Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Saptranga standard 7 Question-Answer.

 अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Saptranga standard 7 Question-Answer.




       
            
अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Saptranga standard 7 Question-Answer.
अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Saptranga standard 7 Question-Answer.





अभ्यास - मराठी सप्तरंग इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Saptranga standard 7 Question-Answer.





1. संतवाणी.


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. संत तुकारामांनी विठ्ठलाचे वर्णन कसे केले आहे?
उ - संत तुकाराम विठ्ठलाचे भक्त होते. विठ्ठलाचे वर्णन करताना संत तुकाराम म्हणतात की, कमरेवर हात ठेवून विठ्ठल विटेवर उभे आहेत, त्यांच्या गळ्यात तुळशीहार आहे व त्यांनी पितांबर नेसले आहे. त्यांच्या कानात मकरकुंड तळपत आहे व कंठात कौस्तुभ मणी विराजित आहे. अशा प्रकारचे विठ्ठलाचे मोहक रूप संत तुकारामांना आवडते.

2. विठ्ठलाचे दर्शन घेता संत तुकारामांना काय वाटते?
उ - संत तुकारामांना विठ्ठलाचे रूप खूप आवडते. गळ्यात तुळशीहार व पितांबर नेसलेले रूप तुकारामांना निरंतर पहावेसे वाटते. विठ्ठलाचे सौंदर्य पाहून तुकारामांना ब्रह्मानंद वाटते. विठ्ठलाचे रूप पाहण्यात त्यांना सुख वाटते. तुकाराम म्हणतात की, त्यांना विठ्ठलाचे अतिशय आनंदित करणारे हे रूप हृदयात साठवावेसे वाटते.


2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

1. तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने|

2. तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेचि ध्यान |


3. खालील ओळीचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा.

मकर कुंडले तळपती श्रावणी | कंठी कौस्तुभ मणि विराजित|

अर्थ - विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले तळपत आहेत आणि कंठात कौस्तुभमणी मणी विराजला आहे.

4. जोड्या जुळवा.

                                               

जवळ                                         दूर
हसणे                                         रडणे
मोठी                                          छोटी
दिवस                                         रात्र
विचार                                        अविचार
भरती                                         ओहोटी
खोल                                          उथळ





-----------------------------------------------------------------


2.  स्वावलंबनाची शिकवण.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. भास्कर श्यामच्या घरी काय येत असे?
उ - भास्कर जवळ राम रक्षाचे पुस्तक होते. तो त्यातील एक श्लोक दररोज पाठ करीत होता व संध्याकाळ झाली की भास्कर श्यामच्या घरी श्लोक म्हणून दाखवण्यासाठी येत असे.


2. श्यामला भास्करचा राग का येत असे?
उ - भास्कर दररोज एक श्लोक पाठ करून श्यामच्या घरी येत असे व श्लोक म्हणून दाखवत असे ते ऐकून श्यामला लाज वाटे व त्याला भास्करचा राग येत असे.


3. श्यामने रामरक्षा कशी पाठ केली?
उ - आईच्या सांगण्यावरून शाम रविवारी भास्करकडे गेला आणि भास्करच्या आईकडून राम रक्षाचे पुस्तक घेऊन आला. शामने रामरक्षेचे सगळे श्लोक सुंदर अक्षरात लिहून काढले व पाठ केले.


4. वडिलांनी श्यामचे कौतुक का केले?
उ - श्याम जवळ रामरक्षाचे पुस्तक नव्हते. त्याने भास्करकडून पुस्तक मिळवले व राम रक्षा सुंदर अक्षरात लिहून ती पाठही केली. संध्याकाळी वडील घरी आल्यावर श्यामने पूर्ण रामरक्षा त्यांना म्हणून दाखवली. श्यामने कमी वेळेत रामरक्षा लिहिली व पाठही केली म्हणून वडिलांनी त्याचे कौतुक केले.


5. आईने श्यामला कोणती शिकवण दिली?
उ - आईने श्यामला स्वतःच्या पायावर उभे राहावे व कष्ट करून मोठे व्हावे तसेच कधीही परावलंबी होऊ नये अशी स्वावलंबनाची शिकवण दिली.



2. रिकाम्या जागा भरा.

1. बाचाबाची ऐकून आई बाहेर आली.      
               
2.  एके दिवशी भास्कर श्यामला म्हणाला.        
        
3.  पुस्तक परत भास्करला देऊन टाकले.          
       
4.  कौतुकाने बाबांनी श्यामची वही पाहिली.


3. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. " तू कधी शिकलास? "                                    
उ - हे वाक्य बाबांनी शामला विचारले.
                  
2.  " काय रे झाले भास्कर? "                                
उ - हे वाक्य श्यामच्या आईने भास्करला विचारले.
                                                        
3. " आता माझे दहा श्लोक राहिले आहेत!"
उ - हे वाक्य भास्कर शामला म्हणाला.



भाषा ज्ञान.


खालील वाक्यातील काळ ओळखा.


1.  श्याम पुस्तक वाचत होता - भूतकाळ    
               
2.  मी रामरक्षा वाचेन - भविष्यकाळ       
                  
3.  बाबांनी श्यामचे कौतुक केले - भूतकाळ     
          
4.  मला रामरक्षा चे पुस्तक देशील?-  भविष्यकाळ  





कथालेखन.

