Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझी शाळा मराठी निबंध - Majhi Shala Marathi Nibandh - My School Essay In Marathi.

माझी शाळा मराठी निबंध | Majhi Shala Marathi Nibandh | My School Essay In Marathi |



               
माझी शाळा मराठी निबंध - Majhi Shala Marathi Nibandh - My School Essay In Marathi.
माझी शाळा मराठी निबंध - Majhi Shala Marathi Nibandh - My School Essay In Marathi.




मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझी शाळा या विषयावर वर्णनात्मक निबंध बघणार आहोत.



आज शाळेचा शेवटचा दिवस. म्हणजेच शाळेचा निरोप समारंभाचा दिवस. आज शाळेचा निरोप घेताना आजही आठवतोय माझ्या हया शाळेचा पहिला दिवस. होय! माझी शाळा.

आज येथील प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या मनात गर्वाने हिला माझी शाळा असेच म्हणत आहे. त्याचप्रमाणे मला ही आज गर्व होत आहे ही माझी शाळा आहे. आजच्या हया दिवशी पहिल्यापासून सगळे शाळेचे दिवस डोळ्यासमोर येऊ लागेल आहे.

माझी शाळा म्हणजेच विलेपार्लेसारख्या सुसंस्कृत वस्तीत उभारलेली एक इमारत. मा.भा. हायस्कूल असे माझ्या हया शाळेचे नाव. घरापासून माझी शाळा सुमारे अर्धा किलोमीटर दूर असेल परंतु मी नेहमीच शाळेत पायी येत आलोय आणि शाळेत येण्याजाण्याचे हे अंतर कधीही दूर वाटले नाही कारण तो दैनंदिन आयुष्याचा एक भागच झाला होता. 

माझी शाळा एक छानशी पण भली मोठी इमारत. त्यात इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरत असायचे. मला अजूनही आठवतोय माझा शाळेचा पहिला दिवस. किती भीती वाटली होती मला आईचा हात सोडून माझ्या या शाळेत प्रवेश करताना. पण माझ्या हया शाळेचे वैशिष्ट्यच हे आहे की हळू हळू तिने मला जणू काही असे आपलेसे केले की मी माझ्या आईबरोबर जेवढं निर्धास्तपणे स्वतःला सुरक्षित समजायचो तेवढेच शाळेतही समजू लागलो.

आजही आठवतोय तो दिवस जेव्हा मी इयत्ता पाहिलीत पहिल्यांदाच वार्षिकोत्सवात कोळी नृत्यात भाग घेतला होता. मंचावर नृत्य करताना किती भीती वाटली होती मला! आज ही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी माझ्या वर्गशिक्षकांसाठी केलेले माझे पाहिले भाषण. खूप कौतुक झाले होते माझे त्या दिवशी.

माझ्या हया शाळेची इमारत इथला परिसर इतर कुठेही बघायला मिळणार नाही. घरातून शाळेकडे निघताना रस्त्यात अनेक गोष्टी दिसायच्या परंतु जसजशी शाळेची इमारत जवळ येऊ लागायची तेथील वातावरणच अगदी सकारात्मक वाटू लागायचे.

शाळेच्या बाहेरच गेटवर एक छोटेसे गोळ्या चोकोलेटचे दुकान आहे तेथे श्रीखंडाच्या गोळ्या घेण्यासाठी आम्ही लहानपणी सर्व मुले नेहमी गर्दी करीत असू. शाळेच्या बाहेर एक मोठे चिंचेचे झाड होते. माझ्या शाळेच्या प्रवेशद्वारापाशीच एक छोटेसे देवीचे मंदिर आहे जिथे आम्ही नेहमी प्रार्थना करून मग आत जात असू.

माझी शाळा जशी मला प्रिय आहे तेवढेच मला माझ्या शाळेचे क्रिडांगण ही प्रिय आहे. माझ्या शाळेत जे क्रिडांगण आहे तेथे आजपर्यंत झालेले माझे प्रत्येक क्रीडांमहोत्सव जसेच्या तसे लक्षात आहेत.

