Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी सायकल बोलतेय- सायकलची आत्मकथा - Mi Cycle Boltey - Cycle Chi Aatmkatha - मराठी निबंध - Autobiography Of Cycle In Marathi- आत्मवृत्त.

मी सायकल बोलतेय| सायकलची आत्मकथा | Mi Cycle Boltey | Cycle Chi Aatmkatha | Autobiography Of Cycle In Marathi.


                  
मी सायकल बोलतेय- सायकलची आत्मकथा - Mi Cycle Boltey - Cycle Chi Aatmkatha
मी सायकल बोलतेय- सायकलची आत्मकथा



मित्रमैत्रिणींनो, आज आपण सायकलचे आत्मवृत्त किंवा सायकलचे मनोगत बघणार आहोत.

आज रविवारचा दिवस. शाळेला सुट्टी त्यामुळे सकाळी मी जरा उशिराच उठलो. पावसाळा असल्यामुळे वातावरण एकदम छान आणि थंडगार झाले होते. त्यामुळे मी जरा घराच्या बाल्कनी मध्ये पाऊस बघायला उभा राहिलो तर एक आवाज आला, "मित्रा! अरे मला विसरलास काय? " मी इकडे तिकडे पाहिले तर बाल्कनी मध्ये उभी असलेली माझी जुनी सायकल चक्क माझ्याकडे बोलत होती. अरे! मी सायकल बोलतेय! तुझी लाडकी सायकल! आज मी तुला माझे मनोगत सांगणार आहे.

अरे मित्रा! गेले कित्येक महिने झाले तु माझ्याकडे बघितलेस ही नाहीस. आठवतोय का तुला तो दिवस? तुझा वाढदिवस होता. तुझ्या आईबाबांनी खास तुला मी म्हणजेच सायकल वाढदिवसाची स्पेशल भेट म्हणून दिली होती. किती खुष झाला होतास तु त्या दिवशी! मला अजूनही आठवतोय तो दिवस. तुझा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झाला होता. तु आणि तुझे मित्र खूप वेळा या नवीन सायकल वर बसून चक्कर मारून आलात.

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तु ठरविले होतेस की आता रोज शाळेत जाताना तु मला तुझ्याबरोबर नेणार. मी ही खूप खुष होते कारण मला ही शाळा बघायाची होती. शाळेत इतरही सायकली येत असतील हो ना? मला ही त्यांच्यासारखे दिमाखात शाळेच्या क्रिडांगणात उभे राहायचे होते. तुमच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला तुम्ही व्यायामाच्या ज्या कवयाती करता त्या बघायच्या होत्या.
तु जसे म्हणालास त्या प्रमाणे काही दिवस तु तुझ्या या नवीन सायकलवरून शाळेत गेलास ही व तू तुझ्या इतर मित्रांनाही नेहमी तुझी ही सुंदर गियर वाली सायकल मोठ्यां हौशेने दाखवायचास. शाळेत क्रिडांगणावर तुमचे शिक्षक तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना जे व्यायामाचे महत्व समजावत ते मी नेहमी ऐकत असे.

शाळेत असो किंवा घरी असो तु नेहमीच माझी खूप काळजी घेत आलास. परंतु जसं जसे दिवस पुढे निघून जात चालले तस तसे तु माझ्याकडे दुर्लक्ष करू लागलास. कधी सायकल वरून शाळेत जायचास तर कधी मित्रांबरोबर खेळत खेळत जाण्यासाठी पुन्हा शाळेच्या बसनेच जाऊ लागलास. आणि मी..... माझे तर नव्याचे नवेपण संपूनच गेले होते. हळू हळू मी दुर्लक्षित होऊ लागली. धूळ खाऊ लागली आणि मला माझे पाहिले दिवस आठवणीत येऊ लागले.

