Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 6 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sapatranga standard 6 Question-Answer.

अभ्यास | मराठी सप्तरंग इयत्ता 6 वी प्रश्नोत्तरे | Marathi Saptaranga standard 6 Question| Answer|





                 
अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 6 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sapatranga standard 6 Question-Answer.
अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 6 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sapatranga standard 6 Question-Answer.





1. पैल तो गे काऊ कोकताहे.



1.  कावळा कुठे बसला आहे?                             
ऊ -कावळा पैल तीरावर बसला आहे.    
                   
2. घरी कोणते पाहुणे येणार आहेत?                    
ऊ -घरी पंढरीचे पाहुणे येणार आहेत.       
                                
3.  कावळ्याला काय खायला मिळणार आहे?     
ऊ- कावळ्याला दहीभात खायला मिळणार आहे.    
    
4.  कावळा कोणती शुभ वार्ता सांगणार आहे?     
ऊ -पंढरपूरचे विठ्ठल लवकरच भेटणार आहेत ही शुभवार्ता कावळा सांगणार आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------



2. फुल वेड्या माई.


1. माईंच्या सासरचे वर्णन करा.                             
ऊ - माईंच्या सासरचा वाडा मोठा व माणसांनी गच्च भरलेला असायचा. सकाळी पंगतीतली मुले बेपत्ता असली तरी त्यांचा पत्ता लागायचा नाही. लेकी सुना नटून थटून हळदी कुंकवाला बाहेर पडल्या म्हणजे फ्रेंच ब्रिजवरच्या गाड्या जागच्या जागी थबकायच्या. वाड्यातली गणपतीची आरास आणि दिवाळीचे दारू काम पाहायला संपूर्ण मुंबईतील लोक येत. 
                               
2.  माईंच्या वाड्याला अवकळा का आली?             
ऊ - माईचे लग्न तलेवार घराण्यात झाले होते. तसेच त्यांच्या सासरचा वाडा मोठा व माणसांनी गच्च भरलेला असायचा. परंतु काही दिवसांनी घरातील व्यक्ती घरबसल्या आयते खाऊ लागले. घरात भाऊबंदकी सुरू झाली. घरातील व्यक्ती एकमेकांना टाळू लागल्या. एकाच ठिकाणी पाच चुली झाल्या. त्यातच माईंचे यजमान गेले. हाता तोंडाशी आलेला मुलगाही गेला. मुली आपापल्या वाटेने सोडून गेल्या कोणी लग्न करून, कोणी नोकरी धरून गेले. त्यामुळे माईंच्या वाड्याला अवघड आली.       
                                         
3. माईंचे फुलवेड कसे होते?                                
ऊ - माई लहानपणापासूनच फुल वेड्या होत्या. लहानपणी माई तासान तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या व फुलांशी बोलायच्या ही. हे फुलवेळ घेऊनच माई सासरी गेल्या.    
                                                        
4. माईंना कोणकोणती फुले आवडत?                   
ऊ - माईंना सारीच फुले आवडत. गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबाबरोबरच शेवंती, मोगरा,  आणि जुई, विलायती फुलात डेलिया आणि ग्लॅडिओलस ही फुले माईंना आवडत.
                
5.  माईंनी शेवटी आपले फुलवेड कसे जपले?         
ऊ - माईंनी आपल्या आवडीच्या फुलांची एक छोटीशी बाग तयार केली होती. आता त्यांची बाग म्हणजे फुल झाडांच्या त्या चार कुंड्या होत्या त्यात जिकडे जात तिकडे त्यांच्याबरोबर त्यांची छोटी बाग जात असे. पुणे नाशिक नगर ला कुठे गेल्या तरीही ते आपल्या सोबत चार कुंड्या घेऊन जात असत पुण्यात आपल्या लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या मग स्वतःची. अशाप्रकारे माईने आपले फुलवेड जपले होते.    
                                                                                                  
6. माईंच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन करा.                 
ऊ - माईंच्या शेवटच्या क्षणी माई चालत नाही त्या बोलत नव्हत्या हसतही नव्हत्या. माई भीष्मा प्रमाणे शरपंचरी पहुडल्या होत्या. माईंच्या उषा लगतच चार कुंड्या ठेवलेल्या होत्या व त्या आपल्या आवडत्या फुलांचा शेवटचा निरोप घेत होत्या.                  

------------------------------------------------------------------------------------------------------------


3. गुरुकुल



1.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.  युधिष्ठराने कोणती गोष्ट पितामहांना सांगितली?
ऊ - कृपाचार्यांकडे पाहुणा आलेल्या व्यक्तीकडे मोठी मंत्र शक्ती आहे म्हणजेच त्यांची मंत्रविद्या फारस विलक्षण आहे ही गोष्ट युधिष्टराने पितामहांना सांगितली.