दोन मित्र-  जंगलातून प्रवास-  समोरून त्यांच्या दिशेने येत असलेले अस्वल- एक जण झाडावर चढतो- दुसरा मेल्यासारखा पडून राहतो- अस्वल त्याला हुंगून निघून जाते - झाडावरील मित्र खाली उतरतो -अस्वलाने कानात दिलेला संदेश-  तात्पर्य.


-----------------------------------------------------------------




3. बोलका शंख.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. मन्याला कशाचे वाईट वाटत असे?
उ - मन्याने एका रात्रीत 35 पानांची लघुकथा लिहिली व जगाच्या वाग्मयातील 10 उत्तम लघु कथांपैकी ही एक होती असे म्हणणारे कोणी नव्हते. त्याचप्रमाणे कोणीही ती लघुकथा छापणारे नव्हते, घरची, दारची व बाहेरची सारीच माणसे त्याच्यावर अन्याय करीत आहेत असे त्याला वाटत होते. मन्याला या गोष्टीचे वाईट वाटत होते.


2. मन्या समुद्र काठावर का गेला?
उ - मन्याने लिहिलेल्या लघुकथेच्या वाघमयीन कार्याचा आढावा आज पर्यंत कोणीच घेत नव्हता व त्याला कोणीच ओळखलेच नव्हते असे त्याला सतत वाटत असे त्यामुळे तो दुःखी असायचा. त्याच्या या सगळ्या अडचणी पासून दूर जाण्याच्या बेतात तो होता त्यामुळे तो फिरत फिरत समुद्र काठावर गेला.


3. कोणाला पाहून म्हणायला आश्चर्य वाटले? का?
उ - समुद्र काठावरील शंखाला पाहून मनाला आश्चर्य वाटले कारण तो बोलका होता.


4. शंखाची कोणती भविष्यवाणी ऐकून मन्याला आश्चर्य वाटले?
उ - शंखाने मनाला सांगितले की तुझा पगार 20 रुपये वाढणार आहे. शंखाची ही भविष्यवाणी ऐकून मनाला आश्चर्य वाटले.


5. शंखाला प्रश्न विचारणे मन्या का टाळू लागला?
उ - मन्याला नेहमी शुभ वार्ता सांगणारा बोलका शंख हळूहळू अशोक घटनाच आगाऊ सांगू लागला. म्हणून शंखाला प्रश्न विचारणे मन्या टाळू लागला.


6. मन्याची वाणी का नाहीशी झाली? वाणी गेल्यावर मन्याचे जीवन कसे बहरले?
उ - शुभ वार्ता सांगणारा शंख हळूहळू म्हणायला अशोक वार्ता आगाऊ सांगू लागला त्यामुळे मनाने त्याला फोडण्याचा निर्णय घेतला. परंतु शंखानेच सांगितल्याप्रमाणे शंखाची वाणी बंद झाल्यावर मन्याची ही वाणी नाहीशी होणार होती. शंख बोलू नये म्हणून मन्याने शंख फोडला व त्यामुळे मनाची वाणीही नाहीशी झाली. मनाची वाणी नाहीशी झाल्यावर तो मुका झाला व वाचा गेल्यामुळे तो फावल्या वेळात येऊ लागला. अशावेळी संपादक मंडळींनी त्याच्यावरील सहानुभूतीपोटी त्याचे लेख प्रसिद्ध करू लागले. व वाणी गेल्यामुळे मन्याचे जीवन भरत गेले व तो प्रथित यश कथाकार मनोहर कुलकर्णी झाला.


2. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. "ए! लाथ काय मारतोस?"
उ - हे वाक्य शंख मन्याला म्हणाला.


2. " कोण हसतोय ते?"
उ - हे वाक्य मन्या स्वतःलाच म्हणाला.


3. " तू माझ्या घरी येशील."
उ - हे वाक्य मन्या शंखाला म्हणाला.


4. " गोपू बाजारात गेला."
उ - हे वाक्य सरिता मन्याला म्हणाली.



3. रिकाम्या जागा भरा.


1. मन्याने शंखाचे तोंड दाबले.

2. माझी वाणी नाहीशी होणार नाही.

3. मन्या घरातच फेऱ्या मारीत राहिला.

4. मन्याने शंखाला विचारले.

5. मन्याने चमकून आजूबाजूला पाहिले.



भाषा ज्ञान.


1. विरुद्धार्थी शब्द लिहा.


1.  अन्याय X न्याय

2.  प्रगती X अवगती

3.  मंजूर X कर्कश

4.  दयाळू X क्रूर

5.  शुभ्र X कुट्ट

6.  इलाज X नाविलाज

7.  स्मृती X विस्मृती

8.  उपाय X निरुपाय



2. लिंग बदला.

1.  मुलगा-  मुलगी

2.  तो - ती

3.  आई-  वडील

4.  बायको - नवरा

5.  आजी - आजोबा

6.  देखणा - देखणी

7.  मोठा - मोठी

8.  आंधळा- आंधळी



3. वचन बदला.

1.  तक्रार -  तक्रार

2.  रस्ता - रस्ते

3.  संकट - संकटे

4.  लाट - लाटा

5.  चेहरा-  चेहरे

6.  दरवाजा - दरवाजे



4. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

1.  राम कौतुक करीत म्हणाला - म्हणाला

2.  दिनू गावाला गेला - गेला

3.  गाडी अद्याप आली नव्हती-  नव्हती

4.  अखेर होळीचा दिवस उजाडला - उजाडला

5.  ती आज रडत होती- होती


-----------------------------------------------------------------



4. पावसात खंडाळा.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. गवताच्या पात्याने कानात कोणते डूल घातले आहे?
उ - गवताच्या पात्याने कानात जलथेंबांचे डूल घातले आहेत.


