मी वर्गातील बाक बोलतोय | शाळेच्या वर्गातील बाकाची आत्मकथा | Mi Vargatil Bak Boltoy | Autobiography Of School Bench In Marathi.
![]() |
मी वर्गातील बाक बोलतोय-शाळेच्या वर्गातील बाकाची आत्मकथा. |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण शाळेच्या वर्गातील बाकाचे आत्मवृत्त किंवा शाळेच्या वर्गातील बाकाचे मनोगत बघणार आहोत.
नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजता शाळेच्या मधली सुट्टीची घंटा वाजली आणि आम्ही सगळी मुले गोंधळ घालू लागलो. कोणी इकडे धाव तर कोणी तिकडे धाव करीत होते तर काही जण हात स्वच्छ धुवून येऊन आपापले जेवणाचे डबे काढून खाऊ लागले. मी ही डबा खाण्यापूर्वी हात धुवण्यासाठी वर्गबाहेर जाणार होतो म्हणून मी माझा डबा माझ्या दप्तरातून म्हणजेच बॅग मधून काढून माझ्या बाकावर ठेवला आणि इतक्यात आवाज आला, " थांब मित्रा! इकडे बघ. मी बाक बोलतोय! " मी दचकून आजूबाजूला पाहिले तर पुन्हा आवाज आला, "हो! खरंच मी बाक बोलतोय! आज मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो."
तु रोज सकाळी शाळेत येतोस आणि सर्वप्रथम या बाकावरच आपली शाळेची बॅग ठेवून लगेच आपल्या मित्रांबरोबर मजा मस्ती आणि दंगा करायला निघून जातोस बरोबर ना? परंतु तुला हे माहित आहे का की जेव्हा तु तुझी ही बॅग निश्चिन्तपणे माझ्याजवळ ठेऊन जातोस तेव्हा तिला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असते. तु मात्र आरामात इकडे तिकडे खेळत असतोस. पण मी सतत तुझ्या बॅगचे व त्यातील वस्तूंचे रक्षण करीत राहतो.
तुला माहिती आहे का मित्रा की, खूप वर्षांपूर्वी मी येथे या शाळेत आणला गेलो. सुंदर अश्या गुळगुळीत लाकडाने मला आकार देऊन तुम्हा विद्यार्थांसाठी बसण्यालायक बनविण्यात आले होते. त्यावेळीस माझ्यातील नविनपण सहज कोणालाही दिसण्यात येण्यासारखे होते.
सुबक, गुळगुळीत लाकडाने मला विशिष्ट अश्या आकारामध्ये बनविण्यात आले होते. तुम्हा विद्यार्थांना जितके सोईस्कर होऊ शकेल तितक्या चांगल्या पद्धतीने माझी रचना करण्यात आली आहे. जसे की तुम्हाला व्यवस्थित बसता यावे, तुम्हाला तुमच्या शाळेच्या बॅग्स आणि वह्या पुस्तके नीटनेटकी आणि सुटसुटीत ठेवता यावे व त्याचबरोबर माझ्या पृष्ठभागावर अगदी वरच्या बाजूला बारीकशी अशी एक लांब निमूळती तुमच्या पेन -पेन्सिल ठेवण्यासाठीही जागा बनविण्यात आली आहे. जेणेकरून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास शिकत असताना आपापल्या वस्तू सोईस्कररित्या वापरता याव्यात.
तुला माहिती आहे का की, दररोज तुम्ही सर्व विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी आपल्या शाळेचे शिपाई काका आम्हा सर्व बाकांना स्वच्छ पुसून ठेवतात जेणेकरून तुम्हाला सर्व मुलांना दिवसभर याच्यावर बसायला स्वच्छ आणि नीटनीटकी जागा मिळेल.
मी जेव्हा या शाळेत नवीन आलो तेव्हा हया शाळेची बिल्डिंग नविनच तयार झाली होती. मी आणि हा फळा आम्ही एकच दिवशी या वर्गात आलो आहोत तेव्हापासूनचे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो आहोत.
आज तु या बाकावर बसतोस पण यापूर्वीही तुझ्यासारखी कित्येक मुले या बाकावर बसली आहेत. प्रत्येक नवीन वर्षी मला तुझ्यासारखा एक नवीन छोटासा मित्र मिळतो. काही मित्र माझी काळजी घेतात तर काही मित्र मला त्रास देतात.