2. द्रोणाचार्यांचे प्राण अर्जुनाने कसे वाचवले?
ऊ - एकदा द्रोणाचार्य नदीच स्नान करीत असताना त्यांचा पाय मगराने पकडला. त्यावेळी द्रोणाचार्य मगरीच्या तोंडातून सुटका करून घेण्यासाठी जोरजोरात मदतीसाठी भयभीत होऊन ओरडू लागले त्याचवेळी अर्जुनाने हातात तलवार घेऊन पाण्यात उडी ठोकली व तोंडात तलवार धरून तो वेगाने पोहत आचार्याजवळ पोहोचला व त्याने मगरीवर तलवारीने सभासद वार केले व द्रोणाचार्यांची सुटका केली. अशाप्रकारे द्रोणाचार्य यांचे प्राण अर्जुनाने वाचवले.

3. अर्जुनाची पाठ कोणी थोपटली व का?
ऊ - अर्जुनाची पाठ द्रोणाचार्यांनी थोपटली कारण अर्जुनाचे लक्ष फक्त पक्षाच्या डोळ्यावर होते म्हणजेच त्याचे लक्ष त्याच्या ध्येयावर होते. व द्रोणाचार्यांच्या मते जर ध्येयावर नजर ठेवून राहिले तरच प्रगती होऊ शकते. म्हणून अर्जुनाची पाठ द्रोणाचार्यांनी थोपटली.

4. द्रोणाचार्य राजपुत्रांना काय म्हणाले?
ऊ - द्रोणाचार्य राजपुत्रांना म्हणाले की,आपल्या नजरेसमोर फक्त आपले ध्येय हवे, ध्येय गाठायचं असेल तर इतर सर्व अडथळे दूर केले पाहिजे. म्हणूनच ध्येयावर जर नजर ठेवून राहिला तर धनुर्विद्येत प्रगती करू शकाल.



2. बरोबर किंवा चुक ते लिहा.

1. कृपाचार्य आश्रमात बसले होते - चूक                    
2.  द्रोणाचार्यांनी दर्भ अभिमंत्रित केले- बरोबर           
3.  द्रोणाचार्यांची भटकंती संपली- बरोबर                  
4.  द्रोणाचार्यांनी कृपेशी लग्न केले- बरोबर


3. रिकाम्या जागा भरा.

1. ते मोहित झाले.                                                
2. वंदन करून उभे राहिले.                                      
3.  तुम्ही हस्तीनापुरात आलात ही अलभ्य. अशी गोष्ट आहे.                                                             
4.  जीवन स्थिर झाले आहे.


भाषा ज्ञान.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

1. सुंदर × कुरूप
2. अलभ्य × लभ्य
3. स्थिर × अस्थिर
4. डावा × उजवा.

2. वचन बदला.

1. वस्त्र - वस्त्रे
2. पक्षी - पक्षी
3. झाड- झाडे
4. फांदी- फांद्या.
5. तलवार - तलवारी.
6. पान - पाने.
7. डोळा - डोळे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------


4. नवा शिपाई


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. नवा शिपाई स्वतःवर कोणती बंधने घालू इच्छित नाही?                                                         
उ - नवा शिपाई स्वतःला कोणत्याही जाती धर्माचा मानत नाही.  जाती-धर्माच्या नावाखाली नव्या शिपाईला आपला देश वाटून घ्यायला आवडत नाही. व त्याला आपल्या विचारांच्या मळ्याला कशाचेही कुंपण नकोसे वाटते.

2. नव्या शिपायाचे मन का आनंदीत झाले?
उ - सावली खेळणारी गोंडस मुले व उन्हात फुलणारी फुले पाहून नव्या शिपायाचे मन आनंदित झाले.

3. नवा शिपाई काय करू इच्छितो?
उ - नवा शिपाई सैनिक बनून शूरपणा दाखवू इच्छितो.

4. कोणत्या खुणा नव्या शिपायाला सगळीकडे दिसतात?
उ - नवा शिपाई जेथेही जातो तेथे त्याला पायाखाली हिरवे गवत आणि डोक्यावर निळे आकाश पसरलेले दिसते. त्याचबरोबर त्याला सर्वत्र आपले भावंडे आहेत व सर्व खुणा आपल्या घरासारख्याच वाटतात.

5. कोणती गोष्ट नवा शिपाई सहन करणार नाही?
उ - नव्या शिपायाच्या विचारांना घातलेली मर्यादा त्याला सहन होणार नाही.


2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

ब्राह्मण नाही, हिंदूही नाही न मी एक पंथाचा,
तेच पतीत की जे आखडिती प्रदेश साकल्याचा!


3. खालील ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा.

जिकडे जावी तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत.
अर्थ - नव्या शिकायला कुठेही गेल्यावर आपली स्वतःची भावंडे दिसतात व हे सारे विश्व आपलेच घर आहे असे त्याला वाटते.