2. निळसर मखमल कशाला म्हणतात?
उ - निळसर मखमल धुक्याला म्हणतात.



2. थोडक्यात उत्तरे लिहा.


1. कवियत्रीने पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याचे वर्णन कशाप्रकारे केले आहे?
उ - कवित्री ने पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याचे वर्णन असे केले आहे की काळ्या खडका मधून दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र झरे संतपणे वाहत आहेत.


2. या सुंदर निसर्गामध्ये आपणही कशाप्रकारे मिसळून जावे असे कवियत्रीला वाटते?
उ - या सुंदर निसर्गात कवियत्री गोजिरवाण्या करडू प्रमाणे बागडावेसे वाटते तर कधी कधी पाकोळी होऊन फुलाफुलातून उडावे असे वाटते.



-----------------------------------------------------------------



5. तेथे कर माझे जुळती.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. साष्टीच्या भागात कोणते ठाकूर राहत होते?
उ - साष्टीच्या भागात अर्जुन ठाकूर हे एक मोठे मानकरी राहत होते.


2. रुपाई रणांगणावर कशासाठी गेली होती?
उ - बहादुर शहराच्या बरोबर लढाई झाल्यावर आपला एकही पुत्र रणांगणातून परत आला नाही हे रुपये च्या लक्षात आल्यावर ते कुठे असतील? त्यांचे काय झाले असेल? असा विचार करून त्यांना शोधण्यासाठी रूपाई रणांगणावर गेली होती.


3. बहादुरशहाने वतने देण्यासाठी कोणती अट ठेवली?
उ - रुपाईची सातही मुले भावदूशहाच्या विरुद्ध लढाई स्वर्गवासी झाली होती व तिला व तिच्या नातवाला मरेपर्यंत काहीतरी द्यावे असे बहादूर शाला वाटत होते. म्हणून अल्लाची मर्जी काय आहे ते पाहून त्यांना वतने द्यावी अशी बहादुरशहाने ठेवली होती.


4. बहादुरशहाने रणांगणावर काय पाहिले?
उ - बहादुरशहाने रणांगणात पाहिले की त्यांच्या रणांगणात मशाल व चार माणसांची हालचाल होत होती.



2. रिकाम्या जागा भरा.

1.  बहादूरशहाचे सैनिक आपल्या तळावर परतले.

2.  रणांगणाच्या शामियान्यात बहादूर शाह होते.

3.  तिथले वतने देणार आहे.

4.  रूपाईने बरीच वाट पाहिली.

5. नंतर ते मंजिले दर्यात सोडले.



3. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. " हे तुझे मुलगे काय? "
उ - हे वाक्य बहादुरशाह रूपाईला म्हणाला.


2. " सोनं झालं त्यांचं."
उ - हे वाक्य रुपाई बहादुरशहाला म्हणाली.


3. " साष्टीचे सख्खे सात भाऊ आजच्या लढाईत पडले?"
उ - हे वाक्य नोकर बहादूरशहाला म्हणाले.


भाषा ज्ञान.



1. खालील शब्दांचे वचन बदला.

1. राज्य - राज्ये

2.  युद्ध - युद्धे

3.  सैनिक - सैनिक

4.  मुलगा - मुलगे

5.  मुडदा - मुडदे

6.  घर- घरे


2. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

1.  शूर X भित्रा

2.  देव X दानव

3.  मोठा X छोटा

4.  विजय X पराजय

5.  गुण X अवगुण

6.  सोपे X कठीण  


-----------------------------------------------------------------


6. तरीही मी जाईन.



1.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1.गोपाळराव कशाचा विचार करत होते?
उ - गोपाळा रावांना आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवायचे होते. पण त्याकाळी स्त्रिया घराबाहेर एकट्या पडत नसत. आनंदी 17 वर्षाची मुलगी होती. तिला असे कसे पाठवायचे? तिथे कसे प्रसंग येतील? याचा गोपाळराव विचार करत होती.


2. गोपाळरावांनी खिडकीबाहेर काय पाहिले?
उ - गोपाळरावांना अनेक प्रश्न पडले होते. या विचारातच ते खिडकीपाशी गेले तेव्हा निळे आकाश व लांब पसरलेले शेत त्यांनी पाहिले. त्यातच एक लहानसा पक्षी निळ्या आकाशात उंच भरारी घेताना त्यांना दिसला.


3. गोपाळरावांना आनंदीला कुठे पाठवायचे होते?
उ - गोपाळ रावांना समाज सुधारणा करायची होती. स्त्रियांच्या अंगी सामर्थ्य नाही हे जुन्या लोकांचे मत त्यांना खोटे ठरवायचं होते. आपल्या पत्नीच्या माध्यमातून त्यांना समाजाला उदाहरण घालून द्यायचे होते. म्हणून त्यांना आनंदीला वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवायचे होते.


4. आनंदीला कशाची आठवण झाली?
उ - आनंदीने वाचलेल्या क्लासिकल टेल्स मधील एलिझाबेथ नावाच्या मुलीची तिला आठवण झाली जिने आपल्या  पित्याच्या सुटकेसाठी अनेक हाल अपेष्टा सोसल्या होत्या.



2. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. " तिथं मी नसणार!"
उ - हे वाक्य गोपाळराव आनंदीला म्हणाले.


2. " होय, तरीही मी जाईन."
उ - हे वाक्य आनंदी गोपाळरावांना म्हणाली.


3. " तरी तू जाशील? "
उ - हे वाक्य गोपाळराव आनंदीला म्हणाले.



