Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी शाळेचे दप्तर बोलतोय -शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त- Mi Shaleche Daptar Boltoy - मराठी निबंध - Autobiography Of School Bag In Marathi.

मी शाळेचे दप्तर बोलतोय | शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त | Mi Shaleche Daptar Boltoy | Autobiography Of School Bag In Marathi.


           
मी शाळेचे दप्तर बोलतोय - शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त- Mi Shaleche Daptar Boltoy
मी शाळेचे दप्तर बोलतोय - शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त



मित्रमैत्रिणींनो, आज आपण शाळेच्या दप्तराचे मनोगत किंवा शाळेच्या दप्तरांची आत्मकथा (Autobiography Of School Bag) बघणार आहोत.


वार्षिक परीक्षा संपली आणि शाळेची उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. आज मी शेवटचा पेपर देऊन घरी आलो आणि आनंदाने मी माझे पाठीवरचे दप्तर भिरकावून दिले. इतक्यात आवाज आला, " अरे! अरे! हे काय करतोस? " मी इकडे तिकडे पाहू लागलो. तितक्यात पुन्हा एकदा आवाज आला 'मी तुझे दप्तर बोलतोय!' मी थोडा दचकलोच होतो.

होय बाळा! मी तुझे दप्तर बोलतोय! दप्तर म्हणजेच ज्याला आजकल तुम्ही सर्व मुले स्कूल बॅग (School Bag) असे म्हणता ना? तोच मी दप्तर. आज मी तुला माझे मनोगत सांगणार आहे.

मी दप्तर म्हणजेच तुम्हा सर्व मुलांना शाळेत जाताना लागणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये सर्वात जास्त महत्वाची अशी समजली जाणारी वस्तू.

दप्तर म्हणजेच पिशवीप्रमाणेच दिसणारी परंतु थोडीशी वेगळी आणि आधुनिक पिशवीच म्हणा पाहिजे तर जिच्या आत तुम्हा मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेण्यासाठी लागतात त्या सर्व निरनिराळ्या वस्तू त्यात ठेवून तुम्ही आपल्यासोबत घेऊन जाता.

मी तुझा दप्तर तुम्हा सर्व मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून तुमच्या बरोबर असतो.
तुम्हा सर्व मुलांना शाळेत जाताना तिकडे गेल्यावर अभ्यास करण्यासाठी लागणारे पेन, पेन्सिल, वहया आणि पुस्तके, चित्रकलेची वही, रंगपेटी, कंपास बॉक्स व सर्वात महत्वाचे म्हणजेच खाण्याचा डबा आणि पाण्याची बाटली ठेवायला हाच म्हणजेच मी दप्तरच तुमच्या मदतीला येतो.

मी म्हणजेच तुझे दप्तर तुझ्या शाळेच्या सामानाचे इतके ओझे घेऊन तुझ्या पाठीवर बसून तुझ्याबरोबर शाळेत येतो. तुला एवढे ओझे पाठीवर न्यावे लागते म्हणून सर्वाना तुझी दया येते आणि प्रत्येक जण मलाच बोलते की दप्तराचे ओझे फारच जास्त आहे. अरे पण या दप्तरात इतके ओझे कोण भरते सांग ना? तूच भरतोस ना?

उन्हाळा असो की पावसाळा तु मात्र कायम सगळे वह्या पुस्तके, ड्रॉइंगचे कलर, निबंधची वही, प्रयोगाची वही सगळे सगळे भरून नेतोस. कारण तु तुझ्या वर्गशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार तुझे दप्तर कधीच भरत नाहीस. परिणामी मी जड होतो आणि तुझी ही पाठ दुखते.

मला अजून आठवते ज्यावेळी तु आई बरोबर एकदा बाजारात आला होतास आणि मी एका दुकानाच्या आत लटकावून ठेवलो गेलो होतो. मी सुंदर रंगाचा, नवीन आणि पटकन कोणाच्याही डोळ्यात भरेन असा आकर्षक दप्तर त्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेला होतो.

तु मला बघितलस आणि त्याच क्षणी तु आईकडे हट्ट करून मला विकत घ्यायला लावलस आणि जसे तु मला घरी घेऊन आलास त्या वेळी तु खूपच आनंदात होतास. तुझ्या आवडत्या रंगाचे दप्तर तुला मिळाले होते.

दुसऱ्याच दिवशी तु मला व्यवस्थित भरून शाळेत घेऊन गेलास. पुढे काही दिवस तु माझी खूप काळजी ही घेत असायचास परंतु नंतर काही महिन्यांनी तु शाळेतून घरी आलास की मला एका कोपऱ्यात फेकून खेळायला जाऊ लागलास. शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी तर तु माझ्याकडे बघतही नाहीस. आताच मागे होऊन गेलेल्या दिवाळीच्या सुट्टीत तर २१ दिवसातून तु मला एका कोपऱ्यात टाकून ठेवले होतेस.

अरे मित्रा! तुझ्या या अश्या निष्काळजीपणामुळे माझा रंग फिक्का पडत चालला आहे बघ! कितीतरी वस्तू तू दप्तरात टाकून जबरदस्तीने बंद करतोस त्यामुळे मी आता एका बाजूने फाटू लागलो आहे. अरे मित्रा, माझी मध्ये मध्ये साफसफाई तरी करीत जात जा. माझ्या म्हणजेच या दप्तराच्या आत कित्येक कागदाचे बोळे आणि पेन्सिलची टोके कित्येक दिवस तशीच पडून असतात.

नेहमी तुझी शाळा सुटली की तु दप्तर घेऊन कधी कधी मित्रांबरोबर खेळण्यासाठी क्रिडांगणातही जातोस त्यावेळी तु मला जिथे ही जागा दिसेल तिथे ठेवून देतोस. जसे कधी तू मला एखाद्या झाडाच्या पायथ्याखाली ठेवतोस आणि खेळायला जातोस तर कधी मैदानातील एखाद्या लोखंडी खांबाला मला लटकावून ठेवतोस. तु एकदा खेळायला गेलास की माझ्याकडे लक्षही देत नाहीस.

आज तुझी वार्षिक परीक्षा संपली तसें तु मला घरी आल्या आल्या हवेत भिरकावून दिलेस आणि आता मी या कोपऱ्यात येऊन पडलो आहे पण जेव्हा आता पुन्हा शाळा सुरु होतील तेव्हा तु माझी शोधाशोध करू लागशील हो की नाही?

अरे बाळा! सुट्टीच्या दिवसांत मला नीट स्वच्छ करून, वाटल्यास धुवून सुकवून मग व्यवस्थित एका ठिकाणी ठेवीत जा म्हणजेच पुढील वेळी जेव्हा शाळा सुरु होतील त्यावेळी मी तुला स्वच्छ अवस्थेतच पटकन उपलब्ध होईन.

मित्रा! मी तुझे दप्तर म्हणजेच तुझी लाडकी स्कूल बॅग तुला आज मनापासून सांगू इच्छित आहे की, मी जसे तुझ्या शाळेच्या सामानाचे सर्व ओझे स्वतः मध्ये सामावून घेऊन जितके होऊ शकेल तुझ्या पाठीला आराम देण्याचा प्रयत्न करतो तसेच तु ही मला साफ ठेवून माझ्यामध्ये दररोज मोजकेच व तुझ्या वर्गशिक्षकानी दिलेल्या वेळपत्रकानुसार वह्या पुस्तके भरीत जा म्हणजेच तुझे हे दप्तर तुला पाठीवर कधीच वजनदार लागणार नाही व आपण दोघे दररोज आपला शाळेत येण्याजाण्याचा प्रवास आनंदाने करू.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close