भाषा -ज्ञान

1. विरुद्धार्थी शब्द अजून वाक्य पुन्हा लिहा.

1. राम जवळ उभा आहे.
वाक्य- राम लांब उभा आहे.

2. तू बाहेर बस.
वाक्य - तू जवळ बस.

2. लिंग बदला.

1. शिपाई - शिपाइन
2.  भाऊ- बहिण
3.  मुलगा- मुलगी
4.  साधू - साध्वी
5.  माता- पिता
6.  वीर- विरांगणा.

3. वचन बदला.

1.  मूल - मुले
2.  फूल- फूले
3.  सुख - सुखे
4.  कुंपण - कुंपणे
5.  खूण - खुणा
6.  मळा- मळे





----------------------------------------------------------------------------------------------------------


5. स्मरणशक्तीचे प्रोफेसर.


1.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.  विद्यार्थी दशेतील कोणती गोष्ट लेखकाला आठवली?
ऊ - विद्यार्थी दशेतील लेखकांनी केलेला अहमदनगर प्रवास व गाडीतील प्रोफेसर विसरभोळे यांच्याबरोबर झालेल्या गमती जमती ही गोष्ट लेखकाला आठवली.

2. मानसशास्त्रातील कोणती संकल्पना प्रोफेसरांनी लेखकाला सांगितली?
ऊ - एखाद्या इंद्रियाचा किंवा शक्तीचा दीर्घकाळ उपयोग केला नाही तर ते इंद्रिय किंवा शक्ती नष्ट होते ही संकल्पना प्रोफेसरांनी लेखकाला सांगितली.

3. १४६ हा आकडा लक्षात ठेवण्यासाठी कोणती युक्ती प्रोफेसरांनी सांगितली?
ऊ - १४६ या आकड्याची मूर्ती डोळ्यात पुढे धरली की तो आकडा कधी विसरायचा नाही एक मुख विष्णू आणि क्षणमुख कार्तिकेय यांच्यामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाची स्वारी विराजमान झालेली आहे ही युक्ती प्रोफे सरांनी सांगितली.

4. प्रोफेसरांना कोणती नावे लक्षात राहत नसत?
ऊ - प्रोफे सरांना अहमदनगर आणि अहमदाबाद ही दोन नावे लक्षात राहत नसत.

5. स्टेशनवर उतरतात प्रोफेसर हे विसरबोळे आहेत ते कोणत्या प्रसंगावरून समजते?
ऊ - प्रोफेसर विसरभोळे आपल्या मुलीला दाखवण्यासाठी नगरास जात होते. त्यांची मुलगी दौंड्याच्या स्टेशनवर उतरताना प्रोफेसर तिला तशीच निजलेली सोडून एकटेच गाडीतून उतरले. यावरून ते किती विसरभोळे आहेत याची जाणीव होते.


2. कोण कोणास म्हणाले ते लिहा.

1. " कसे काय दादा? "
ऊ - हे वाक्य प्रोफेसरांचे बंधू प्रोफेसरांना म्हणाले.

2. " सांगितले नाही का आता? "
ऊ - हे वाक्य प्रोफेसर लेखकांना म्हणाले.

3. "अरे! सुभीला पुण्यात तर घेतलं होतं!"
ऊ - हे वाक्य प्रोफेसर त्यांच्या बंधूंना म्हणाले.

4." माझी मुलगी! काय बरे तिचे नाव? "
ऊ - हे वाक्य प्रोफेसर लेखकांना म्हणाले.


3. रिकाम्या जागा भरा.

1.  प्रोफेसर भांबावल्यासारखे झाले.
2.  या स्मरणशक्तीच्या रामबाण युक्त्या.
3.  स्मरणशक्तीला नेहमी व्यायाम दिला पाहिजे.
4.  पण सुदैवाने प्रोफेसरांचे तिकडे लक्ष नव्हते.
5.  माझ्या विद्यार्थीदशेतील गोष्ट.


भाषा ज्ञान.

1.  खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.


1.  आता लवकर जाऊया.                            
"आता लवकर जाऊया!"   
                                
2.  तोच गाढवाला का बरे हलवता येतो.            
"तोच गाढवाला का बरे हलवता येतो?"  
                    
3.  काय तुमच्याकडे फोटो आहे.                   
"काय? तुमच्याकडे फोटो आहे.?"   
                    
4. महाराज गुरुजी म्हणाले.                     
"महाराज! गुरुजी म्हणाले." 
                               
5.  जरा पाहूया तर खरं.                                 
"जरा पाहूया तर खरं!"


