Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जर पुस्तके नसती तर- Jar Pustke Nasti Tar- मराठी निबंध- If There Were No Books Essay In Marathi - कल्पनात्मक.

जर पुस्तके नसती तर | Pustke Nasti Tar | If There Were No Books Essay In Marathi.



पुस्तके नसती तर- Pustke Nasti Tar
जर पुस्तके नसती तर- Jar Pustke Nasti Tar




मित्रमैत्रिणींनो, आज आपण जर पुस्तके नसती तर या निबंध विषयावर बोलणार आहोत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि पावसाळा सुरु झाला. आता माझी शाळा ही सूरू होणार आहे. शाळा सुरु होणार म्हंटल की मला नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन छत्री  किंवा नवीन रेनकोट, नवीन पावसाळी चप्पल आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच नवीन वर्षाच्या इय्यतेची नवीन पुस्तके मिळतात. पण माझ्या मनात आले की जर पुस्तके नसती तर? किती मज्जा आली असती! किती वेगळी कल्पना आहे ना?

जर पुस्तके नसती तर शाळेत गेल्यावर आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय शिकवले असते? आणि जर पुस्तके नसतील तर शाळेत जाताना पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होऊन जाईल आणि जरी दप्तर असलेच तर त्यात फक्त खाण्याचा डबा आणि पाण्याची बाटलीच असली असती आणि जेव्हा शाळेच्या वाचनालयात जाऊ तेव्हा तर तिथे सगळे कप्पे रिकामेच दिसलें असते.

पुस्तके नसली तर शाळेत जाऊन फक्त खेळून घरी यायला मिळाले असते. पुस्तके नसली तर वर्गात आम्ही सर्व मुले फक्त चित्रकलेचा तास आणि संगीताचा व नाट्याचे वर्ग इतक्याच गोष्टी दररोज करू.

पुस्तके नाहीत म्हणजेच मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यातील काहीच शिकण्याची गरज राहिली नसती. नको ते शब्दार्थ आणि नको ती भूमिती, नको ते वैज्ञानिक नियम आणि नको त्या सगळ्या गृहपाठच्या कटकटी.

जर पुस्तकेच नसती तर आई ही सुट्टीच्या दिवशी जे सारखी माझ्या मागे लागलेली असते की वाचन कर किंवा पाढे पाठ कर ते ती बोललीच नसती.

पुस्तके नसती तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी घरजवळील क्रिडांगणावर जाऊन मनसोक्त खेळत राहू शकेन. शाळेतही तसेच करू शकेन. कारण पुस्तके नसल्यामुळे आमच्या शिक्षकांना आम्हाला काहीही शिकवण्यास मिळणार नाही व ते आम्हाला खेळायला पाठवितील.

काय मज्जा आली असती ना जर पुस्तके नसती तर... की या उलट आपल्याला त्याचे नुकसानच जास्त झाले असते? कारण जर पुस्तके नसती तर आपण काहीच वाचू शकलो नसतो. म्हणजेच आपल्याला वाचन कसे करायचे तेच कळले नसते आणि जर पुस्तकांविना वाचनच आले नसते तर परिणामी आपण काही लिहू ही शकलो नसतो. म्हणजेच आपल्याला काय आणि कसे लिहायचे तेच कधी कळले नसते. पुस्तके आपल्याला वाचायला शिकवितात. पुस्तकांमुळे आपल्याला व्यवहारज्ञान समजते. जर पुस्तके नसती तर आपण वेगवेगळ्या भाषा त्याच्या व्याकरणासकट कशा काय शिकू शकलो असतो?

पुस्तके नसती तर नवीन नवीन विषयांचे ज्ञान आपण कुठून आणि कसे मिळवले असते? मला गोष्टींची पुस्तके वाचायला खूपच आवडतात पण जर पुस्तके नसती तर मग मला छान छान गोष्टी वाचायला कशा मिळतील? माझी आई तर मला रोज रात्री झोपताना गोष्टीच्या पुस्तकातून किमान एक गोष्ट तरी नियमित वाचून दाखविते. त्यातील शौर्याच्या कथा, परीच्या कथा व इसापनीतीच्या कथा ही मला ऐकायला खूप आवडतात. हया सगळ्या कथांना मग मला मुकावे लागेल.

जेव्हा मी इंग्रजीचा अभ्यास करतो त्यावेळी मला काही शब्द अडले तर मी इंग्रजी शब्दकोष घेऊन त्यातील अर्थ बघतो परंतु जर पुस्तके नसतील तर मला कोणत्याही नवीन शब्दाचा अर्थ कसा काय कळेल तेच समजत नाही?

यामुळे मग कित्येक शब्दांपासून व त्यांच्या अर्थापासून मी अनभिज्ञ राहीन म्हणजेच पुस्तके नसती तर ही कल्पनाच करणे खूप भयंकर आहे कारण पुस्तके हेच आपले खरे मित्र आहेत. जी व्यक्ती जेवढी जास्त पुस्तकांच्या सानिध्यात जास्तीत जास्त आपला वेळ घालवते ती व्यक्ती तेवढीच जास्त ज्ञान प्राप्त करू शकते. अवांतर वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर सखोल माहिती मिळते. म्हणूनच तर नेहमी असे म्हणतात की, "वाचाल तर वाचाल!" आणि याच मुळे आपल्याकडे "पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया!" हा नाराही प्रसिद्ध झाला आहे.

तेव्हा पुस्तके नसती तर ही कल्पना करणे हे चुकीचे आहे. या उलट "पुस्तक माझा खरा मित्र" हेच आपण नेहमी लक्षात ठेवून आपल्याला उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे नेहमी अवांतर वाचन करून स्वतःला सर्व विषयांत पारंगत करण्यासाठी जितके होऊ शकेल तितके जास्त आपण सर्व सतत प्रयत्नशील राहूया.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close