Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध - Pariksha Nastya Tar Marathi Nibandh - If There Were No Exams Essay In Marathi.

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध | Pariksha Nastya Tar Marathi Nibandh | If There Were No Exams Essay In Marathi |




            
परीक्षा नसत्या तर मराठी निबंध - Pariksha Nastya Tar Marathi Nibandh - If There Were No Exams Essay In Marathi.
परीक्षा नसत्या तर मराठी निबंध - Pariksha Nastya Tar Marathi Nibandh.




मित्रमैत्रिणींनो, आज आपण परीक्षा नसत्या तर हा कल्पनात्मक निबंध बघणार आहोत.

आज सकाळीच सकाळी आईने लवकर उठवले. आजपासून माझी वार्षिक परीक्षा सुरु होणार व त्यामुळेच सकाळी लवकर उठून मला माझ्या अभ्यासाची पुन्हा एकदा उजळणी करायची होती. वर्षभर शाळेत किती दंगा मस्ती केली , शाळेची सहल, माझे भाषण, गायन, नृत्य व चित्रकला अश्या विविध स्पर्धा हे सर्व अभ्यासाच्या जोडीनेच मी खूप आनंदाने केले परंतु परीक्षा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मला खरंच खूप कंटाळा येतो.

वर्षभर तर आम्ही सर्व जण आपापल्या पद्धतीने अभ्यास शिकून घेतलाच आहे ना मग या अश्या परीक्षा घेऊन काय बरे असे वेगळे होणार आहे असा विचार नेहमी माझ्या मनात येतो आणि त्यानंतर सारखी मनात एकच कल्पना येत राहते ते म्हणजेच परीक्षा नसत्या तर....

वाह! किती मस्त कल्पना आहे ना ही? परीक्षा नसत्या तर काय मज्जा आली असती ना? शाळेत अभ्यास करून घरी आलो की आई सारखी गृहपाठ कर, पाढे पाठ कर असे ओरडत असते पण परीक्षाच नसत्या तर अभ्यासाला तर सुट्टीच मिळाली असती ना. आई बाबांची व शिक्षकांची सारखी बोलणी खावी लागली नसती. शाळेत शिकविलेला अभ्यास शिकून घेतलाय ना मग कशाला हवी ही वेगळी परीक्षा?

परीक्षा नसत्या तर शाळेतील अभ्यासातील काही गोष्टीची उजळणी करण्यासाठी जे रोज रोज शिकवणी जावे लागते ते ही बंदच होईल मग. मग कशाला हवी शिकवणी आणि कशाला हवा तो दररोजचा सराव.

परीक्षाच नाहीत मग काय शाळा सुटली की नुसते क्रिडांगणावर मस्त खेळत बसायला मिळेल किंवा माझ्या लाडक्या सायकलवरून जेव्हा हवे तेव्हा आपल्या मित्रांच्या बरोबर मस्त इकडे तिकडे फेरफटका मारायला मिळेल.

परीक्षा नसत्या तर माझ्या बुद्धीमत्तेची वर्गातील इतर कोणाच्या हुशारीबरोबर कधीच तुलना केली जाणार नाही. ना मोठमोठे निबंध लिहावे लागतील ना किचकट गणितांची आकडेमोड करावी लागेल, प्रयोगाची वही नको, इतिहास, भूगोल आणि नकाशे ही नको. या सर्वांपासूनच कायमची सुटका मिळेल व कविता पाठांतर व निरनिराळ्या प्रोजेक्ट्स पासून ही मुक्ती मिळेल.

परीक्षा नसत्या तर सर्व मुलांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल. सर्व विद्यार्थी शाळेत शिक्षकांनी शिकविलेले जसे समजेल तसें शिकून घेतली आणि जे नाही समजले त्याच्यामागे उगाच लागणार ही नाहीत. परीक्षा नसल्या तर वर्गात सर्वच मुले एकसामान होतील मग कोण अति हुशार राहणार नाही आणि कोणीच अगदी ढ म्हणून चिडवला जाणार नाही.

पण खरंच परीक्षा नसल्या तर आम्हा विद्यार्थ्यांचे जीवन सुखकर होईल की हे सुख फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे असेल. परीक्षा पद्धती ही काही तरी चांगले विचार विनिमन करूनच अमलात आणली असावी असे नक्कीच असेल.

परीक्षा पद्धती ही कोणत्याही विद्यार्थ्यांना कमी किंवा जास्त लेखण्यासाठी किंवा त्याच्या बुद्धीमत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी नसून शिक्षकांनी वर्षभर आपल्याकडील जे अमूल्य ज्ञान आपल्या विदयार्थ्यांना दिलेले आहे त्यातील किती गोष्टी त्यांच्या ध्यानात आलेल्या आहेत ह्याचे मापन करण्यासाठी परीक्षा पद्धती सुरु केली असावी.

कारण शाळेत आल्यावर मुलांना त्यांचे शिक्षक पुस्तकातील विविध पाठ व त्यातील अभ्यासातून अश्या गोष्टीचे ज्ञान अवगत करून देतात जे त्या विद्यार्थांना त्याच्या पुढील आयुष्यात वेळोवेळी कामी येईल.

जसे गणिते किंवा पाढे पाठांतर करून घेणे किंवा त्यांची परीक्षा घेणे हे पुढील आयुष्यात मुलांना आर्थिक व्यवहारात कोणती ही अडचण न येता ते सरळ पद्धतीने करता येण्यासाठी उपयोगी पडतात तर भाषा किंवा संस्कृत श्लोक यातून मुलांची उच्चरणपद्धती सुधारण्यासाठी मदत मिळते. अश्याच प्रकारे इतिहास, भूगोल व्ही सामान्य विज्ञान ही आपल्याला महत्वाच्या गोष्टीची ओळख करून देतात.

परीक्षा नसत्या तर हा विचार मनात आला की फक्त शालेय अभ्यासाच्याच परीक्षांचा प्रश्न न राहता तो प्रश्न शाळेतील इतर विषयांच्या परीक्षासाठी ही महत्वाचा असतो जसे की परीक्षा ही चित्रकला आणि हस्तकलेची ही असते. हया अश्या कलेशी जोडणाऱ्या परीक्षा आपल्याला आपल्यातील सुप्त गुणांना वाव देणाऱ्याच ठरतात. तसेच क्रिडांगणावरील शारीरिक शिक्षणाच्या व खेळाच्या स्पर्धा परीक्षा ही आपल्याला वाढत्या वयातील आपल्या शारीरिक विकासासाठी फायदेशीर ठरणाऱ्याच असतात. त्यामुळे आपल्याला व्यायामाचे महत्व ही लक्षात येते. 

परीक्षा मग ती अगदी हस्ताक्षर स्पर्धा किंवा एखादी भाषण स्पर्धा परीक्षाच का होईना पण ती परीक्षा घेण्यामागे पुढे जाऊन आपल्याला तिचा काही ना काही फायदाच होतो हे मात्र नक्की. त्यातूनच आपण अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात करू शकतो, परीक्षेच्या निम्मिताने त्या गोष्टीना मनापासून समजून घेतो व ह्याचाच फायदा भविष्यात आपल्याला आयुष्यभर होत राहतो व आपल्यात हळू हळू आत्मविश्वास तयार होऊ लागतो.

तेव्हा परीक्षा नसत्या तर हा विषय मी मात्र आता माझ्या डोक्यातून काढून टाकला आहे आणि आजपासून येणाऱ्या सर्व परीक्षांना मी प्रामाणिकपणे व पूर्ण तयारीनीशी मेहनत करून समोरा जाणार आहे हे पक्के ठरविले आहे.




आमचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close