2.  खालील वाक्यातील काळ ओळखा.
1.  गाडीचा दरवाजा बंद झाला- भूतकाळ
2.  राम गोष्टी लिहितो- वर्तमान काळ
3.  प्रा. विसरभोळे हे विसराळू होते- भूतकाळ
4.  निलेशने आपली चूक मान्य केली- वर्तमान काळ


------------------------------------------------------------------------------------------------------------


6. गोकुळाष्टमी



1. प्रत्येक सण साजरा करताना कोणताही भेदभाव ठेवला जात नाही असे का म्हटले आहे?
ऊ- प्रत्येक सण साजरे करताना जाती धर्म पंथ संप्रदाय यांचे बंधन बाळगता सगळे एकत्र येऊन वेगवेगळे सण साजरे करतात. म्हणून प्रत्येक क्षण साजरा करताना कोणताही भेदभाव ठेवला जात नाही असे म्हटले आहे. 
                                                            
2. गोकुळाष्टमी कुठे कुठे साजरी केली जाते?        
ऊ- जेथे जेथे श्रीकृष्णाचे मंदिर असते तेथे तेथे जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे मथुरा पुरी गोवर्धन वृंदावन द्वारका जगन्नाथ पुरी बनारस या ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव आनंदाने जल्लोषाने थाटामाटाने साजरा करण्यात येतो.
                            
3.  गोकुळाष्टमी कशी साजरी करतात?                   
ऊ - गोकुळाष्टमीच्या दिवशी सगळे उपास करतात. रात्री बारा वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून सुंदर असे गाणे गाऊन पाळणा हलविता.त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. भजन कीर्तन प्रवचन पूजा असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात नाक्या नाक्यावर दहीहंड्या फोडल्या जातात. गोविंदा आला रे आला चा तालावर तरुण मुले माणसे मुली नाचत गात मिरवणूक काढतात. अशा प्रकारे गोकुळाष्टमी साजरी केली जाते.    
                                            
4. श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण कोणता बोध घ्याल?
ऊ- श्रीकृष्णाने दुर्जनांचा नाश सज्जनांचे रक्षण व मानव धर्माची स्थापना करून एक आदर्श निर्माण केला.

------------------------------------------------------------------------------------------------------------



7. मनाची श्रीमंती


1. दादांनी दोघांना एक एक रुपया का दिला? व कोणती अट घातली?
ऊ-बाल शिक्षणावरील एका पुस्तकातला उतारा वाचून मुलांना काहीतरी करायला संधी द्यावी असा विचार करून दादांनी दोघांना एक एक रुपया दिला व तो एक रुपया खर्च करूनच घरी यायचं अशी अट ठेवली.
                                   
2.  सुमाने एक रुपया कसा हरवला?                      
ऊ - दादा कडून मिळालेला एक रुपया सुमा आपल्या मैत्रिणींना दाखवण्यासाठी बाहेर पडली. त्यात काही मैत्रिणी श्रीमंत तर काही गरीब होत्या  गरीबांच्या मुलीने सुमाचे कौतुक केले तर सीमा व मैनाने काढलेला कमीपणाही त्या श्रीमंतांच्या लेकींना खपला नाही. त्या चिडल्या आणि सुचेल ते बोलू लागल्या. त्यामुळे शब्दांचे भांडण हात घाईवर आले, ढकलाढकली झाली आणि सुमाच्या हातातून त्या भांडणात एक रुपया खाली निसटलाव तो हरवला.

3. गोट्याने बाजारात काय पाहिले?                        
ऊ - गोट्याने बाजारात इराण्याच्या चहाच्या दुकानातल्या रंगबिरंगी गोळ्या वड्या पाहिल्या. त्यानंतर त्याला एक गाडी ही निराळा खेळण्यांनी भरलेली दिसली. त्याचप्रमाणे त्याला बाजारात मोहन चित्र मंदिरापुढे गर्दीत वाघाच्या जबड्याचा खेळ सुरू असलेला दिसला.
                             
4.  गोट्याने एक रुपया कसा खर्च केला?                
ऊ - गोट्या बाजारात गेला तेव्हा त्याला एका चौकात एक पंजाबी माणूस हातामध्ये कुपी घेऊन ओरडत असताना दिसला. त्या कुपीत अमृत भरलेले होते असे तो माणूस बोलत होतात त्याने ताप खोकला तर जातोच पण पोट दुखायचे थांबते 90 वर्षाचा म्हातारा वीस वर्षाच्या जवानासारखा दिसू लागतो व धडधाकट बनतो. त्याचवेळी त्याला बाजारात दयाराम शेठजी दोन माणसांच्या खांद्यावर भार घालून जाताना दिसले दयाराम शेठजी हे गावातील एकसाथ गृहस्थ होते ते मुलांना बक्षीचे व खाऊ वाटत त्यांनी धर्मशाळा बांधल्या होत्या वाचनालयालाही पैसे दिले होते. त्यामुळे गोट्याने ती अमृताची कुपी दयाराम शेठजींसाठी विकत घेऊन एक रुपया खर्च केला.  
  
5.  या कथेतून कोणता बोध घ्याल?                       
ऊ - वरील प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी आपापल्या मते योग्य अशी द्यावी.