3. रिकाम्या जागा भरा.

1. शांत स्थिर आवाजात ती बोलत होती.   
                
2. काही वेळ अगदी शांततेत गेला.      
                    
3. क्षितिजापर्यंत लांबच लांब शेती पसरली होती.



भाषा ज्ञान.


1. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

1.  दारापुढे रांगोळी काढली होती.  -  पुढे

2.  आनंदीच्या पाठीवरून हात फिरवला. -   वरून

3.  वाचता वाचता मला देखील राग आला. - देखील




2. खालील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.


1. तुझ्यासारखा स्त्री विरळा - तुझ्यासारखा पुरुष विरळा.   
                                                       
2. आई मुलाला शिकवते-  बाबा मुलांना शिकवतात.     
                                                
3.  मुलगा खेळत होता - मुलगी खेळत होती.



3. खालील वाक्यातील वाक्य प्रकार ओळखा.


1.  तू अमेरिकेतल्या लोकांना आपल्या चालीरीतींची गोडी लाव. - आज्ञार्थी वाक्य. 
                            
2.  हा कोवळा जीव हे सहन करील? - प्रश्नार्थी वाक्य.          
                                                  
3.  हे दृश्य किती विलोभनीय आहे. -  उद्गारार्थी वाक्य.



-----------------------------------------------------------------



7. खोप्यामधी खोपा.


1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1.  सुगरणीने खोपा कोणासाठी बांधला आहे?        
उ - सुगरण हे खोपा आपल्या पिल्लांसाठी बांधला आहे.  

                                                            
2.  खोप्याला कशाची उपमा दिली आहे?              
उ - खोप्याला झुलत्या बंगल्याची उपमा दिलेली आहे.                                                             

3.  खोपा कुठ टांगला आहे?                                
उ - खोपा झाडाला टांगला आहे.  
                       
4.  या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो?                                                    
उ - वरील प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी आपापल्या मते योग्य असे लिहावे.



2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.


पिल निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला|


3. खालील ओळीचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा.
  खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देखरे मानसा |


उ - वरील प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी आपापल्या मते योग्य असे लिहावे.



वाचा.


2. जोड्या जुळवा.


          अ                    ब       

1.  गाय                 गोठा

2.  उंदीर                बीळ

3.  वाघ                 गुहा

4.  घोडा                तबेला

5.  माणूस              घर

6.  माकड              झाड

7.  मुंग्या                वारूळ

8.  मधमाशी           पोळे

9.  कोळी               जाळे



लिहा.


-----------------------------------------------------------------


8. कामधेनू.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. विश्वामित्र कोणाच्या आश्रमात गेले व का?
उ - विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात गेले होते कारण त्यांना भूक आणि तहान लागली होती.


2. विश्वामित्रांना कशाचे आश्चर्य वाटले?
उ - विश्वामित्र वशिष्ठ यांच्या आश्रमात अचानक आपल्या सेनेसह गेले असता वशिष्ठांनी त्यांना हात पाय धुऊन घेऊन जेवणाच्या पानांवर बसायला सांगितले व इतक्या लवकर भोजनाची व्यवस्था कशी काय झाली याचे विश्वामित्रांना आश्चर्य वाटले.


3. विश्वामित्रांनी कोणता निश्चय केला व का?
उ - राज्याचा त्याग करावे व तपश्चर्या करून मंत्र मिळवायचे अस्त्र मिळवायची असा निशायविश्वामित्रांनी केला कारण त्यांना वसिष्ठऋषींना पराभूत करायचे होते.



2. रिकाम्या जागा भरा.


1.  मंथन सुरू झाले.

2.  चतुरंग सेना होती.

3.  एका ऋषीने आपला पराभव केला.

4.  विश्वामित्र परत चिंतातूर झाले.



3. चूक की बरोबर ते लिहा.


1.  सागरातून वीस रत्ने बाहेर आली -    चूक  
                
2.  विशापा नदीच्या काठावर वसिष्ठांचा आश्रम होता - बरोबर 
                                                          
3.  मंत्र विद्येचा प्रयोग करून योद्धे तयार झाले-  बरोबर    
                                                        
4.  देवांनी विश्वामित्रांना मौल्यवान रत्ने दिली- चूक



4. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. " आपण हातपाय धुवून या. "
उ - हे वाक्य वसिष्ठ विश्वामित्रांना म्हणाले.


2. " ही तयारी आम्ही नाही केली. कामधेनुने केली."
उ - हे वाक्य वसिष्ठ विश्वामित्रांना म्हणाले.


3. " मग चला रे, ओढा त्या कामधेनूला. "
उ - हे वाक्य विश्वामित्र सैनिकांना म्हणाले.



भाषा ज्ञान.


1. विरुद्धार्थी शब्द लिहा.


1.  सोय X गैरसोय

2.  चविष्ट X बेचव

3.  मोठा X छोटा

4.  बलवान X दुर्बळ

5.  मृत्यू X जीवन



2. लिंग बदला.


1. पुत्र X पुत्री

2. हत्ती X हत्तीण

3. देवता X देवी

4. राजा X राणी



3. वचन बदला.

1.  नदी -  नद्या

2.  रत्न - रत्ने

3.  पान - पाने

4.  योद्धा - योद्ध

5.  शस्त्र - शस्त्रे

6.  अस्त्र - अस्त्र


-----------------------------------------------------------------



9. नागपूर.



1.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1.महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
उ - महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.