जसे काही मुले माझा जपून वापर करतात. शाळेत येवून याच बाकावर बसून मनापासून अभ्यास करतात , निरनिराळ्या गोष्टी शिकतात आणि मला नीट जपतात. परंतु काही मुले ही बाकावर चढून उड्या मारतात, त्यामुळे आमची जोडणी कमकुवत होते, काही मुले गणित आणि भूमितीच्या टोकदार राऊंडरने बाकावरच गोल बनविण्याचा प्रयत्न करतात त्याने बाकाचा गुळगुळीतपणा नष्ट होऊन तो खरखरीत व आबडधोबड बनत जातो.
काही मुले तर कंटाळा आला की चक्क बाकावर वेगवेगळ्या आकृत्या आणि चित्रकला करीत बसतात. खरंच खूप त्रास होतो रे तेव्हा मला! काही मुले परीक्षेला गणिते लिहून ठेवतात त्यावेळी मनापासून खुप वाईट वाटते मला.
ज्या वेळी एकाद्या मुलाला शिक्षा होते तेव्हा शिक्षक त्याला बाकावर उभे राहायला सांगतात. हो की नाही? आणि मग तुम्ही सगळे त्या विदयार्थ्याला हसता आणि चिडवता. परंतु मी त्यावेळी दुःखी होतो. मला खूप वाईट ही वाटते.
मधल्या सुट्टीत तुम्ही सर्व मुले जेव्हा एकमेकांबरोबर खेळता, मजा मस्ती करता तेव्हा सर्वच जण या बाकावरून त्या बाकावर उड्या मारीत धावत सुटता तेव्हा माझ्या मनातून आवाज येतो अरे थांबा! धावू नका! बाकाची एखादी कडा लागेल तुम्हाला! माझ्या मनात भीती असते की अजाणतेपणी माझ्यामुळे तुम्हाला कोणतीही इजा होऊ नये. कधी कधी असे प्रसंग झालेले ही आहेत की बाकावरून उड्या मारीत असताना एकाद्या मुलाचा न कळतच पाय सटकतो आणि त्याला क्वचितची इजा ही होते त्यावेळी मला खूपच वाईट वाटते.
बाक हा तुमच्या सोईसाठी बसण्यासाठी ठेवलेली वस्तू आहे आणि मी नेहमीच तुम्हा सर्व छोट्या दोस्ताना माझा मित्रच मानतो पण तुमच्यातील काही मुले मात्र माझी दुरावास्ता करतात.
अरे बाळा! वर्गातील बाक हा तुमच्या बसण्यासाठी आणि सोईसाठी असतो त्याची तुम्ही जर अशी अवस्था कराल तर मी मोडकळीस येऊन पडेन आणि जरा विचार करा की जर एक एक करून वर्गातील सर्वच बाक असे मोडून पडले तर तुम्ही कुठे बसाल?
तुला मनापासून एक गोष्ट सांगू का मित्रा, आज तुम्हाला ही शाळा, हा फळा आणि हे बाक यांचे एवढे महत्व नसेल परंतु जी मुले या शाळेत शिकून आता कॉलेजला गेली आहेत किंवा काही कामालाही लागली आहेत त्या मुलांना आज या सर्व गोष्टीची किती आठवण येते हे कधी तरी एखादया जुन्या विद्यार्थ्याला नक्की विचार मित्रा! त्यातील कित्येक विदयार्थी आज शाळेला जेव्हा भेट द्यायला येतात तेव्हा आवर्जून आपल्या बाकावर बसून त्यांच्या जुन्या शालेय आठवणीमध्ये रमून जातात. प्रेमाने आपल्या लाडक्या फळ्याला आणि आपल्या बाकाला हात लावतात.
तेव्हा मित्रा! मी बाक तुझा आणि तुम्हा सर्व विद्यार्थांचा मित्रच आहे जो तुम्ही जागेवर नसताना किंवा व्यायामाच्या तासाला जेव्हा तुम्ही क्रिडांगणावर जाता तेव्हा तुमच्या सर्व वस्तूंची जबाबदारीपूर्वक काळजी घेतो म्हणून शेवटी एकच सांगू इच्छितो की, जसे मी तुमच्या वस्तुंची काळजी घेतो आणि दिवसभर तुम्हाला वर्गात बसण्यासाठी आरामदायक सुविधा देतो तसेच तुम्ही ही माझी चांगली काळजी घ्या व कृपया माझी मोडतोड करू नका म्हणजे मग मी वर्षनुवर्षे तुझ्यासारख्या अनेक माझ्या छोट्या मित्रांना बसण्यास कामी येईन हीच मी तुम्हा सर्व विद्यार्थांकडून अपेक्षा करतो.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.