---------------------------------------------------------------------------------------------------------------


8. कुतूहल.


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. आशा कोणापरी उडाल्या होत्या?
ऊ - आशा पक्षांपरी गगनात उडाल्या होत्या.

2.  कवीला कशाचे कुतूहल वाटते?
ऊ - झाडाला फुले आल्यावर त्या झाडां खालून जाणाऱ्या किती जणांवर झाड ओंजळीत फुले घेऊन उधळणार आहे याचे कवीला कुतूहल वाटते.

3. संध्याकाळचे वर्णन कवीने कसे केले आहे?
ऊ - फुलांचे ताटवे भरले असताना चंद्राचे आगमन हळूहळू होत होते त्याचप्रमाणे चंद्राबरोबर चांदणे आहे आभाळाची शोभा धारण करत होत्या.त्याच्या शीतल किरणांनी त्याने आसमंतात बदल होत होता व पक्षी आपल्या घराकडे येण्यासाठी मागे परतत होते. या प्रकारे कवीने संध्याकाळचे वर्णन केलेले आहे.

4. ओंजळभर फुले कुठे पडली?
ऊ - झाडावर फुललेली ओंजळभर फुले कवीच्या खांद्यावर पडली.


शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

1.  मनास आकर्षण घेणारे - मनमोहक
2.  कानाला गोड वाटणारे- कर्णमधुर
3.  पाहण्यासाठी जमलेले लोक- प्रेक्षक
4.  सर्व काही जाणणारा- सर्वज्ञ


वचन बदला.

1.  पाखरू- पाखरे
2.  ओंजळ- ओंजळी
3.  धागा - धागे
4.  वाट - वाटा
5.  पाऊल - पाऊले
6.  फूल- फूले


खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.

1. खोडकर- राजू खूप खोडकर मुलगा आहे. 
          
2. चंद्र- आज चंद्र फारच सुंदर दिसतो आहे.        
    
3. कुतूहल- मुलांना सर्कशीतील हत्ती पाहण्याचे खूपच कुतूहल झाले होते.
                                  
4. फुले- फुलदाणीत फारच सुंदर फुले आहेत.



माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहा.



-----------------------------------------------------------------------------------------------------------


9. माझे आदरस्थान शिर्डी.



1.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. चांदभाईंची व साईबाबांची भेट कधी व कुठे घडली?
ऊ - चांदबाईची व साईबाबांची भेट औरंगाबाद येथे धूप नावाच्या खेड्यात झाली जेथे चांदभाईंचा घोडा जंगलात चुकला होता.

2. साईबाबांचे आगमन शिर्डीत केव्हा झाले?
ऊ - चांद भाईंच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने साईबाबा वराडा बरोबर शिर्डीत गेले असता साईबाबांचे आगमन शिर्डीत झाले.

3. तेजस्वी तरुणाचे नाव साईबाबा कोणी ठेवले?
ऊ - तेजस्वी तरुणाचे नाव साईबाबा म्हाळसापंत यांनी ठेवले.

4. साईबाबा जीवन कसे जगत असत?
ऊ - साईबाबांची राहणी फार साधी होती ते अंगात कफनी घालत डोक्याला एक फडके गुंडाळीत. साईबाबांचे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसे. लहर असेल तर ते पोटभर जेवत नाही तर उपाशी राहत, पण ते नेहमी संतुष्ट असत. कधी कधी ते फक्त पाणीच पिऊन राहत.

5. साईबाबांना "दीनांचा कैवारी" असे का म्हणतात?
ऊ - साईबाबांनी स्वतःला कधीच देव म्हणून घेतले नाही. ते नेहमी देवाचे नामस्मरण करीत. भक्तांना आशीर्वाद देताना 'अल्ला भला करेगा' असे ते नेहमी म्हणत. भक्तांची अनेक संकटे त्यांनी दूर केली आहेत पण त्याबद्दल स्वतःकडे मोठेपणा त्यांनी कधीही घेतला नाही. म्हणून त्यांना "दीनांचा कैवारी" असे म्हणतात.


2. रिकाम्या जागा भरा.

1.  साईबाबांची राहणी फार साधी होती.
2.  साईबाबांना दत्ताचा अवतार मानले जाते.
3.  त्या फांदीची पाने गोड होती.
4.  डोक्याला एक फडके गुंडाळीत.



------------------------------------------------------------------------------------------------------------



10. थोरली आई.


1.  थोरल्या आईने नवऱ्याचा दुसरा संसार का थाटला?                                                        
ऊ - थोरल्या आईने अनेकदा होम हवन, उपास -तपास, नवस सायास केले पण तिची कुस उजवली नाही म्हणून तिने नवऱ्याचा दुसरा संसार थाटला.
                                                          
2. थोरली आई तवंदीला आल्यावर मुलींचे लाड कसे पूर्वी कसे?
ऊ-आई तवा दिला येताना मोरपिसाचा जुडगा,दोडक्याच्या फळांची जाळी आवळे पोहे लाह्या चकल्या आणत असे तसेच दर शुक्रवारी पुरणपोळी सांज्याची पोळी रोज खाण्यासाठी चमचमीत असा तिचा उद्योग सुरू असे.
                