2. नागपूर शहराची स्थापना कोणी व कोणत्या शतकात केली?
उ - नागपूर शहराची स्थापना देवगडचे गोंड राजा बरखत बुलंदशहाने 1703 मध्ये केली.


3. नागपूर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे?
उ - नागपूर "ऑरेंज सिटी" या नावाने प्रसिद्ध आहे.


4. नागपूर या शहरास नागपूर हे नाव कसे पडले?
उ - नागपूरचे नाव तिथे वाहणाऱ्या नाग नदीच्या नावावरून ठेवले गेले आहे त्याचप्रमाणे नागपूर शहरात सापांचे प्रमाण खूप आहे म्हणून या शहराला नागपूर म्हणतात.


5. नागपुरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची नावे लिहा.
उ - नागपूर शहर हे पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे रामटेक,सावंगी, अंबाझरी तलाव,बालाजी मंदिर, पोद्दारेश्वर मंदिर, दीक्षाभूमी, ताजबाग, सीताबर्डी किल्ला ही स्थळे प्रसिद्ध आहेत.



2. रिकाम्या जागा भरा.

1. नागपूर शहराची स्थापना गोंड राजाने केली.
           
2.  नागपूर शहरात सापांचे प्रमाण खूप आहे.  
          
3.  नागपूर शहराची स्थापना 1703 मध्ये झाली.    
          
4.  सीताबर्डी हा किल्ला दोन डोंगरांवर वसलेला आहे.
                                                               
5.  भारताच्या  मध्य भागात स्थित असलेले शहर होय.



3. बरोबर किंवा चूक ते लिहा.

1. सेमिनरी डोंगराच्या शृंखलेत शंकराचे मंदिर बांधले आहे- चूक  
                                           
2. अंबाझरी तलाव शहराच्या उत्तर भागात आहे-  चूक    
                                                           
3.  नागपूर हे विश्व हिंदू परिषद संघटनेचे मुख्य केंद्र आहे - बरोबर   
                                               
4.  नागपूर शहरात माकडांचे खूप प्रमाण आहे - चूक 
  
5.  या शहराची स्थापना 1703 मध्ये झाली - बरोबर



भाषा ज्ञान.


1. विरुद्धार्थी शब्द लिहा.


1. परिचित  × अपरिचित

2. सुपीक × नापिक

3.  संकोच × निसंकोच

4.  वैयक्तिक × सार्वजनिक

5.  स्वातंत्र्य × पारतंत्र्य

6.  मान × अपमान

7.  सुंदर × कुरूप

8.  जुने × नवे



2. खालील वाक्यातील भाववाचक नामे ओळखा.

1.  राजाची शिस्त फार कडक होती - कडक 
             
2.  माझा संशय दृढ झाला - संशय
                           
3.  पाहुण्यांनी पाहुणचार केला - पाहुणचार

4.  मुंबईत औद्योगिक उत्पादन प्रचंड आहे- प्रचंड



3. खालील संधी सोडवा.

1.  मनोरथ - मन: + रथ

2.  अज्ञान - अ+ ज्ञान

3.  कार्यालय - कार्य+ आलय

4.  अत्यावश्यक - अति + आवश्यक

5.  देशाभिमान-  देश + अभिमान

6.  सार्थक - स + आर्थक

7.  ज्ञानार्जन - ज्ञान + अर्जन



4. खालील वाक्यातील काळ ओळखा.


1.  नागपूर फार प्रसिद्ध शहर आहे - वर्तमान काळ

2.  मी रामटेकला गेले होते -भूतकाळ

3.  मी आई बरोबर गावाला जाईन -भविष्यकाळ


-----------------------------------------------------------------

10. ज्ञानवंत.


1.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. गुरुने शिष्याला कोणता उपदेश केला?
उ - गुरुने शिष्याला ज्ञान मिळवण्यासाठी देशात भ्रमण करण्याचा, निरनिराळी तीर्थक्षेत्र पहाण्याचा व अधिकाधिक भाषा शिकण्याचा उद्देश केला.


2. शेवटी गुरुदेव शिष्याला काय म्हणाले?
उ - शेवटी गुरुदेव शिष्याला म्हणाले की वत्स्य, तू खूप भाषा शिकलास, धनही कमावलेस पण ज्यासाठी मी तुला पाठवले होते ती अमूल्य भाषात शिकला नाहीस. तू एवढा ज्ञानी असूनही आजही प्रेम, दया आणि सहानुभूतीची भाषा जाणत नाहीस. जर तू खरा ज्ञानी असतास तर दुःखी त्यांचे दुःख पाहून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला असतास. ज्यावेळी तू तुझे गुरुदेव रुग्णावस्थेत पडलेले पाहूनही आनंदाने स्वतःचीच गोष्ट सांगत बसल्यास त्यावेळी तर तू सार्‍याच मर्यादा ओलांडल्या.


3. शिष्य कुठे गेला व का?
उ - प्रेम भावाने दुःखी त्यांना मदत करण्यासाठी शिष्य आश्रमातून बाहेर पडला.



2. रिकाम्या जागा भरा.

1. देशातील निरनिराळी तीर्थक्षेत्र पहा.

2. खूप सार्‍या भाषा शिकला.

3. शिष्याने भरपूर धन कमावले.

4. तू साऱ्याच मर्यादा ओलांडल्या.



3. बरोबर किंवा चूक ते लिहा.

