Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझा वाढदिवस - Majha Vadhdivas - My Birthday Party Essay In Marathi -वर्णनात्मक

माझा वाढदिवस | Majha Vadhdivas| My Birthday Party Essay In Marathi.




              
माझा वाढदिवस - Majha Vadhdivas
माझा वाढदिवस.


मित्रमैत्रीणींनो , आज आपण माझा वाढदिवस या विषयावर निबंध बघणार आहोत.

कालच माझा वाढदिवस झाला आहे. माझा वाढदिवस मी कसा साजरा केला आज मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे.

डिसेंबर महिना उजाडला कीं मी सारखा दिनदर्शिका बघू लागतो. वर्षभरात डिसेंबर हा माझा आवडता महिना आहे कारण याच महिन्यात माझा वाढदिवस येतो. कधी एकदा डिसेंबर महिन्याची २१ तारीख येते अस मला होते. नवीन वर्षाची दिनदर्शिका घरी आली की सर्वप्रथम माझ्या वाढदिवसाच्या तारखेवर मी निशाण करून ठेवतो. एक एक दिवस पुढे पुढे जात होते आणि शेवटी ज्या दिवसाची मी इतक्या आतुरतेने वाट बघीत होतो तो दिवस अखेर उजाडला.

माझ्या वाढदिवशी मी सकाळी लवकरच उठलो. अंघोळ करून घरी घरातील देवाचे दर्शन करून मग बाबांबरोबर घराजवळील देवळातही जाउन आलो. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही वाढदिवसाच्या निमित्ताने आईने मला नवीन कपडे घेतले होते. काल मी ते नवीन कपडे घालून शाळेत जाण्याची तयारी केली होती. आईने डब्ब्यात माझ्या आवडीची पुरणपोळी आवर्जून माझ्यासाठी बनवून दिली होती.

सकाळीच मी आई बाबांचे शुभआशीर्वाद घेतले आणि ताईने मला सकाळीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक ग्रिटिंग ही दिले. त्यानंतर गावावरून माझ्या आजीआजोबांचा मला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. शाळेची तयारी चालू असतानाच माझ्या मामा, मावशी आणि आत्याचा ही फोन आला त्यांनीही मला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. काल सकापासूनच सगळेच मला शुभेच्छा देण्यासाठी फोन करत होते. काल मी खरंच खूप खुश होतो.

शाळेची वेळ झाली आणि मी वर्गातील सर्व मित्रांसाठी माझ्या वाढदिवसाच्या निम्मिताने देण्यासाठी घेतलेली चॉकलेट्स आठवणीने माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि शाळेच्या दिशेने निघालो. मी शाळेचा गणवेश न घालता नवीन कपडे घातले होते म्हणून सगळी मुले माझ्याकडे कौतुकाने बघत होती. शाळा भरली आणि आमच्या वर्गशिक्षिकानी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शुभ आशीर्वाद ही दिले. मग मी माझ्या वर्गातील एकेका मुलाला मी घरातून आणलेली चॉकलेट्स वाटली. माझ्या जवळचे दोन मित्र आहेत त्यांना मी संद्याकाळी माझ्या वाढदिवस समारंभाला घरी ही बोलाविले.

शाळेचा संपूर्ण दिवस संपवून मी जेव्हा घरी आलो तेव्हा आई आणि ताईने घर खूप सुंदर सजवून ठेवले होते. दाराला मस्त तोरण, घरात सुंदर पताका आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा असलेले बॅनर ही होते. मोजके नातेवाईक, ताईच्या एक दोन मैत्रिणी आणि माझे काही जवळचे मित्र असे सगळे आमच्या घरी आता जमा झाले होते.

बाबा पण ऑफिस मधून आले आणि येतानाचा माझ्यासाठी छानसा चॉकलेट केक घेऊन आले. संद्याकाळी आईने मला दुसरे नवीन कपडे घालवयास दिले. नंतर सर्वांच्या उपस्थितीत मी केक कापला. सर्वांच्या शुभेच्छा आणि टाळ्यांचा गडगडाटामुळे घरात खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

माझी ताई एरव्ही माझ्याकडे सारखी छोटी मोठी भांडणे करीत असते परंतु आज तिने मला स्वतः जमा केलेल्या पैशातून एक छानसे घड्याळ आणले होते ते तिने मला दिले. मला ते सुंदर से घड्याळ खूप आवडले आणि लगेच मी ते माझ्या हातात घातले ही आणि मग आई बाबांनी मला माझ्यासाठी आणलेले वाढदिवसाचे गिफ्ट दाखविले. त्यांनी माझ्यासाठी एक सुंदरशी साईकल आणली होती जी दारा बाहेर उभी केलेली होती.

साईकल पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. सुंदरश्या सायकलला रंगबिरंगी पट्ट्यानी खूप छान साजविले होते. त्या सायकलची सुबकशी घंटी मी वाजवून बघू लागलो. तिचा रंग आणि तिचा आकार मला हवा तसाच बाबांनी निवडून त्याप्रमाणे सायकल आणली होती. माझ्यासाठी हे सगळे एखाद्या स्वप्नवत गोष्टीसारखे होते.

मी आणि माझे मित्र ती साईकल खूप वेळ बघीत राहिलो आणि मग मी तिच्यावरून एकेकाने एक - एक करून चक्कर ही मारली. खूप मज्जा केली आम्ही सर्व मित्रांनी! मी आता याच सायकवरून शाळेत जाणार असे मी लगेचच मनात ठरविले.

कालचा तो माझ्या वाढदिवसाचा दिवस किती लवकर संपला ते कळलेच नाही. पण या वर्षीचा माझा हा वाढदिवस माझ्यासाठी नेहमी अविस्मरणीय राहील.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close