3.  इंदिरेला थोरल्या आईची ट्रंक जादूच्या पोथडीप्रमाणे का वाटत असे?                           
ऊ - थोरल्या आईची ट्रंक उघडल्यावर त्यात काचेच्या मण्यांचा पोशाख विणलेल्या भावल्या लाकडी रंगीत बोडके पितळेची भांडी लाकडी कड्या चंदनी बाहुल्या कापडाचे गोटे पोपट दागिने घातलेली कापडाची राणी राजाचा पोशाख चढवलेला राजा राणीचा दागिन्यांचा छोट्या पितळी डबा त्या डब्यात वाक्यात साज तोडे कर्णफुले कमरेचा पट्टा गोट फाटल्या पुतळ्या खुशी असे छोटे छोटे नाजूक दागिने अशा अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या त्यामुळे इंदिरेला थोरल्या आईची ट्रंक जादूच्या पोथडीप्रमाणे वाटत असे.  
   
4.  इंदिरेला आई व मावशीचा राग का येत असे?      
ऊ - इंदिरा नेहमी थोरल्या आईच्या मागे मागे जात असे पण ती इंदिरेचा फार लळा लावून घेत नसे. कारण इंदिराच्या आईच्या धाकामुळेच थोरली आई तशी वागत होती हे इंदिरेला माहित झाले होते म्हणून इंदिराला कधी कधी आईचा व मावशीचा रागच येत असे.   

5.  'थोरल्या आईचे' व्यक्तिचित्र रेखाटा.
ऊ - थोरली आहे माहेरची अगदी गरीब असल्यामुळे लहानपणी सासर माहेर असे फारसे  फरक तिला कळत नसेल तशी तर ती सगळ्यांना नकोशीच होती. कारण तिने अनेकदा होम हवन उपास तापास नवसचा यास केले परंतु तिची खूप उजवली नाही मग तिने आपल्या नवऱ्याचा दुसरा संसार थाटून दिला. थोरल्या आईचे उपास फार गुरु शनी हे वार आणि शिवरात्र संकष्टी एकादशी प्रदोष हे उपासाचे दिवस. घरात उपासाला काही नसले तर कधी ती आणा असे म्हणत नसेल थोरली आई नुसत्या कॉफी वर उपास करत असे.                              
              
6.  इंदिरा थोरल्या आईकडून काय काय शिकली? 
ऊ - इंदिरा थोरल्या आईकडून सडा सारवण रांगोळी यासारख्या कामाची गोडी निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे ती थोरल्या आईकडून अंगणात पाखरांसाठी पाणीही ठेवायाला ही शिकली.                     



---------------------------------------------------------------------------------------------------------------



11. सहजखूण.


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. अधिक मिळवण्याचा अट्टाहास का करू नये?   
उ - जे आहे त्यात समाधानी राहावे अजून बरच काही मिळवण्याचा अट्टाहास करू नये त्यामुळे आपल्या जवळ जे आहे तेही आपल्यापासून दूर जाते.

2. समुद्राची सहजखूण कशामध्ये पटते?
उ - समुद्राची सहज खूण त्यात असणाऱ्या थेंबा मध्ये पटते.

3. वाळवंटाचे वर्णन कवयित्रीने कसे केले आहे?
उ - हिरवीगार हिरवळ संपल्यावर फक्त वाळवंट होते वाळवंट कोरडे रेताळ व भयान असते आणि त्या पोकळीमध्ये गेल्यावर प्राणही गुदमरायला लागतो. अशाप्रकारे कवयित्रीने वाळवंटाचे वर्णन केलेले आहे

4. फूल कशाची ग्वाही देत आहे?
उ - सुहास पाकळ्या पराग देठ हे सगळं एकत्र आल्याची फूल ग्वाही देतो.


2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.
फूल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा वाळू इतकाच खरा आहे वाळू मधला खोल झरा.

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास.


भाषा - ज्ञान.


1. वचन बदला.


1.  फूल - फुले
2.  पाऊल - पावले
3.  पाकळी- पाकळ्या
4.  देठ - देठ
5.  हिरवळ- हिरवळी
6.  खूण - खूणा
7.  धागा- धागे
8.  मुखवटा- मुखवटे


2. जोडशब्द लिहा.