1.  काशीमध्ये श्रीमंत व्यापारी राहत असे - चूक

2.  पारंगत ने विविध भागात भ्रमण केले - बरोबर

3.  पारंगत ने स्वतःसाठी खूप धन मिळवले - चूक

4.  पारंगतला त्या माणसांची दया आली - चूक



4. कोण कोणास म्हणाले ते लिहा.

1. "तू खूप काळ माझी सेवा केली आहेस".
उ - हे वाक्य गुरुदेव शिष्याला म्हणाले.


2. " मी खूप ज्ञान मिळवले. "
उ - हे वाक्य शिष्य गुरूंना म्हणाला.



भाषा ज्ञान



1. कंसात दिलेल्या शब्दाचे अनेक वचन लिहून वाक्य पूर्ण करा.

1. आईने सर्व पुस्तके खरेदी केली. (पुस्तक)

2. मी अनेक पावसाळे पाहिले आहेत. (पावसाळा)

3. घरट्यात अंडी आहेत. (अंडे)

4. त्याच्याकडे फळे आहेत. (फळ)

5. माझ्याकडे पाच टोप्या आहेत. (टोपी)



2. ध्वनी दर्शक शब्दांच्या जोड्या जुळवा.

1.  ढग- गडगड

2.  पाऊस -धो धो

3.   वारा -सोसो

4.  ओढा -खळखळ

5.  वीज - कडकड



3. कोण ते लिहा.

1.  गुरे राखतो - गुराखी

2.  कपडे शिवतो - शिंपी

3.  मासे पकडतो - कोळी

4.  लाकूड काम करतो - सुतार

5. घरे बांधतो - गवंडी



4. खालील दिलेले क्रियापदे वापरून वाक्य तयार करा.


1. घाबरणे - प्राणी संग्रहालयात वाघाला बघून मी फार घाबरली. 
                                                 
2.  रडणे - रस्ता चुकल्यामुळे मला फार रडू आले.  
     
3.  खाणे - श्यामने आंबे खाल्ले.      
                       
4.  हसणे - आईला पाहून बाळ खुदकन हसले. 
         
5.  भेटणे - बऱ्याच वर्षानंतर बाबांना त्यांचे मित्र भेटले.



5. खालील वाक्यातील विशेषण शोधा व लिहा.

1.  राधा गरीब मुलगी होती - गरीब

2.  कपाळावर सुंदर कुंकू लावले होते - सुंदर

3.  अकबर फार दयाळू होता - दयाळू

4.  आंबा गोड होता - गोड

5.  औषध कडू आहे - कडू


लिहा.



-----------------------------------------------------------------


11. पंचारती.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. महाराष्ट्राचे स्वागत कोण करत आहेत?           
उ - महाराष्ट्राचे स्वागत सह्याद्रीचे कडे व मानाच्या भगिनी करत आहेत.


2. सह्याद्रीच्या कड्यावर काय वाजत आहे?
उ - सह्याद्रीच्या कड्यावर वाऱ्याची नौबत वाजत आहे.


3. पंचारती कोणाच्या हातात आहेत?
उ - पंचारती जिजाबाईंच्या हातात आहेत.


4. अहिल्यादेवीच्या हातात काय आहे?
उ - अहिल्यादेवी च्या हातात पुण्यतीर्थाचा कलश आहे.


5.  तव्याची भाकर कोणी आणली?
उ - तव्याची भाकर अहिराणी बहिणाबाई यांनी आणली.


6. प्राणांचे रंग भरून कोणी चित्रे रेखाटली आहेत?
उ - प्राणांचे रंग भरून लक्ष्मीबाईंनी चित्र रेखाटली आहेत.


7. महाराष्ट्राच्या स्वागतासाठी कोण कोण आलेल्या आहेत?
उ - महाराष्ट्राच्या स्वागतासाठी महादंबा, जनाई, लक्ष्मीबाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी, जिजाई या आलेल्या आहेत.


3. कवितेच्या ओळी पूर्ण करा.


1. काळ कवाड फोडून
    आल्या आल्या साऱ्या
    जणी महाराष्ट्राच्या स्वागता
    आज मानाच्या धनिणी!


2. केली जळक्या काडीची
     लक्ष्मीबाईंने लेखणी
     चित्रे देखील स्वागता
     रंग प्राणाचे भरून!



शुद्धलेखन.


खालील शब्द शुद्ध करून लिहा.

1. दिपांची - दीपांची

2. दाहि - दाही

3. अबिर - अबीर

4. साह्याद्री - सह्याद्री

5. पवीत्र - पवित्र

6. सुर्य - सूर्य

7. पचांरती- पंचारती

8. माहाराष्ट्र - महाराष्ट्र



-----------------------------------------------------------------


12. माझे बालपण.



1. रावसाहेबांना कशाचे आश्चर्य वाटले व का?
उ - एवढ्या लहानशा मुलाने किती सुंदर निबंध लिहिला आहे याचे रावसाहेबांना आश्चर्य वाटले.


2. गोपाळचा जीव मेटाकुटीला का आला होता?
उ - गोपाळला शिक्षणासाठी पैसे जमा करायचे होते त्यामुळे तो इतर लोकांच्या घरी भांडी घास, कोणाला पाणी आणून दे, कोणाच्या दुकानातून सामान आणून दे, तर कोणाची भाजी खुडायला मदत कर, तर कोणाच्या घरातील झाडलोट कर अशी कामे करीत असे त्यामुळे त्याचा जीव मेटाकुटीला आला होता.


