Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझ्या रिझल्टचा दिवस- Mazya Resultcha Divas - My Result Day Essay In Marathi.

माझ्या रिझल्टचा दिवस| Mazya Resultcha Divas | My Result Day Essay In Marathi |




               
माझ्या रिझल्टचा दिवस- Mazya Resultcha Divas - My Result Day Essay In Marathi.
माझ्या रिझल्टचा दिवस- Mazya Resultcha Divas - My Result Day Essay In Marathi.


      


मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझ्या रिझल्टचा दिवस हा वर्णनात्मक निबंध बघणार आहोत.


आज एप्रिल महिन्याची 30 तारीख म्हणजे एप्रिल महिन्याचा महिना अखेर. इतरांसाठी हा दिवस अगदी सामान्य असला तरी दरवर्षी माझ्यासाठी हा दिवस अगदी विशेष महत्त्वाचा असा असतो. त्याला कारणही तसेच आहे. दरवर्षी 30 एप्रिल म्हणजे माझ्या वार्षिक परीक्षेच्या निकालाचा दिवस.याचाच अर्थ माझ्या रिझल्टचा दिवस.

दरवर्षीप्रमाणे आजही पहाटे लवकर उठून वार्षिक परीक्षेचा हा रिझल्ट घेण्यासाठी मी आईबरोबर शाळेच्या दिशेने निघालो. परीक्षा संपून जवळपास एक महिना उलटून गेला होता.त्यावेळी आजच्या या दिवसाची भीती मनात नव्हती परंतु आज जसा हा दिवस उजाडला तसं सकाळपासूनच माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली होती.

शाळेच्या दिशेने चालत असताना माझ्या मनात विचारांचे एवढे काहूल माचले होते की मला काहीच सुचेनासे झाले होते. रस्त्याने चालत असताना निरनिराळ्या विषयांचे पेपर मला काही सोपे गेले तर काही अवघड ते सारे डोळ्यासमोर येत होते. एखाद्या पेपरामध्ये मला कमी मार्क तर नाही येणार ना याची शंका सतत माझ्या मनात येत होती.

जसजशी शाळा जवळ येत होती तस तसे माझे मन जोरात धडकू लागले होते. हात पाय अगदी थंड झाले होते व डोकं बधिर झालं होतं. मला गणिताचा पेपर थोडा अवघड गेला होता आणि इतिहासात मी दोन प्रश्न अपूर्ण सोडवले होते. परीक्षेच्या वेळी मी माझा अभ्यास पूर्णतः प्रामाणिकपणे केला होता परंतु तरीही मनात एक किंचीतशि भीती तयार झाली होती.

एखाद दोन मार्क कमी तर नाही पडणार ना असा विचार सतत माझ्या मनात येत होता. शाळेमध्ये प्रवेश करताच आईने माझ्याकडे स्मित हास्याने पाहिले. माझ्या मनाची भीती आणि झालेला गोंधळ माझ्या चेहऱ्यावर तिला स्पष्टपणे जाणवत होता.

वर्गात प्रवेश करण्याच्या पूर्वी आईने हळूच मायेने माझ्या पाठीवर हात फिरवले आणि मला म्हणाली की तू अगदी प्रामाणिकपणे तुझा पेपर सोडवला आहेस याची मला खात्री आहे. तेव्हा तू अजिबात घाबरू नको. तुझा रिझल्ट अगदी व्यवस्थित येईल. परंतु माझे मन मला साथ देत नव्हते. माझे हातपाय थरथरु लागले होते.

वर्गात प्रवेश करताच मी माझ्या इतरही मित्र-मैत्रिणींना भेटलो. एकेक जण जाऊन आपापला रिझल्ट वर्ग शिक्षकांकडून घेऊन येत होता. आता काही वेळातच मलाही जाऊन माझा रिझल्ट घ्यायचा होता इतक्यात माझ्या एक दोन मित्रांनी मला अभिनंदन केले व त्यावेळी काही क्षण मला काहीच कळले नाही.

माझे हे अभिनंदन कशासाठी होत आहे हे कळण्याआधीच आईने मला आनंदाने वर्गातील फळ्याकडे बोट दाखवून माझे अभिनंदन केले. मागील बाकावर बसूनच मी फळ्याकडे पाहिले असता मला लक्षात आले की वर्गातील प्रथम तीन मुलांची नावे फळ्यावर वर्ग शिक्षकांनी लिहिली होती त्यात माझे नाव सर्वात पहिला होते. म्हणजे मी वर्गात प्रथम आलो होतो. मला माझ्या डोळ्यांवर अजिबात विश्वासच बसत नव्हता.

फळ्यावर वर्ग शिक्षकांनी मोठ्या अक्षरात अभिनंदन असे लिहिले होते व त्या खालोखाल वर्गातील सर्वात जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले होते त्यातील पहिल्या तीन नावात सर्वात प्रथम माझे नाव आल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला होता.

मी हसत हसत व आनंदाने वर्गशिक्षकांकडे माझा रिझल्ट घेण्यासाठी गेलो. मला पाहताच वर्ग शिक्षक अत्यंत आनंदी झाले व त्यांनी मला माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मला खूपच आनंद झाला होता. माझा रिझल्ट माझ्याकडे असताना वर्गशिक्षक मला आनंदाने म्हणाले की वर्षभर तु जो अत्यंत मन लावून अभ्यास केला होतास त्या तुझ्या मेहनतीचे आज चीज झाले आहे. असाच या पुढेही यशस्वी होत रहा हाच आमचा तुला आशीर्वाद आहे.

माझा रिझल्ट मी पाहताच मला सर्व विषयांमध्ये भरघोस गुण मिळाले होते व जो गणिताचा पेपर मला कठीण गेला होता त्यातही मी चांगले गुण मिळवले होते. काही वेळापूर्वी माझ्या मनात असलेली अनामिक भीती कुठल्या कुठे पळून जाऊन माझ्या चेहऱ्यावर चांगलेच हसू उमटत होते व आईकडे मी पाहताच आईच्या चेहऱ्यावरती आनंदाचे व समाधानाचे भाव मला दिसले.

माझ्या या यशामध्ये  माझे वर्ग शिक्षक माझे आई-वडील या सर्वांचा तेवढाच वाटा होता. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले होते.

दरवर्षी हा वार्षिक परीक्षेच्या निकालाचा दिवस म्हणजेच माझ्या रिझल्टचा दिवस हा माझ्यासाठी थोडासा भीतीदायक आणि चलबिचल करणारा असला तरी ज्यावेळी तो निकाल हाती येतो त्यावेळी मात्र आपण घेतलेल्या मेहनतीला आज फळ मिळाले हा विश्वास दर्शवणाराही असतो.




आमचा हे निबंधलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close