तुझ्याकडे येण्यापूर्वीचा माझा संपूर्ण प्रवास माझ्याडोळ्यासमोर येतो. मला एका सायकल बनविण्याच्या कंपनी मध्ये सुंदर असे तयार करण्यात आले होते. छानसा रंग, चांगल्या प्रतीचे गियर आणि छोटीशी ट्रिंग ट्रिंग करणारी घंटी. कोणत्याही लहान मुलाचे मन मोहून घेईल असे माझे रूप. तेथून मी एका सायकल विक्रेत्याच्या दुकानात आणली गेली. त्या ठिकाणी तर माझ्याचसारख्या किंबहुना माझ्यापेक्षाही मोठ्यां मोठ्यां आणि चांगल्या सायकली ठेवल्या होत्या.

एक दिवस तुझे आई बाबा आले आणि तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून मला घेऊन तुझ्या घरी आले. तेव्हापासून मी इथेच आहे. तु माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आईने मला इथे बाल्कनी मध्ये आणून ठेवले आहे. 

अरे, सायकल ही बिना प्रदूषणाचे एक अत्यंत उपयोगी असे वाहन आहे. सायकलच्या वापरामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची प्रदूषण हानी होत नाही. याउलट सायकल हे व्यायामाचे एक चांगले साधन आहे. सायकल चालविण्यामुळे पायांचा चांगला व्यायाम होतो व आपल्याला हृदयाचे आजार, किंवा ओबेसिटी सारखे आजार होत नाहीत. आपले वजन नियंत्रणात ठेव्यासाठी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर केल्याने चांगले फायदे होतात.

पूर्वी बहुतेक लोक अगदी बाजारात, भाजीमार्केट मध्ये भाजीपाला आणि किराणा सामान आणायला येण्याजाण्यापासून ते मुलांना शाळेत सोडायला जाण्यापर्यंत व काही लोक तर अगदी जावळपास कार्यालय असल्यास सायकलनेचे ये जा करीत असत. म्हणूनच पूर्वीचे लोक आताच्या पिढीच्या तुलनेने जास्त निरोगी आणि उत्साही असत. परंतु आता जसं जसा काळ बदलत गेला तुम्हाला नवीन पिढीतील मुलांना ही दोन पायांची कसरत करून चालवित इकडे तिकडे नेणारी सायकल नकोशी होत चालली आणि प्रत्येकाला एका किक वर सुरु होणारी चकाकणारी नवीन मोटारसायकल बाईक हवीहवीशी वाटू लागली. बाईक सायकलच्या तुलनेने जरी कमी मेहनतीने लवकर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहचविणारी असली तरी या बाईक मुळे होणारे प्रदूषणाचे दुष्परिणाम ही कितीतरी जास्त आहेत व त्याच बरोबर त्यासाठी लागणार पेट्रोलचा खुर्च हा रोजचाच आहे हे ही लक्षात घायला पाहिजे याउलट सायकल ही विनाखर्चिक कुठेही सहज ये ना करणारी व कमीत कमी जागा व्यापणारी अश्या प्रकारचे एक अत्यंत उपयुक्त वाहन आहे.

मित्रा! तु माझ्याकडे जेव्हापासून दुर्लक्ष केले आहेस तेव्हापासून मी या बाल्कनी मध्ये धूळ खात पडलेली आहे. रोज नाही पण एखादया रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी तरी मला फिरवायला जवळच्या बागेत किंवा क्रिडांगणावर नेत जा. सुट्टीच्या दिवशी तु घरात बसून टि. व्ही व विडिओ गेम खेळत असतोस त्याऐवजी त्या दिवशी तु सायकलचा वापर करून बाहेर जवळपास फेरफटका मारत जा. असा नियमित या सायकलचा वापर केल्यामुळे तुझा शारीरिक व्यायामही होईल व घरी बसून विडिओ गेम खेळण्याऐवजी तुझ्यामध्ये मैदानात जाण्याची गोडी ही निर्माण होईल.

चल मग मित्रा! बघतोस काय? तुझ्या या लाडक्या सायकलला मस्त धुवून स्वच्छ कर आणि दररोज जवळपास जाण्यासाठी सायकलचाच वापर करून एका प्रदूषणविरहित प्रवासाचे महत्व स्वतः समजून इतरांना ही ते नक्की पटवून दे हिच माझी तुझ्याकडून छोटीशी अपेक्षा आहे.



आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close