1.  दऱ्या - खोऱ्या
2.  धन - दौलत
3.  मंत्र - तंत्र
4.  सण - समारंभ
5.  वाद - विवाद
6.  कपडा - लत्ता
7.  गोड - धोड
8.  जुळवा - जुळव


------------------------------------------------------------------------------------------------------------


12. ज्ञानलालसा.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. ब्रहमरत सुनंदाला काय म्हणाले?
ऊ - ब्रहमरत सुनंदाला म्हणाले की देवी आपला याज्ञवल्क्य सात वर्षाचा झाला व आता त्याचे मौजी बंधन व्हायला पाहिजे.

2. ब्रहमरतला कशाचे समाधान वाटले?
ऊ - याज्ञवल्क्यने ज्योतिषाचार्यांनी सांगितलेल्या गायत्री मंत्राचा उच्चार स्वच्छ व खणखणीत पणे करताना पाहून ब्रहमरतला समाधान वाटले.

3. सुनंदाची काळजी कशामुळे दूर झाली?
ऊ - ब्रहमरतने याज्ञवल्क्यसाठी गुरु म्हणून ज्या वैश्यपायनाची निवड केली होती ते सुनंदाचे भाऊ म्हणजेच याज्ञवल्क्यचे मामाच होते. म्हणून सुनंदाची काळजी दूर झाली.

4. गुरु वैश्यपालन यांनी कोणाला अनुज्ञा दिली व का?
ऊ - गुरु वैश्यपालन यांनी याज्ञवल्क्यला अनुज्ञा दिली कारण त्याला अधिक ज्ञान घेण्यासाठी ऊद्दालक ऋषींच्या गुरुकुलात जायचे होते.


2. रिकाम्या जागा भरा.

1. बालक दिसामाजी वाढत होते.
2. याज्ञवल्क्यच्या कानात गायत्री मंत्र सांगितला गेला.
3. अत्यंत मोहक असे ते वातावरण होते.
4.  त्यातही ते निष्णात होते.

3. बरोबर किंवा चुकते लिहा.

1. सुनंदा बाळाची खूप काळजी घेत असे - बरोबर
2. याज्ञवल्क्य व्यासाच्या आश्रमात शिक्षा घेऊ लागला- चूक
3. व्यासमुनींनी वेदांचे चार भाग केले- बरोबर
4.याज्ञवल्क्यना उद्दालक ऋषींच्या आश्रमात शिक्षा घेण्यासाठी जायचे होते - बरोबर.


भाषा - ज्ञान


1. लिंग बदला.

1.  मामा - मामी
2.  विद्यार्थी - विद्यार्थिनी


2. वचन बदला.

1.  फळ - फळे
2.  झरा - झरे
3.  आचार्य - आचार्य
4.  वर्ष - वर्षे
5.  डोळा - डोळे

-------------------------------------------------------------------------------------------------------------



13. संत बसवेश्वर.


1.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1.  बसवेश्वर कोणत्या राज्याचे महामंत्री होते?       
ऊ - बसवेश्वर मंगळवेढा राज्याचे महामंत्री होते.

2. निलंबिका अचानक का ओरडू लागल्या?
ऊ - नीलाम्बिकेच्या गळ्यातला रत्नजडित हार गळ्यातून ओढून कोणीतरी पळून जात आहे ते पाहून निरामिका अचानक ओरडू लागल्या.

3. कोणता व्यवसाय सर्वात महत्त्वाचा आहे?
ऊ - कष्ट करून स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरेल असा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे.



2. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.

1. रामन्नाच्या मनात चोरीचा विचार का आला?  
ऊ - दुष्काळ पडल्यामुळे ब्राह्मणाच्या शेतात काहीच धान्य उगवले नाही, तसेच त्याचा एक बैल ही चाऱ्याशिवाय मेला. बाईसाहेबांच्या गळ्यात दागिने चमकत होते ते पाहून ब्राह्मणाच्या मनात चोरीचा विचार आला.

2. बसवेश्वरांनी महामंत्र्याचे कोणते कर्तव्य सांगितले आहे?
ऊ - राज्यातील जनतेला दोन वेळेचे भोजन देऊन त्यांना जगवणे हे महामंत्र्याचे कर्तव्य बसवेश्वरांनी सांगितले आहे.

3. बसवेश्वरांच्या मते गुन्हेगार कोण?
ऊ - बसवेश्वरांच्या मते लोभी वृत्तीमुळे गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठवून गरिबांच्या मनात चोरीचा मोह निर्माण करणारे गुन्हेगार आपणच आहोत.

4. बसवेश्वरांनी चोराला कोणता उपदेश दिला?
ऊ - बसवेश्वरांनी चोराला उद्देश दिला की मंदिरात जाऊनच पूजा करता येते असे नाही आपण काम करत असलेल्या ठिकाणी पूजा होते ज्यामुळे आपण व आपले कुटुंब सुखी होईल तो व्यवसाय केल्यानेच माणूस सुखी होतो.


-------------------------------------------------------------------------------------------------------------


14.  चालता चालता काय होते?


