. सुट्टीत तर काही मुले संपूर्ण दुपार इथे खेळत असत. त्यांना ना भूक ना तहान फक्त क्रिडांगण व खेळ एवढेच त्यांचे विश्व झालेले असे.
मी क्रिडांगण गेल्या कित्येक पिढ्याच्या भवितव्याचा साक्षीदार आहे. याच क्रिडांगणात खेळून, वेगवेगळ्यात खेळांचा सराव करून कितीतरी मुळे चांगले खेळाडू झालेले मी पहात आलेलो आहे. कोणी क्रिकेटचा सराव करण्यासाठी तर कोणी जिमन्यास्टिकचाचा सराव करण्यासाठी तर काही मुले कराटेचा सराव करण्यासाठी येथे जमा होत असत. कोणी खो खो तर कोणी कबड्डी, कोणी वोलीबॉल तर कोणी फुटबॉल खेळणारे सगळेच जण तर माझे मित्रच होते.
माझ्या डोळ्यासमोर याच ठिकाणी किती तरी खेळाच्या मॅचेस झाल्या आहेत, त्यातील किती तरी जणांच्या विजयाच्या आनंदात मी ही आनंदी होत असे आणि कित्येक जणांच्या परभवाच्या दुःखात प्रसंगी मी ही दुःखी झालेलो आहे. मागील कित्येक वर्षे मी हे सारे सारे माझ्या हया डोळ्यादेखत बघत आलेलो आहे. जिंकल्यावर या क्रिडांगणावर वाकून डोकं ठेऊन नमस्कार करणारे या क्रिडांगणाचे आभार मानणारे माझे खेळाडू मित्र, याच क्रिडांगणावर बक्षीस समारंभात माझा म्हणजेच क्रिडांगणाचा आवर्जून उल्लेख करणारे माझे ते मित्र आज इथे नाहीत. कुठे गेलात रे मित्रांनो तुम्ही सगळे?
आज का बरे इथे येत नसतील खेळाची आवड असणारे माझे ते सगळे मित्र? का बरे आजच्या पिढीला माझा आवडता मैदानी खेळ विचारले तर एखादे पण नाव सांगता येत नसेल? कारण आजची तुम्ही मुले टेकनॉलॉजिच्या दुनियेत रममाण झालेले आहात. मोबाईल आणि विडिओ गेमला तुम्ही तुमचे संपूर्ण विश्व बनवून टाकले आहे. सुट्टीच्या दिवशी तर सकाळपासून रात्रीपर्यंत या गोष्टी तुमच्या हातातून सुटतच नाही.
काही वर्षांपूर्वी, मुले वेळ मिळाला की लगेच क्रिडांगणाकडे धाव घेत असीत तसें आता तुम्ही तुम्ही मोबाईल कडे धाव घेता. मोबाईल शिवाय तुमचे जीवन जणू काही अपूर्णच आहे. परंतु या मोबाइलचे दुष्परिणाम ही होतात हे माहिती असूनही तुम्हा मुलांचे हे मोबाईल आणि विडिओ गेमचे वेड काही कमी होत नाही. त्याचा परिणाम असा झाला आहे की, तुम्ही सर्वांनी आता या क्रिडांगणाकडे जणू पाठच फिरवली आहे.
नेहमी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यानंपर्यंत गजबजलेला असा हा क्रिडांगण आज अगदी शांत आणि भकास झाला आहे. कोणीही क्रिडांगणा जवळ आता फिरकत ही नाही त्यामुळे लोकांनी मला कचरा टाकण्यासाठी उपयोगात आणले आहे. माझ्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य वाढले आहे. पूर्वीची झाडें त्यांची काळजी न घेतल्यामुळे सुकून पडलेली आहेत. खूप वाईट वाटतेय रे मला!
मुलांनो, घरात बसून टि. व्ही., मोबाईल, विडिओ गेम खेळणे सोडून पुन्हा मैदानी खेळांकडे वळा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचे बालपण हे असे वाया जाऊ देऊ नका. मी नवनवीन टेकनॉलॉजि शिकण्याच्या विरुद्ध अजिबात नाही आहे कारण मला संपूर्ण कल्पना आहे की ती आजच्या काळाची गरज आहे परंतु तुमच्या शारीरिक जडणघडणीसाठी मैदानी खेळ, व्यायाम आणि कसरतीही खूप महत्वाच्या आहेत. व्यायामाचे महत्व वेळीच समजून घ्या.
म्हणून आज मी एक क्रिडांगण म्हणून तुम्हा सर्वच माझ्या मित्रांना आवाहन करू इच्छितो की, पुन्हा या क्रिडांगणाकडे या! माझ्या साफसफाई कडे लक्ष दया. येथील कचऱ्याचे साम्राज्य नाहिसे करून मला पुन्हा नवसंजीवनी मिळवून दया आणि पुन्हा या तुमच्या क्रिडांगणाला पूर्वीसारखा जिवंतपणा प्राप्त करून दया. पुन्हा या क्रिडांगणावर क्रिकेटचे, कबड्डीचे, खो -खो चे, फुटबॉल आणि वॉलिबॉलचे सामने रंगू दया, बक्षीस समारंभच्या कार्यक्रमातील टाळ्याच्या कडकडांमध्ये हे क्रिडांगण पुन्हा जागे होऊ दया.
मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुमचा लाडका क्रिडांगण तुम्हा सर्वांची वाट बघतोय! तेव्हा नक्की विचार करा आणि पुन्हा या क्रिडांगणात येऊन खेळायला सुरुवात करा.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.