3. कोणती गोष्ट गोपाळच्या जिव्हारी लागली?
उ - अकोला हायस्कूल मधील विष्णू मोरेश्वर महाजनी सर जेव्हा गोपाळला म्हणाले की तू रोजच उशिरा येतोस व वेगवेगळी कारणे सांगतोस. तू काय शाळा शिकणार. तुझ्या हातून शिक्षण होईल असे वाटत नाही. सरांचे हे बोलणे गोपाळच्या जिव्हारी लागले.



2. रिकाम्या जागा भरा.


1.  टेंभू गावापासून कराड जवळच होते.

2.  गोपाळनेही निबंध दिला होता.

3.  मामाच्या पत्राने गोपाळ सुखावला.

4.  तो इतरही कामे करू लागला.



3. कोण कोणास म्हणाले ते लिहा.


1. " हा निबंध कोणी लिहिला? "
उ - हे वाक्य रावसाहेबांनी सर्व मुलांना विचारले.


2. " होय साहेब हा निबंध मीच लिहिलाय."
उ - हे वाक्य गोपाळ मामलेदारांना म्हणाला.


3. "तू काय शाळा शिकणार?"
उ - हे वाक्य महाजनी सर गोपाळला म्हणाले.


4. "सर, शिक्षण हेच माझे जीवन आहे."
उ - हे वाक्य गोपाळ महाजनी सरांना म्हणाला.


4. बरोबर किंवा चुक ते लिहा.


1.  टेंभू गावात शाळा नव्हती - बरोबर
                      
2.  कराडला सोमवारी सभा भरत असे- चूक 
           
3.  गोपाळचे मन नोकरीत रमत नव्हते- बरोबर  
        
4.  गोपाळने केसरी वर्तमानपत्र सुरू केले- चूक



भाषा ज्ञान


1. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा.



       अ                           ब       

1.  हुशार                      मठ्ठ

2.  सुंदर                       कुरूप

3.  पूर्ण                        अपूर्ण

4.  नाईलाज                 ईलाज

5.  पास                       नापास

6.  खात्री                      शंका



2. लिंग बदला.

1.  मामा - मामी

2.  काका - काकी

3.  शिष्य - शिष्या

4.  आई - वडील

5.  मुलगा - मुलगी



3. वचन बदला.

1.  गाव-  गावे

2.  महिना-  महिने

3.  वर्तमानपत्र - वर्तमानपत्रे

4.  काम-  कामे

5.  नोकरी - नोकऱ्या



4. शब्द शुद्ध करून लिहा.

1. कुनाची - कुणाची

2. लीहिले - लिहिले

3. हुशारी- हुशारी

4. वाढले - वाढले


-----------------------------------------------------------------



15. सचिन तेंडुलकर.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. सचिन हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले व का?
उ -  सचिन हे नाव संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवण्यात आले कारण सचिन यांच्या कुटुंबीयांचे संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन हे आवडते होते.


2. सचिन व त्याच्या प्रशिक्षकाची भेट कुठे व केव्हा घडली?
उ - सचिन लहान असताना शारदाश्रम विद्यामंदिर येथे शाळेत जायचा तेथे त्याची भेट रमाकांत आचरेकर या त्याच्या प्रशिक्षकाबरोबर घडली.


3. सचिनने शाळेत असताना कोणता पराक्रम गाजविला?
उ - सचिन शाळेत असताना त्याने आपला मित्र व सह खेळाडू विनोद कांबळी सोबत 1988 साली हॅरीस शिल्डगेम मध्ये 664 धावांची अजस्त्र भागीदारी केली व या डावात सचिनने 320 धावा काढल्या.


4. सचिनचा महत्वाचा गुण कोणता?
उ - सचिनचा महत्वाचा गुण म्हणजे तो दोन्ही हाताने तेवढ्यात योग्य पद्धतीने काम करतो तो चेंडू टाकताना आणि बॅट पकडताना उजव्या हाताचा उपयोग करतो परंतु लिहिताना मात्र डाव्या हाताने लिहितो. तसेच खेळताना तो सदैव मनावर संयम ठेवून खेळतो हा त्याचा महत्त्वाचा गुण आहे.


5. सचिनची अमूल्य भेट कोणती ती त्याला कशी प्राप्त झाली?
उ - तारुण्या अवस्थेत सचिन आपल्या प्रशिक्षकांबरोबर सराव करताना त्याचे प्रशिक्षक यष्टिवर एक रुपयाचे नाणे ठेवत असत आणि जर एखाद्या गोलंदाजाने सचिनला बाद केले तर ते नाणं त्याला दिलं जात असे पण जर सचिन बाद न होता पूर्ण वेळ खेळला तर ते नाणं सचिन ला पारितोषिक म्हणून भेटत असे सचिनला मिळालेली 13 नाण्यांची ती अमूल्य भेट आहे.


6. सचिनच्या नावावर कोणकोणते विक्रम नोंदविले आहेत?
उ - सचिनच्या नावे एका वर्षात 1000 धावा करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे. 1998 साली एक दिवसीय सामन्यात त्याने 1894 धावा केल्या हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडून शकलेला नाही. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दिलीप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले आणि 2012 मध्ये शतकांचे शतकही झळकावले.



2. रिकाम्या जागा भरा.


1.  सचिनच्या नावावर बरेच विक्रम नोंदवले गेलेले आहेत.
                                                          
2.  सचिनला दुसरी नावे लिटिल मास्टर आणि मास्टर ब्लास्टर या नावांनीही ओळखतात.   
         
3. प्रशिक्षक यष्टीवर एक रुपयाचं नाणं ठेवत असत.



3. बरोबर किंवा चूक ते लिहा.