माझ्या शाळेच्या क्रीडांगणाची आणखी एक गोष्ट म्हणजेच तेथे एक छोटेसे सुंदर हनुमानचे मंदिर होते. जे तेथील क्रीडांगणाला एक विशेष महत्व मिळवून देत होते.

शाळेच्या इमारतीतील आणखी एक छोटीशी परंतु विशेष लक्षात राहणारी जागा म्हणजेच माझ्या शाळेचे कॅन्टीन. होय! किती मस्त कॅन्टीन आहे माझ्या शाळेमध्ये जिथे आम्ही मुले वडा पाव घेण्यासाठी जात असायचो. माझ्या शाळेच्या कॅन्टीनच्या वडापावची चव इतर कोणत्याही ठिकाणच्या वडापावला येत नाही.

आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच माझ्या शाळेतील शिक्षक. हो सर्वात महत्वाचे! कारण जर हे माझ्या शाळेतील शिक्षक मला लाभले नसते तर माझी शाळा मला कधीच माझी वाटली नसती कदाचित. आज मी आणि माझे वर्ग मित्र-मैत्रिणी आम्ही जे काही घडलो आहोत त्यात याच वेळोवेळी साथ देणाऱ्या एक ना अनेक शिक्षकांचा मौलाचा वाटा आहे.

आज त्या प्रत्येकांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे शिकवलेले संस्कारच आहेत जे आम्हा सर्व विद्यार्थांना आता आयुष्याची लढाई लढताना मदतीला येणार आहेत. त्यांनी आम्हा प्रत्येकाच्या मागे निःस्वार्थपणे केलेली मेहनतच आम्हाला एक चांगले आयुष्य जगण्यासाठी हिम्मत देणार आहे. माझ्या हया शाळेतील मला लाभलेल्या हया प्रत्येक गुरुचे मी जितके आभार मानीन तेवढे कमीच असतील.

आता आता माझ्या हया शाळेतील सर्वात सुवर्ण भाग मानला जाणारे माझे मित्र मैत्रिणी. हेच आहेत ती खरी शिदोरी जी मी माझी शाळा सोडताना माझ्या सोबत आयुषभरासाठी कमावून घेऊन जात आहे. ज्यांची साथ माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

आता माझ्या हया शाळेने मला काय दिले असे मी म्हंटले तर माझ्याकडून असे सांगितले जाईल की माझ्या हया शाळेने मला एक समजुदार, जबाबदार, भावनिक पण वेळप्रसंगी कठीण प्रसंगांना धीराने सामोरे जाणारा, न डगमगता परिस्थितीसदृश्य योग्य निर्णयक्षमता घेण्याची मानसिकता असणारा व्यक्ती बनविले आहे.

माझी ही शाळा येथील प्रत्येक भिंत, येथील फळा, येथील माझे बाक, शाळेतील शिपाई काका, शाळा भरण्याची आणि सुटण्याची ती शाळेची घंटा, येथील प्रत्येक कोपरा न कोपरा या प्रत्येकात माझ्या असंख्य आठवणी आहेत. ज्या सोडून मला कधीही जावेसे वाटणार नाही परंतु प्रत्येकालाच एक ना एक दिवस ही शाळा सोडून जावेच लागते हे अटळ सत्य आहे. 

पण हया विद्याच्या मंदिरात एवढी जादू आहे जी जो विद्यार्थी येथे अनोळखी बनून घाबरत, रडत आईबाबांना घट्ट मिठी मारून मग येथे दाखल झालेला असतो तो जेव्हा ही आपली शाळा सोडून जातो तेव्हा हया शाळेला सोडायला तयार नसतो आणि पुढे संपूर्ण आयुष्यभर तो जेव्हा केव्हा आपल्या शाळेबद्द्ल कोणाला ही सांगतो तेव्हा तो हक्काने व गर्वाने बोलतो की " माझी शाळा! " ह्याच माझ्या लाडक्या आदर्श शाळेला आज माझ्याकडून ही कोटी कोटी प्रणाम!




आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close