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. पुढे पुढे चालत राहिल्यावर काय होईल असे मुलाला वाटते?
ऊ - पुढे पुढे चालत राहिल्यावर शेवटी रस्ता संपून जाईल असे मुलाला वाटते.

2. निघताना मुलाने आपल्या आपल्याबरोबर घेतलेल्या तीन गोष्टी कोणत्या?
ऊ - गळ्यात गलोल हातात छडी खिशात शेंगदाण्याची पोळी या तीन गोष्टी निघताना मुलाने आणल्या.

3. मुलगा दगडावर का बसून राहिला?
ऊ - मुलगा चालता चालता उसात राणाजवळ आल्यावर सगळीकडे सॅमसंग झाले होते कडक ऊनही तापलेले होते मुलगा घामाघुन झाल्यामुळे तो दगडावर बसून राहिला.


---------------------------------------------------------------------------------------------------------------



15. चातुर्य.


1.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. सिंहाला कशाचे आश्चर्य वाटते?
ऊ - आपल्याजवळ अन्न आहे पण आपण ते खात नाही आहोत म्हणून मरण येणार हे निश्चित आहे असे कावळ्याने म्हटल्यावर सिंहाला आश्चर्य वाटले.

2. सिंहावर मरण्याची पाळी का आली?
ऊ - सिंह म्हातारा झाला होता तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे अरण्यात खाण्यासाठी प्राणी ही मिळत नव्हते म्हणून सिंहावर मरण्याची पाळी आली.

3. उंटाने प्राण कसे गमावले?
ऊ - कावळा वाघ कोल्हा यांनी सिंहासाठी आपले प्राण देण्याचे प्रस्ताव मांडले हे पाहून उंटाणेही विचार केला की सिंह सेवकांना खात नाही तर मलाही त्याने अभयदान दिले आहे मग उंटही सिंहाला म्हणाला की माझे मास खाऊन प्राण वाचवा. अशा प्रकारे उंटाने आपले प्राण गमावले.

4. कावळा सिंहाला काय म्हणाला?
ऊ - कावळा सिंहाला म्हणाला की खरंतर आपल्याजवळ अन्न आहे पण आपण ते खात नाही आहोत. आपल्याकडे एवढा मोठा चित्रकर्ण उंट आहे.


2. रिकाम्या जागा भरा.

1. सिंह म्हातारा झाला होता.
2. भुकेने व्याकुळ झाला आहे.
3. तिघांनी एक गुप्त बेत केला.
4. माझा देह सत्कारणी लागेल.


3. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. " काय रे! तू कोठून आलास? "
ऊ - हे वाक्य सिंह उंटाला म्हणाला.

2. "काही शिकार वगैरे मिळाली का?"
ऊ - हे वाक्य सिंह कावळा वाघ आणि कोल्ह्याला म्हणाला.

3. " मी तुमचा सेवक आहे. "
ऊ - हे वाक्य उंट सिंहाला म्हणाला.



4. बरोबर किंवा चुक ते लिहा.


1. उंट व्यापाऱ्याचा होता - बरोबर
2. सिंहाचे चार सेवक होते- बरोबर
3. सिंह म्हातारा झाला होता- बरोबर
4. वाघाने कोल्ह्यावर झेप घेतली- चूक



भाषा -ज्ञान


1.  लिंग बदला.


1.  सिंह- सिंहीण
2.  कावळा- कावळीण
3.  म्हातारा - म्हातारी
4.  राजा - राणी
5.  कोल्हा कोल्हीण.


2. विरुद्धार्थी शब्द लिहा.

1.  राजा  × सेवक
2.  खूप × थोडे
3.  पुढे × मागे
4.  योग्य × अयोग्य
5.  धर्म × अधर्म
6.  पुण्य × पाप


3. वचन बदला.

1.  वाट -  वाटा
2.  गाव - गावे
3.  धान्य - धान्ये



-------------------------------------------------------------------------------------------------------------


16. मुंबई: एक स्वप्ननगरी.


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1.  मुंबई हे शहर कुठे वसलेले आहे?
ऊ - मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे.

2. मुंबई शहराला स्वप्ननगरी असे का म्हणतात?
ऊ - बऱ्याच लोकांची स्वप्नपूर्ती मुंबई याच नगरात झाली आहे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईत येतात म्हणून या शहराला स्वप्ननगरी असे म्हणतात.

3. मुंबई शहराला पाणीपुरवठा कोठून होतो?
ऊ - मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सात तलाव धरणे आहेत भातसा, तानसा, तुळशी, विहार, लोअर वैतरणा, अपर वैतरणा व पवई.



2. रिकाम्या जागा भरा.

1. 1995 मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले.

2.  मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे.

3.  मुंबई नवीन राज्याची राजधानी बनली.

4.  मुंबई या शहराला स्वप्ननगरी असेही म्हणतात.

5. मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे.



---------------------------------------------------------------------------------------------------------------





























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close