1.  प्रसार माध्यमे सचिन विषयी जाणण्यास उत्सुकता नसतात - चूक.    
                               
2.  सचिन नियमितपणे गोलंदाजी करतो - चूक   
        
3.  सचिन उजव्या हाताने लिहितो - चूक       
           
4.  सचिनची अमूल्य भेट 13 नाणी आहेत - बरोबर  
      
5.  सचिनचे नाव एका खेळाडूच्या नावावर ठेवले गेले- चूक


भाषा ज्ञान.



1. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.


1.  माझ्या कानाजवळ येऊन राम म्हणाला - जवळ

2.  बाई माझ्यावर रागावले आहेत का - वर

3.  मी त्यांच्याकडे पाहिलेच नाही - कडे

4.  विद्यार्थी खिडकीतून बाहेर पाहत होते-  तून

5.  आपल्यापुढे कोणीच नव्हते - पुढे



2. खालील वाक्यांचे काळ ओळखा.


1.  मी गाणे गाते - वर्तमान काळ

2.  शितलने कविता वाचली आहे - भूतकाळ

3.  श्यामने पतंग उडवला होता - भूतकाळ

4.  शेतकरी शेतात काम करीत आहेत-  वर्तमान काळ

5.  मीना घरी येत असते - वर्तमानकाळ



चित्र वर्णन.



-----------------------------------------------------------------


16. गुढीपाडवा.



1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. चैत्र महिन्यात कोणता सण साजरा केला जातो?
उ - चैत्र महिन्यात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.


2. गुढीपाडवा हा सण कसा साजरा करतात?
उ - गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ केले जाते व सुबकशी रांगोळी काढली जाते त्यानंतर उंचावर गुढी उभारून सर्वांना प्रसाद वाटला जातो.


3. गुढीपाडव्याला कोणत्या ऐतिहासिक महत्त्व आहे?
उ - गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंका दिश्रावणाला ठार करून विजयी होऊन अयोध्या नगरात प्रवेश केला होता तोच हा वर्ष प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून या दिवसाला ऐतिहासिकरित्या खूप महत्त्व आहे.


4. चैत्र महिन्यात वातावरणात कोणते बदल होतात?
उ - चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते. वृक्षांना नवी पालवी फुटते. लहान बाळाप्रमाणे झाडे सुंदर दिसतात. या महिन्यात सर्वत्र पर्णरुपी रंगांची उधळण सुरू असते आणि याच महिन्यात नववर्षाला ही प्रारंभ होतो.


5. या दिवशी आपण कोणता संकल्प करावा?
उ - या दिवशी आपण आपले आचरण पवित्र ठेवण्याचा संकल्प करायला पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी दररोज नियमित अभ्यास करण्याचा आई-वडिलांचा मान ठेवण्याचा संकल्प करावा. आलेल्या परिस्थितीत आनंद राहण्याचे व्रत घ्यावे.



2. रिकाम्या जागा भरा.


1. मनाला प्रसन्न वाटणाऱ्या चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात.   
                                            
2. वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते.             
     
3. वर लोटी ठेवतात.                         
                    
4. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे.   
                                                           
5. बसून नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला.




लिहा.


खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.


1. अपमान करणे- गरीब व्यक्तींचा कधीही अपमान करू नये.   
                                                     
2.  अभिमान वाटणे - मी शाळेत पहिला आल्यामुळे माझ्या आईला माझा अभिमान वाटला.        
         
3.  दिवस पालटणे - खूप कष्ट करून राधाबाईंनी आपले व आपल्या कुटुंबाचे दिवस पालटले.
          
4.  सार्थक होणे - आई-वडिलांची सेवा केल्यामुळे मुलांचे जीवन सार्थक होते. 
                               
5.  स्वागत करणे - शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.



भाषा ज्ञान


1.  खालील दिलेल्या उपमांच्या जोड्या लावा.


1.  सिंहासारखा - शूर

2.  पिसासारखा - हलका

3.  दगडासारखा - कठीण

4.  विजेसारखा - चपळ

5.  माकडासारखा - खोडकर

6.  मधासारखा - गोड

7.  गाढवासारखा - मूर्ख



2. रंगाचा गडदपणा दाखवणारे शब्द योजा.


1.  निळा +शार = निळाशार     
                              
2.  लाल +भडक = लालभडक 
                                
3.  काळा + शार = काळाशार
                                
4.  हिरवा + गार = हिरवागार  
                               
5.  पांढरा+ शुभ्र = पांढराशुभ्र   
                              
6.  पिवळा + धमक = पिवळाधमक



3.  समूहवाचक शब्द लिहा.

1.  केळ्यांचा - घड          
                                     
2.  तारकांचा - पुंज         
                                      
3.  लोकांचा - घोळका /जमाव   
                            
4.  फळांचा - रास          
                                      
5.  गुरांचा - कळप      
                                                
6.  द्राक्षांचा - घड        
                                          
7.  धान्याची - रास      
                                         
8.  गवताची - पेंढी



4. खालील शब्दांना 'वान' हा शब्द जोडून तयार केलेले शब्द.


1. रूप - रूपवान

2. धन -  धनवान

3. बल-  बलवान

4. बुद्धी - बुद्धिवान

5. ताकत - ताकतवान

6. शील - शीलवान



वाचा.

1.  बैलाची पूजा - पोळा
                                         
2.  सोने लुटतात - दसरा   
                                     
                    
4.  नागाची पूजा - नागपंचमी       
                           
5.  दहीहंडी फोडतात - गोकुळाष्टमी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close